Home > मॅक्स एज्युकेशन > बारावीचा निकाल जाहीर, कोकणची पोरं हुश्शार !

बारावीचा निकाल जाहीर, कोकणची पोरं हुश्शार !

बारावीचा निकाल जाहीर, कोकणची पोरं हुश्शार !
X

कोरोनाच्या संकटामुळे बदललेल्या मुलांकनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बारावीचा (Maharashtra HSC Result 2021) निकाल जाहीर झाला आहे. दवहावीप्रमाणेच बारावीचा निकाल सुद्धा 99 टक्क्यांच्यावर लागला आहे. बारावीच्या निकालाची टक्केवारी 99.63 आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुपारी 4 वाजल्यापासून वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी निकाल जाहीर झाला. खालील वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणचा निकाल 99.81 टक्के तर औरंगाबाद विभागाचे सगळ्यात कमी म्हणजे 99.34 टक्के निकाल लागला आहे.

निकाल कुठे पाहायचा?

१. https://hscresult.11 thadmission.org.in

२. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

४. mahresult.nic.in. .

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या वेबसाईटवर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या वेबसाईटवर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

*कोणत्या विभागाचा किती निकाल*

कोकण : 99. 81 टक्के

मुंबई : 99.79 टक्के

पुणे : 99.75 टक्के

कोल्हापूर : 99.67 टक्के

लातूर : 99.65 टक्के

नागपूर : 99.62 टक्के

नाशिक : 99.61 टक्के

अमरावती : 99.37 टक्के

औरंगाबाद : 99.34 टक्के

सुप्रीम कोर्टाने बारावीचे निकाल ३१ जुलैची पर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. पण राज्यात बारावीचे निकाल 3 दिवस उशीरा जाहीर झाले आहेत. सायन्सचा निकाल 99.45 टक्के, आर्ट्सचा निकाल 99.83 टक्के तर कॉमर्स शाखेचा निकाल 99.91 टक्के इतका लागला आहे.

बारावीच्या लेखी परीक्षा रद्द झाल्याने हा निकाल अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे. पण आपल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची काही तक्रार असेल तर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आहे. विद्यार्थ्यांना पोस्टामार्फत, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येणार आहे. त्यासाठीची आवश्यक माहिती मंडळाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.


Updated : 3 Aug 2021 12:01 PM GMT
Next Story
Share it
Top