Home > मॅक्स एज्युकेशन > एमपीएससी मुख्य परिक्षा अभ्यास टिप्स

एमपीएससी मुख्य परिक्षा अभ्यास टिप्स

खरं तर पूर्व परिक्षेच्या किमान 6-7 महिने आधी मुख्य परिक्षेचा संपूर्ण अभ्यास पूर्ण केलेला असेल तर पूर्व परिक्षा संपल्यावर आपण थोड्या relax वातावरणात मुख्य परिक्षेची रिव्हीजन चांगल्या रितीने करू शकतो.

सर्वसाधारपणे चार महिने मुख्य परिक्षेच्या तयारीसाठी आणि 1 महिना पेपर सरावासाठी हातात असणे आवश्यक आहे. तुमची मुख्य परिक्षेची संपूर्ण तयारी आधी झालेली असेत तर हा कालावधी अजून थोडा कमी होईल.

प्रश्नपत्रिका सोडवण्याची प्रॅक्टीस न चुकता करणे आवश्यक आहे. जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका घड्य़ाळ लावून सोडवाल, तेवढा फायदा मुख्य परिक्षेत होईल. शक्य असल्यास एक गजराचे घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवण्यास बसावे. त्यावेळी कोणताही disturbance तुमच्या बाजूला नको. अलार्म लावताना पण 10 मिनिटं आधीचा लावावा म्हणजे शेवटची 10 मिनिटं तुम्हाला तुमच्या हातात मिळतील. जुन्या प्रश्नपत्रिका, जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच या सर्वांचा तुम्हाला यासाठी उपयोग होईल.

GSI

इतिहास - इतिहास हा आवडीने वाचला तर तो रूक्ष न वाटता INTERESTING वाटेल. इतिहासाच्या मुख्य परिक्षेसाठी असलेली पुस्तके नीट वाचून घ्यावीत. इंग्रजीमध्ये SPECTRUM आणि बिपिन चंद्रांची पुस्तके खूप DETAILED आहेत. NCERT ची सहावी ते बारावीची पुस्तके इतिहासाकरीता महत्त्वाची आहेत. आता NCERT मराठी/हिंदी उपलब्ध असतील तर त्यांच्यावरूनही नोट्स काढता येतात. इतिहासाच्या अभ्यासाचे प्रमुख टप्पे

१) आधुनिक भारताचा, विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७)

२) ब्रिटीश सत्तेची भारतात स्थापना

३) सामाजिक व आर्थिक बदल

४) भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास

५) सामाजिक व आर्थिक जागृती

६) गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ

७) स्वातंत्र्योत्तर भारत

८) महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक

९) महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक)

MORDEN EDUCATION , प्रेस, रेल्वे यावर जास्त लक्ष द्यावे.

१८५७ चा उठाव

तैनाती फौजा, गांधीयुग, राष्ट्रीय चळवळ, आंबेडकर व त्यांची चळवळ, डावी चळवळ, आदीवासी चळवळ या सगळ्या मुद्द्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जे.पी आणि इमरजन्सी, नेहरू इरा व इंदिरा गांधी, बांगलादेश निर्मिती या बाबीपण नीट वाचव्यात. विद्यार्थी चळवळी देखील नीट वाचाव्यात.

महाराष्ट्रातील समाजसुधारक

तुम्ही यापूर्वी पूर्व परीक्षेसाठी सविस्तर रितीने समाजसुधारकांच्या नोट्स तयार करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका नीट अभ्यासल्या तर समाजसुधारक व इतर प्रश्नांचा ट्रेंड तुमच्या लक्षात येईल. त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यासावर फोकस करता येईल. महाराष्ट्राचा सांस्कृतीक वारसा, यामध्ये लोकनृत्य, लोकगीते, चित्रपट इत्यादी प्राचीन सांस्कृतीक वारसादेखील नीट अभ्यासावा.

राज्यसेवा मुख्य परिक्षा

GSI (इतिहासासाठी संदर्भ पुस्तके)

1) आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर व बेल्हेक

2) आधुनिक भारत - बिपिन चंद्र

3) NCERT इतिहास 6 ते 12 वी

4) आधुनिक भारताचा इतिहास – जयसिंग पवार

5) SPECTRUM HISTORY

6) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या इतिहास नोट्स

7) IGNOU च्या इतिहास नोट्स

Updated : 3 March 2017 12:04 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top