विद्यार्थ्यांचे भविष्य काळे करणाऱ्या कुलगुरुंची गाडी काळी करू
X
भारतातील सगळ्या विद्यापीठाचे निकाल लागले असून मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीतच गुंग आहे. काहीतरी वेगळे आणि ऐतिहासिक करण्याच्या नादात कुलगुरूंनी घेतलेला एकहाती अवेळी घेतलेला निर्णय निकाल दिवाळी दसरा दाखवेल असा अंदाज प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष adv मनोज टेकाडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कुलपतींनी ''आज कुछ तुफानी करते है'' या अविर्भावात वावरणारे कुलगुरूं संजय देशमुख यांना बडतर्फ करून घरी पाठवावे अशी मागणी 'प्रहार विद्यार्थी संघटने'ने आणि 'राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता मंच' ने करीत काही सूचना केल्या आहेत..
लवकर निकाल लावण्याबाबत प्रहार च्या सूचना व उपाय
- प्राध्यापकांना 5 दिवस कॉलेज शिकवणी कामातून मुक्तता देऊन पेपर तपासणी करून घ्यावी.
- पेपर विभागणीचा ताळेबंद करून घ्यावा व किती पेपर तपासून झाले आणि किती बाकी आहे याची रोज प्राध्यापकाकडून माहिती घेऊन website वर उपलब्ध करून द्यावी..
- online सोबत उर्वरित पेपरची ofline तपासणी सुरू ठेवावी.कारण तेवढे संगणक उपलब्ध नसल्याने प्राध्यापकांना OSM सेन्टर वर तात्कळत उभे रहावे लागते..
- external व internal /practical गुणांची सांगड घालण्यासाठी दोन्ही (MKCL and आता osm करणारी कंपनी) कंपन्याना युद्धपातळीवर काम करण्याची ताकीद द्यावी..
- कुलगुरूंनी प्राध्यापकांना उपदेश देणे बंद करून OSM ची जबाबदारी टाकलेल्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर लक्ष द्यावे. जे प्राचार्य प्राध्यापकांना पेपर तपासणीपासून दूर ठेवतात अशा प्राचार्याचे aproval काढावे. जेणेकरून आता पेपर तपासणी करणाऱ्या प्राध्यापकांवर अतिरिक्त भार येणार नाही.
- यापुढे उत्तर पत्रिका कॉलेज ला पाठवून आधी ofline तपासणी करून निकाल जाहीर करावा,
OSM च्या मध्ये दोष काय ?
- पेपर स्कॅनिंग मध्ये जवळपास दीड महिना लागला असून पेपर 15 जून पासून अपलोड होणे चालू झाले.म्हणजे परीक्षा संपून जवळपास 2 महिन्यानंतर पेपर तपासणीसाठी उपलब्ध झाले.
- जवळजवळ सर्वच प्राध्यापकांना स्वताचा विषय सोडून इतर विषयाचा पेपर तपासणी साठी आला यातून पेपर विभागणीचा घोळ लक्षात येतो. उत्तर पत्रिका तपासणीच्या लॉगिन मध्ये बऱ्याचदा OTP घोळ होतो व त्यामुळे प्रत्येक वेळा 15 ते 30 मिनिटे वाया जातात.
- एकाचवेळी संगणक संख्येपेक्षा जास्त प्राध्यपक आल्यास इतर प्राद्यापकांना ताटकळत बसावे लागते..
- प्राध्यापकांना कॉलेजची कामे उरकून पेपर तपासणीला जावे लागते त्यामुळे त्यांची दमछाक होत आहे.
- उत्तर पत्रिका on screen loading ला वेळ लागतो त्यामुळे आधीच्या पेपर तपासणी पेक्षा डबल अधिक वेळ लागतोय..
कुलगुरूंचे काय चुकले
- online पेपर तपासणीचा निर्णय कुठल्याही प्राद्यापक विध्यार्थी यांना विश्वासात न घेता घेतला..
- ऑक्टोबर परीक्षेला online पेपर तपासणी लागू करून प्रयोग करून बघायला हवा होता..म्हणजे फायनल परीक्षेच्या वेळी सुधारणा करून विद्यार्थ्यांचे करिअर टांगणीला लागले नसते...
- या पद्धतीमुळे परीक्षा फी वाढ झाली हे कुलगुरू यांनी विचारात घेतले नाही.
- आधीचीच पेपर कॉलेज ला उत्तरपत्रिका पाठविण्याची पद्धती बरोबर होती तीलाच व्यापक स्वरूप दयायला हवे होते..
- परीक्षा ofline आणि तपासणी online नुसती उठाठेव करणारा निर्णय.
- स्वताच्या निर्णयाचे खापर प्राध्यापकांवर फोडून प्राद्याकांची नाराजी ओढवून घेतली.
- प्राध्यापकांना OSM software ची माहिती देणारे प्रशिक्षण दिले नाही.
OSM म्हणजे काय?
On screen marking
निकालाचे भवितव्य काय
व विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल
- Internal परीक्षेचे गुण हे MKCL कंपनी कडे आहेत आणि उत्तर पत्रिका तपासणीचे काम दुसऱ्या कंपनी कडे आहे तर निकाल लावतांना दोन्ही गुणांच्या आधारे लावावा लागेल त्यामुळे अजून विद्यापीठाची दमछाक होणार आणि पर्यायाने निकाल अजून उशिरा लागणार...
- मार्कशीट हातात द्यायला परत उशीर होणार
- विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी जास्त गोंधळ होण्याची शक्यता आहे
- निकाल 31 jully ला शक्यच नसून सप्टेंबर महिन्यात लागेल अशी एकंदर परिस्थिती आहे.
- परदेशी शिक्षणाला विद्यार्थ्यांना मुकावे लागेल..
- पदवित्तर शिक्षणाचे प्रवेश उशिरा होतील आणि नौकरी लागणाऱ्या विद्यार्थ्यांचे पण खूप मोठे नुकसान होऊन त्याचा करिअर चा खेळखंडोबा होईल.
- पदवित्तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि निकालावर खूप मोठे दूरगामी परिणाम होतील.
- OMS मुळे 2000 रुपयांनी वाढलेली परीक्षा फी पुढील वर्षी परत वाढणार..
OSM चा फायदा काय
UGC च्या गाईड लाईन ची अंमलबजावणी करतांना कुलगुरूंनी तयारी केली नाही आणि पसंतीच्या कंपनीला टेंडर मिळावे यासाठी घाई केली नाहीतर OSM पद्धतीने दोन गोष्टी चांगल्या होणार होत्या
- Revaluation चा निकाल लवकर लागेल
- उत्तरपत्रिका तपासताना ज्या मानवी त्रुटी असायच्या त्या होणार नाही..