Home > मॅक्स एज्युकेशन > डॉक्टर, इंजिनिअर, पी.एचडी, एमबीए पदवीधारकांचे तलाठी पदासाठी अर्ज..

डॉक्टर, इंजिनिअर, पी.एचडी, एमबीए पदवीधारकांचे तलाठी पदासाठी अर्ज..

डॉक्टर, इंजिनिअर, पी.एचडी, एमबीए पदवीधारकांचे तलाठी पदासाठी अर्ज..
X

राज्यात ४६०० तलाठी जागा रिक्त असून त्यासाठी डॉक्टर, इंजिनिअर, पीएचडीधारक, एमबीए पदवीधारकांसह दहा लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले असल्याची माहिती सरकारच्या भूअभिलेख विभागाकडून मिळाली आहे. या पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण राज्यभरात जिल्हा केंद्रांमध्ये स्पर्धा परिक्षा होणार आहे.

तलाठी हा राज्याच्या महसूल विभागातील गटातील क अधिकारी गावामधील कृषी उत्पादनाच्या संबंधित माहितीची नोंद ठेवण्याचे काम करतो. जमिनी संबंधित सर्व तपशील, पिकांची लागवड, पीक उत्पादन आदी सर्व माहिती नमूद करण्याचे काम तलाठी करीत असतो. त्याच्याकडील आकडेवारीवरुनच देशातील कृषी विभागाची सर्व आकडेवारी तयार होत असते. तलाठी क गटातील अधिकारी असतो ज्याला मासिक रु. २५५०० ते रु. ८११०० रुपये वेतन मिळते. यामुळे या पदासाठी राज्यातील उच्चशिक्षित उमेदवारांनी गर्दी केली आहे.

राज्य परिक्षा विभागाचे समन्वयक आणि भू अभिलेख अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ४६०० रिक्त तलाठी पदासाठी १०.५३ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण राज्यभरात जिल्हा केंद्रांमध्ये स्पर्धा परिक्षा होणार आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी ठेवली असली तरी एमबीए, पीएचडी, बीएएमएस, बीएचएमएस आणि इंजिनिअरींग असे उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Updated : 11 Aug 2023 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top