Home > मॅक्स एज्युकेशन > प्रोजेक्ट रीड अंतर्गत विविध ठिकाणी वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप

प्रोजेक्ट रीड अंतर्गत विविध ठिकाणी वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप

प्रोजेक्ट रीड अंतर्गत विविध ठिकाणी वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप
X

कल्याणच्या टीम परिवर्तन या युवकांच्या गटांच्या माध्यमाने एकलव्य- गाव तिथे ग्रंथालय ही मोहीम गेल्या काही काळापासुन सुरू आहे. आपल्याकडील वाचुन झालेली पुस्तकें गाव तिथे ग्रंथालय या मोहिमेसाठी नागरिकांनी द्यावीत यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमाने सातत्याने पुस्तक संकलन मोहीम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांत टीम परिवर्तनच्या माध्यमाने राबवल्या जातात. मोहिमेत जमा झालेल्या पुस्तकांच्या मदतीने ग्रामीण भागांत वाचनविषयक जागृती निर्माण करण्यासाठी छोटे ग्रंथालय तयार केले जाते. याचं मोहिमेत कल्याण शहरांतील स्टडी वेव्ह, अनुलोम आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्स या संस्था जोडल्या गेल्या आणि प्रोजेक्ट रीड नावांची एक नवीन संकल्पना उदयास आली.

गाव तिथे ग्रंथालय मोहिमेत जमा झालेली पुस्तके कल्याण पूर्व परिसरातील विविध शाळेत देण्यात आली. प्रत्येकी ५० इंग्रजी पुस्तकांचा एक संच याप्रमाणे १६ शाळात एकूण ८०० पुस्तकांचे वाटप यावेळीं करण्यात आले. त्याचबरोबर टिटवाळा दहिवली येथील युवा संस्कार बहुद्देशीय संस्थेस ३०० ज्ञानेश्वर माऊली सार्वजनिक ग्रंथालय संस्थेस ३०० आणि अंबरनाथ येथील सुनील चौधरी यांच्या पुस्तकांचे शहर मोहिमेस ३०० पुस्तके देण्यात आली. प्रोजेक्ट रीड अंतर्गत डिसेंबर महिन्यात वाचनाची अनोखी स्पर्धा आम्हीं घेणार आहोत असे स्टडी वेव्ह संस्थेचे उमाकांत चौधरी यांनी यावेळीं सांगितले. या उपक्रमास अनुलोम संस्थेचे रवींद्र माळी, रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सचे अध्यक्ष विरेशकुमार सक्ससेणा त्याचबरोबर स्टडी वेव्ह संस्थेचे गणेश पानसरे यांनी मोलाचे सहकार्य केले. रीड हा सामाजिक संस्थांचा एकत्रित उपक्रम अनेक दुर्गम भागांतील शाळांपर्यंत पोहचवण्याचा आमचा मानस आहे असे एकलव्य- गाव तिथे ग्रंथालय मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले. प्रोजेक्ट रीडच्या माध्यमाने इंग्रजी भाषेची भिती दुर करणे आणि मुलांना वाचनाची आवड निर्माण करणे ही आमची प्रमुख उद्दिष्ट आहेत असे सागर वाळके यांनी सांगितले.

Updated : 19 Oct 2018 11:15 AM GMT
Next Story
Share it
Top