Home > मॅक्स एज्युकेशन > एमपीएससी कृषी विषयासाठी अभ्यास टिप्स

एमपीएससी कृषी विषयासाठी अभ्यास टिप्स

MPSC चा निकाल जाहीर झालाय. 130 मुले व मुली विविध पदांकरिता उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

ज्यांचं या निकालात नाव नाही, त्यांनी बिलकुल निराश होऊ नका... something best stored for you या युक्तीवर विश्वास ठेवा... आणि पुनश्च हरिओम म्हणून नव्या जोमाने तयारीला लागा... एक लक्षात ठेवा, या अपयशामुळे तुम्ही जितके दिवस, जितका वेळ या विचारांमध्ये वेळ घालवाल तितके तुमचेच नुकसान होईल... तसेच तुम्ही ज्या प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिता ती केवळ तुमच्या बुद्धीचा नाही तर तुमच्या सहनशीलतेची संथ परिक्षा घेते.. त्याकरिता तुम्ही जेवढ्या लवकर परत तयारीला लागालं आणि परत कठोर परिश्रम घ्यालं, यश तुमची वाटत पाहत असेल.. आजचा आपला विषय आहे कृषी...

कृषीचा अभ्यासक्रम

1) कृषी परिस्थितीकी (Agroecology)

2) हवामान (Climate)

3) मृदा (Soils)

4) जल व्यवस्थापन (Water Managment)

Refernce पुस्तके

1) कृषी - कोळंबे

2) कृषी - सवदी

B.Sc Agriculture च्या नोट्स ज्या आपल्या MPSC Syllabus मधील टॉपीकशी संबंधीत आहेत तेवढा भाग काळजीपूर्वक वाचून घ्या.. कृषीमध्ये मृदा महत्त्वाची आहे.. त्या टॉपीकवर भर द्या..

https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

NCERT Geography मधील कृषीचा भाग 11 व 12 वी स्टेट बोर्डची कृषीची पुस्तके नीट अभ्यासा... जलव्यवस्थापनामधील सर्व भाग महत्त्वाचे आहेत.. विविध बांधारे, सिंचन पद्धती, जलयुक्त शिवार, गेल्या चार - पाच वर्षात महाराष्ट्रात जलव्यवस्थापनात वापरलेल्या पद्धती यांच्यावर भर द्या. Detail अभ्यास करा.

Agrieconimics करिता तुम्ही दत्त सुंदरम मधून तेवढा टॉपिक अभ्यासून घ्या..

अशा प्रकारे आपण GS- 1 आपण इथे पूर्ण करत आहोत..., माझा EMAIL ID मी सर्व मॅक्स महाराष्ट्रच्या MPSC विद्यार्थ्यांसाठी देत आहे... तुम्हाला MPSC चा अभ्यास कसा करावा याबाबत काही अडचण असल्यास नक्की संपर्क करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन... याखेरीज आपण लवकरच Max Maharashtra च्या पेजवर Facebook Live मध्ये भेटू... तोपर्यंत MISSION MPSC करिता शुभेच्छा...

Updated : 4 Nov 2020 6:49 PM GMT
Next Story
Share it
Top