Home > मॅक्स एज्युकेशन > तयारी MPSC च्या मुख्य परिक्षेची

तयारी MPSC च्या मुख्य परिक्षेची

तयारी MPSC च्या मुख्य परिक्षेची
X

मराठी व इंग्रजी (अनिवार्य)

एमपीएसची पूर्व तयारी करता करता तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे. मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा खूप विस्तृत अभ्यासक्रम आहे. त्यामुळे किमान वर्षभर सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे.

राज्यसेवा मुख्य परिक्षेचे स्वरूप

पेपर 1 - मराठी (अनिवार्य)

तुम्ही महाराष्ट्र शासनाचे राजपत्रित अधिकारी म्हणून करिअर घडवू इच्छित असाल तर तुम्हाला मराठी येणे आवश्यक आहे. या पेपरचे स्वरूप सर्वसाधारणपणे 12 वीच्या दर्जावर असते. 100 मार्कस चा हा पेपर असून कालावधी 3 तासाचा असतो.

1) निबंध

2) इंग्रजी उताऱ्याचे मराठी भाषांतर

3) सारांशलेखन

4) पत्र/अर्ज/अहवाल/तक्रार/विनंती/शुभेच्छा/पत्र

5) व्याकरण

पेपर 2- इंग्रजी (अनिवार्य)

हा पेपर देखील 12 वीच्या अभ्याक्रमावर आधारित असतो. 100 मार्कच्या या पेपरला 3 तासाचा कालावधी असतो.

1) Eassy

2) Translation of Marathi passage into English

3) Précis - writing

4) Letter/Application/Report/Complain

5) Grammar

इंग्रजी व मराठी या दोन्ही पेपर्सचा अभ्यास सोप्पा आहे. परंतू बऱ्याचवेळी अभ्यास सोप्पा असेल तर आपण ते शेवटी करण्याचा ठरवतो किंवा कमी वेळ देतो. थोडक्यात दुर्लक्ष करतो. खरंतर या दोन्ही पेपर्समध्ये आपण स्कोर करू शकतो. मुख्य/पूर्व परिक्षेचा अभ्यास करताना आपल्याला ब्रेक घ्यावास वाटतो. कधी कधी 10 मिनिटाचा अर्ध्या तासाचा किंवा 1 तासापर्यंत वाढतो. कारण सतत G.S चा अभ्यास करून आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो. अशावेळी हा ब्रेक /टाईमपास टीव्ही बघण्यात वगैरे आपण व्यतीत करतो. खरंतर अशावेळी आपण मुद्दाम मराठी/इंग्रजीचा अभ्यास केल्यास G.S च्या अभ्यासातून ब्रेक मिळतो. दोन्ही विषय तुलनात्मक दृष्ट्या G.S पेक्षा वेगळे असलयाने व सोप्पे असल्याने अभ्यास पटन होऊन जातो. त्यामुळे तुमचे स्पर्धा परिक्षेचे टाईमटेबल तयार करताना असे ब्रेक घेण्याचे तास शोघून काढा आणि त्यामध्ये इंग्रजी व मराठीची तयारी पक्की करून घ्या.

राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या G.S 1 पेपरकडे वळण्याआधी मराठी आमि इंग्रजीचे सिलॅबस पाहून घ्या आणि त्यासाठी मराठी व इंग्रजीची इ.10वी, 11 वी, व 12 वीची पुस्तके, व्याकरण आणि पत्रलेखन याकरिता पूरक पुस्तकांची तयारी करा.

डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, ठाणे पोलीस मुख्यालय

Updated : 9 Feb 2017 8:29 PM GMT
Next Story
Share it
Top