Home > मॅक्स एज्युकेशन > व्हॉट्सअॅप कॉपी आणि बरंच काही...

व्हॉट्सअॅप कॉपी आणि बरंच काही...

व्हॉट्सअॅप कॉपी आणि बरंच काही...
X

चक्क व्हॉट्सअॅपवरून महाविद्यालयात राजरोसपणे कॉपी

औरंगाबादमध्ये महावितरण परीक्षामध्ये झालेले हायटेक कॉपी प्रकरण ताजं असतानांच आणखी एक सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमधील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये परिक्षेत चक्क व्हट्स-अॅपच्या माध्यमातून प्रश्नोत्तरांची देवाण घेवाण सुरु होती. बीड रोडवर असलेल्या भालगाव येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांना याची ‘टिप’ लागताच त्यांनी छापा टाकून वेळीच हा प्रकार रोखला.

औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज पॉलिटेक्निक तिसऱ्या वर्षांची आणि बी. फार्मसी दुसऱ्या वर्षाची परीक्षा सुरु होती, पेपर सोडविण्यासाठी जरी कॉलेजमध्ये विद्यार्थी परीक्षांसाठी बसले होते. मात्र खरा पेपर सोडवण्यासाठी कॉलेजबाहेर धडपड सुरु होती. कॉपी पुरवण्याचा गोरखधंदा जोरात सुरू होता. काही विद्यार्थी पेपर सोडवतांना मोबाईल सोबत घेऊन बसले होते. व्हाट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवले जात होते. आणि तो प्रश्न पाहून कॉलेजबाहेर गाडीमध्ये बसलेले विद्यार्थी पुस्तकातून त्याचे उत्तर कापून ती चिठ्ठी आतमध्ये पाठवत होते, हा सर्व प्रकार अगदी शांतपणे सुरु होता.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकत हा सर्व प्रकार उद्धवस्त केला. या प्रकऱणात पोलिसांनी ५ विद्यार्थी आणि एका पालकालाही ताब्यात घेतले आहे. कॉलेजच्या प्राचार्य मात्र हा सगळा प्रकार बाहेर सुरु होता असे सांगत, चौकशी करू म्हणत हात झ़टकण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी काही मोबाईल सुद्धा जप्त केले आहेत. तर पेपर झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा पेपर बाहेर पाठवणा-या आणखी दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मात्र या निमित्ताने अनेक प्रश्न समोर उपस्थित होत आहे.

परीक्षा गृहात मोबाईलला बंदी असताना, मोबाईल आत गेला कसा?

परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी जाताना त्यांची चौकशी केली जात नव्हती का?

तर परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी मोबाईल मधून फोटो काढून बाहेर येई पर्यंत वर्गातील परीवेक्षक काय करत होते?

त्यांना हे सर्व प्रकार लक्षात आले कसे नाहीत?

आणि जर लक्षात आले असेल तर त्यांनी स्वतः कारवाई का केली नाही?

विशेष म्हणजे व्हाट्सएपच्या माध्यमातून पेपर बाहेर पाठवले जात होते तर त्याचे उत्तर गाईडमधून सोडवलेले

उत्तरॆ बाहेरून आत कसे जात होते?

हे महत्वाचे प्रश्नं आहेत. तसेच पोलिसांनी या सर्व प्रकारमध्ये महाविद्यालयाततील काही लोकांचा सहभाग असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जर महाविद्यालयचा सहभाग असेल तर ही खूप गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे या सर्वप्रकारचा तपास होईल का आणि यातील सर्व दोषींवर कारवाई होणार का?, हा खरा प्रश्न आहे.

Updated : 20 Nov 2017 11:11 AM GMT
Next Story
Share it
Top