Home > मॅक्स एज्युकेशन > संकल्प करुन विद्यार्थ्यांची नवीन वर्षाला सुरुवात

संकल्प करुन विद्यार्थ्यांची नवीन वर्षाला सुरुवात

संकल्प करुन विद्यार्थ्यांची नवीन वर्षाला सुरुवात
X

एक माणूस चांगली नोकरी सोडतो, बायकोचे दागिने विकतो, त्याची बायको ही आपला सर्व अनुभव, शक्ती पणाला लाऊन त्याच्या मागे उभी राहते. व्रतस्ता प्रमाणे ते गेली अनेक वर्षे तळागाळातील विद्यार्थ्थांना शिक्षण देऊन घडवण्याचं एक काम करतायत. माझे स्नेही जितेंद्र गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला गोस्वामी यांच्या चुनाभट्टीतल्या शाळेत आज मला बोलवलं होतं. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊन त्यांचं स्वागत केलं. वर्षभरात काय काय काम करायचं याचा संकल्प असलेल्या टोप्या सर्व विद्यार्थ्यांनी घातल्या होत्या. सतत दुसऱ्यांना टोप्या घालणाऱ्या आपल्या समाजात मुलांनी स्वतःहून घातलेल्या या टोप्या मोठा संदेश देत होत्या.

गोस्वामी दाम्पत्य आणि त्याचा शिक्षक वर्ग, सर्वच जण अवलिया सारखे आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा.

Updated : 15 Jun 2017 3:55 PM IST
Next Story
Share it
Top