Home > मॅक्स एज्युकेशन > फडणवीसजी, ऐका शिक्षकांचं गाऱ्हाणं

फडणवीसजी, ऐका शिक्षकांचं गाऱ्हाणं

फडणवीसजी, ऐका शिक्षकांचं गाऱ्हाणं
X

राज्यभरात ऑनलाईन प्रशासकीय कामांविरोधात शिक्षकांचे आंदोलन जोर धरू लागले आहे. शालेय शिक्षण विभागाने जे डिजिटल प्रयोग सुरु केले त्याचा वापर करताना या गोष्टींचा अतिरेक होत आहे. शासनाने राज्यभरातल्या शाळेत कोणतीही सुविधा न देता ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक कामे करणे सक्तीचे केले आहे.

शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांची पटनोंदणी असो शाळेतील जे काही कामे आहे ती सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने केली पाहिजे. परंतु या सर्व बाबी लक्षात घेता आणि या ऑनलाईन प्रणालीमध्ये कामे करण्यासाठी ज्या साधनांची गरज असते त्याची सुविधाचं शासनाने दिलेली नाही. संगणक, डाटा पॅक, इंटरनेट तसेचं कोणतीही मानवी मदत ऩाही, ऑनलाईन पद्धतीचे प्रशिक्षण नाही, अधिक मनुष्यबळही नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षकांनी सुलभकाची भूमिका बजवावी असं शासन म्हणतं परंतु यांसाठी लागणाऱ्या यंत्रणा कुठेय? शासन आपली जबाबदारी झटकत आहे. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय. प्रत्येक शाळेतील शिक्षक ऑनलाईनच्या कचाट्यात अडकून राहिलेला आहे.आमची मागणी अशी आहे की आम्ही या ऑनलाईन पद्धतीला विरोध करत नसून शासनाने योग्य त्या यंत्रणांची सुविधा उपलब्धता करुन द्यावी. असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितलंय...

तसेच ऑनलाईन कामाचा बोजा वाढल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होत आहे. आम्हा शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी निवडले गेले आहे जर शासनाने ऑनलाईन पद्धतीसाठी ऑपरेटर दिला तर आम्हा शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे अधिक प्रमाणात लक्ष देता येईल असे शिक्षक के. पी. पाटील यांनी म्हटलंय… शिक्षकांची या ऑनलाईन कचट्यातून सुटका होईल का ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=uft7-KcCa1M

Updated : 19 Sep 2017 2:09 PM GMT
Next Story
Share it
Top