Home > मॅक्स एज्युकेशन > मोठी बातमी : पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात

मोठी बातमी : पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात

मोठी बातमी : पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात
X

राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर स्वरुप करत असल्याने आता राज्य सरकारने मोठा निर्णय़ घेतला आहे. कोवीड 19ची सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, राज्यभरातील सर्व राज्य मंडळांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यंना पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल, अशीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. पण 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. पण लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या शहरांमधील शाळा सुरू करण्यात आल्या नव्हत्या. पण रुग्ण पुन्हा वाढू लागल्यानंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर आता परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण पुढील वर्गांच्या नियोजित परीक्षा सध्या ठरल्याप्रमाणे ऑफलाईन होतील असेही सरकारतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Updated : 4 April 2021 4:13 AM GMT
Next Story
Share it
Top