Home > मॅक्स एज्युकेशन > अशी कराल राज्यसेवा पूर्व परिक्षेची तयारी

अशी कराल राज्यसेवा पूर्व परिक्षेची तयारी

अशी कराल राज्यसेवा पूर्व परिक्षेची तयारी
X

आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परिक्षा यांचा अभ्यासक्रम बघूया. राज्य सेवेतील क्लास 1 व क्लास 2(गट अ आणि गट ब) दर्जाच्या राजपत्रित अधिकारी पदासाठी ही परिक्षा घेतली जाते.

पूर्व परिक्षा करिता

पेपरमार्कस्वेळसर्वसाधारण स्वरूपमाध्यम
पेपर 12002 तासपदवी दर्जाचे प्रश्नइंग्रजी /मराठीobjective
पेपर 22002 तासदहावी,बारावी ते पदवी दर्जाचे प्रश्नइंग्रजी /मराठी objective

पेपर 1

1)चालू घडामोडी (Current affairs)

राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घटनांवर आधारित

2) भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, भारताची स्वातंत्र्य चळवळ

3)भूगोल- महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल

(भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोलासह)

4)भारतीय राज्यघटना, पंचायत राज, पब्लिक पॅलीसी, राज्यशास्त्र

5)आर्थिक व सामाजिक विकास, डेमोग्राफी , Sustainable development

6) पर्यावरण, वातावरणातील बदल, बायो डाव्हर्सिटी

7) सामान्य विज्ञान

CSAT (पेपर 2)

हा पेपर देखील 200 गुणांचा असतो

1) आकलन क्षमता

2)संवाद कौशल्ये, परस्पर संवादाची कौशल्ये

3)तार्किक व विश्लेषण क्षमता (logical reasoning analysis)

4)Decision- making and problem solving

5)सामान्य बौधिक क्षमता

6)Data interpretation (charts , ghraphs, tables) basic numercy

7)मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य

सर्वसाधारणपणे पेपर 2 हा 10 वी व 12 वी च्या अभ्यासक्रमाच्या दर्जेचा असतो. हे दोन्ही पेपर्स राज्यसेवा पूर्व परिक्षेचे compulsory आहेत.

स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी सध्या बरेच क्लासेस उपलब्ध असले तरी तुम्ही स्वतः अभ्यास करून देखील यश मिळवू शकता. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षेच्या काही टिप्स आपण पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत पूर्व परिक्षेच्या अनुषंगाने नोट्स काढण्याच्या तयारीला लागा.

स्पर्धा परिक्षेसाठी शुभेच्छा!!!!!

डॉ. रश्मी करंदीकर, उपायुक्त, ठाणे शहर पोलीस मुख्यालय

Updated : 3 Feb 2017 9:50 AM GMT
Next Story
Share it
Top