Home > मॅक्स एज्युकेशन > माचिसचा शोध कधी आणि कोणी लावला?

माचिसचा शोध कधी आणि कोणी लावला?

माचिसचा शोध कधी आणि कोणी लावला?
X

माचिसचा शोध मनुष्यासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणता येईल. माचिसमुळे कुठल्याही प्रकारची मेहनत न करता अगदी सहज आग निर्माण करता येते. आता तर घराघरात माचिसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालाय. मात्र माचिसची निर्मिती कधी आणि कुठे झाली याबद्दल आपल्याला माहिती आहे का? तर जाणून घेऊयात माचिसची कहाणी…

माचिसचा शोध 31 डिसेंबर 1827 रोजी ब्रिटनमधील शास्त्रज्ञ जाॅन वाॅकर यांनी लावला. वाॅकरने माचिसचा शोध तर लावला पण त्यांनी बनवलेल्या माचिसला पेटवायला खूप मेहनत लागत होती. आणि उपयोग करण्यासाठी धोकाही पत्करावा लागत. ही माचिस बनवायला लाकडाची काडी, एंटीमनी सप्लाईड, पोटासियम क्लोरेट, आणि बाबळाच्या झाडाची चिक्की लावण्यात येत होती. मात्र, कधी-कधी या माचिसचा वापरत असताना स्फोट व्हायचा.

काही वर्षांनंतर या माचिसमध्ये सुधारणा करुन फ्रांसमध्ये 1832 साली ऐंटीमनी सफ्लाईड रसायनाच्या ऐवजी फाॅस्फरसचा प्रयोग करण्यात आला. मात्र, याचा दुष्परिणाम होऊन कारखान्यातील अनेक कामगारांना क्षयरोगामुळे आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळेच माचिस निर्मितीचे कारखाने बंद करावे लागले.

कालांतराने स्विडन येथे 1855 साली दुस-या रासायनिक पदार्थाचे मिश्रण करुन माचिस बनवली. ही माचिस उपयोगासाठी सुरक्षित ठरली. आपण आजही घराघरात याच माचिसचा उपयोग करतो. भारतात पहिला माचिस कारखाना गुजरात येथील अहमदाबाद येथे 1927 साली सुरू करण्यात आला.

Updated : 16 Sep 2018 2:42 PM GMT
Next Story
Share it
Top