Home > मॅक्स एज्युकेशन > HSC papaer leak: बारावीच्या पेपरची किंमत दहा हजार रुपये, मुख्याध्यापकासह पाच जण अटकेत

HSC papaer leak: बारावीच्या पेपरची किंमत दहा हजार रुपये, मुख्याध्यापकासह पाच जण अटकेत

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पेपरफुटीमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच आता दहा हजार रुपयात बारावीचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे.

HSC papaer leak: बारावीच्या पेपरची किंमत दहा हजार रुपये, मुख्याध्यापकासह पाच जण अटकेत
X

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या पेपरफुटीमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच आता दहा हजार रुपयात बारावीचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात झालेल्या पेपरफुटीचे राज्यभर पडसाद उमटले होते. तर पेपरफुटीचे प्रकरण विधानसभेतही गाजले होते. त्यावर सरकारने कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असतानाच आता दहा हजार रुपयात गणित विषयाचा पेपर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

बारावीच्या गणित विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी मुंबई शहरात मुख्याध्यापकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सअॅपवरून शेयर केले आणि नंतर परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रत्येकी 10 हजार रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दादर येथील अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूलमधील एका शिक्षकाने केलेल्या तक्रारीच्या आधारे शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या चौकशी नुसार, मुंबई मधील काही आरोपींनी दादर येथील विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रश्नपत्रिका पुरवल्या. दरम्यान मुख्याध्यापक, दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाची मुलगी या सर्वांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतले.

परीक्षेदरम्यान आरोपी शिक्षकांनी परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका आल्या नंतर प्रश्नपत्रिकेचा मोबाइल द्वारे फोटो घेतला आणि तो शाळेत पाठवला. त्यानंतर या मुलांना गणिताचे पेपर विकण्यात आले होते. त्याची किंमत दहा हजार रुपये असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दादरच्या परीक्षा केंद्रवरील मुलांना ताब्यात घेतल्यावर त्या विद्यार्थ्यांकडून ही माहिती मिळाली, असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील घटना ताजी असतानाच मुंबईत दहा हजार रुपयात पेपर विकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Updated : 9 March 2023 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top