Home > मॅक्स एज्युकेशन > आता शालेय विद्यार्थ्यांची धमाल, अखेर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर

आता शालेय विद्यार्थ्यांची धमाल, अखेर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर

कोरोनानंतर शाळेचं वेळापत्रक बिघडलेलं असतानाच आता शालेय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे.

आता शालेय विद्यार्थ्यांची धमाल, अखेर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर
X

कोरोनानंतर शाळांचे वेळापत्रक बिघडले होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी मिळणार अशी चर्चा सगळीकडे सुरु होती. मात्र आता शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांना खुशखबर मिळाली आहे.

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून नुकताच पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील शाळांना २ मे पासून ११ जून रोजी पर्यंत सुट्टी असणार आहे.

पत्रकात म्हटले आहे कि, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २ मे पासून ११ जून दरम्यान उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे रोजीपासून सुट्टी लागणार आहे. तर १२ जून रोजीपासून शाळा नियमीतपणे सुरु होतील. मात्र विदर्भातील शाळांना २६ जून रोजीपर्यंत सुट्टी असणार आहे. तत्पूर्वी इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचा निकाल हे शाळांना ३० एप्रिल किंवा उन्हाळाच्या सुट्टीच्या काळातच जाहीर करावे, असे पत्रकात निर्देश देण्यात आले आहे. तसेच पालकांनी देखील याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Updated : 4 April 2023 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top