Home > मॅक्स एज्युकेशन > एमपीएससी पूर्व परिक्षा अभ्यास टिप्स

एमपीएससी पूर्व परिक्षा अभ्यास टिप्स

आज आपण पूर्व परिक्षेकरिता अभ्यासाच्या काही टीप्स बघू या. ज्या सर्वसाधारणपणे 1 वर्षाचा व्यवस्थित अभ्यास तसंच पूर्व व मुख्य परिक्षांची नीट तयारी करता आवश्यक आहेत.

1) प्रत्येक विषयासांसाठी आपली एक book-list स्वतंत्रपणे तयार करावी.

2) स्वतः नोट्स काढण्याची प्रॅक्टीस करावी.

3) प्रत्येक विषयाच्या नोट्स काढताना दोन्ही बाजूला समास ठेवावे. यामध्ये आपण वेगळ्या शाईने मुद्दे लिहू शकतो.

4) दुस-या समासात आपल्याला काही addition points नंतर add करायचे असतील तर वापर करता येईल.

5) पूर्वीच्या प्रश्नपत्रिका तपासून नोट्सच्या त्या त्या भागात त्याप्रमाणे highligheter ने marking करून घ्या, नोट्स रिविजन करताना उपयोगी पडतील.

6) Current Affairs चे विषय दर दोन महिन्यांनी बदलत असतात त्यामुळे त्याच्या नोट्स स्वहस्ताक्षरात काढणयापेक्षा Current Affairs मॅगझीन मधून काढून फाईल तयार करा.

7) Current Affairs करिता चांगली इंग्रजी मॅगझीन्स वापरा. इंटरनॅशनल, नॅशनल आणि मराठी वृत्तपत्रांमधील महत्त्वाच्या घडामोडी नजरेखालून घाला.

8) संपूर्ण नोट्स तयार झाल्यावर रिविजन करताना लिंक पद्धतीचा वापर करा. इतिहासाच्या सनावळ्या पाठ करताना ही लिंक पद्धत फार उपयोगी पडते. इतिहासाचे छोटे छोटे टप्पे तयार करून ते एकत्रितरित्या लक्षात ठेवा

9) रिविजन करताना कोरे कागद घेऊन बसावे. एका भागाची उजळणी झाली की त्याचे महत्त्वाचे मुद्दे कोऱ्या कागदावर उतरवावे. अश्या रितीने रिविजन केल्यास विषय पक्का होण्यास मदत होते.

10) एमपीएससीसाठी संदर्भ पुस्तके, एनसीआरटीची पुस्कते शहरातील लायब्ररीमध्ये उपलब्ध होऊ शकतील.

11) अभ्यासाचे टाईमटेबल तयार करताना परिक्षेची तारिख लक्षात ठेऊन त्याप्रमाणे पूर्वनियोजन करावे. पुरेसा वेळ नियोजनला त्या टाईमटेबलमध्ये ठेवावा.

शक्यतो अभ्यासिका / लायब्ररीत अभ्यास केल्यास आजूबाजूला अभ्यासाला पूरक वातावरण आपोआपच मिळते. आणि महत्त्वाचे म्हणजे टाईमपास कमी होतो.

टाईमटेबलमध्ये दिवसाचे ठरलेले नियोजन पूर्णझाल्या खेरीज झोपू नका. त्याकरिता जेवढ्या त्या दिवसात पूर्ण होईल तेवढचं टारगेट द्या. रविवारी तुम्ही रिविजन आणि पेपर सोडवण्याकरिता वेळ राखून ठेऊ शकता. टाईमटेबलमध्ये दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक असे टप्पे ठेवा.

डेली टारगेट, विकली टारगेट पूर्ण करण्याचा संपूर्ण प्रयत्न करा.

CSAT ची तयारी

1) रोजच्या टाईमटेबलमध्ये सीएसएटीच्या तयारीसाठी वेळ राखून ठेवा.

2) रोज गणितं आणि REASONING चा सराव करा.

3) सीएसएटीच्या मराठी आणि इंग्रजी दोन्ही उताऱ्यांचा सराव करा, ज्या भाषेत तुम्हाला उतारे सोप्पे वाटतील (इंग्रजी व मराठी) त्या भाषेत उतारे सोडवण्याचा प्रयत्न करा.

4) उतारे वेगवेगळ्या विषयाशी संबंधित असतात (सायन्स, GEOGRAPHY) त्यामुळे त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या विषयात चांगली पुस्तके उलबध आहेत.

5) उताऱ्यात लेखकाने जे सांगितले आहे त्याचाच उत्तर देताना वापर करावा.

6) रिझनिंग हा देखील महत्त्वाचा टॉपीक आहे. त्याचा सराव व्यवस्थित करावा य याप्रश्नाकरिता देखील जुन्या पेपर्सचा अभ्यास करणे फायदेशीर ठरेल.

7) सीएसएटीचा पेपर सोडवताना प्रथम सोप्पे प्रश्न सोडवून घ्यावो. सर्व प्रश्न सोडवताना घडाळ्याकडे सतत लक्ष असू द्या. या विषयाची प्रॅक्टिस करताना टायमर लावून त्यावेळेतच प्रश्न सोडवण्याची सवय लावून घ्या.

8) सुरूवातीला टायमर लावून सोडवणे अवघड वाटेल. विशेषतः अवघड गणित रिझनींग रविवारी अश्या प्रकारे प्रॅक्टीस करण्यासाठी वेळ राखून ठेवा. उतारे देखील वेळ लावून सोडवण्याची प्रॅक्टीस करा.

मला बरेच जण विचारतात की एमपीएससीसाठी क्लास लावायलाच पाहिजे का?

क्लास जरी लावला तरी तुमच्या स्वयंअध्ययनाला पर्याय नाही. तुम्ही स्वतः देखील पुस्तकाच्या मदतीने व अभ्यासाने ही परिक्षा पास होऊ शकता. अर्थात त्यांच्यासाठी गरज आहे तुमच्या सातत्याने अभ्यास करण्याची. ही परिक्षा म्हणजे तुमची कॉलेजची परिक्षा नाही, ज्यात 35 टक्के पेक्षा जास्त मार्क्स असतील तर पास आहे. इथे दरवर्षी कटऑफ मार्कस वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या कट ऑफकडे पण न बघता तुम्ही तुमचा अभ्यास 110 टक्के करा. टाईमपास बिलकूल करू नका. अभ्यास करताना खूप प्रलोभने येतील. कदाचित तुमचा मित्र परिवार तुम्हाला क्रिकेट किंवा चित्रपटासाठी विचारतील. तुम्हाला तुमची प्रायऑरिटी स्वतः ठरावावी लागेल. तुम्ही स्वतःला आवडत्या चित्रपटाची किंवा एखाद्या क्रिकेट मॅचची भेट देऊ शकता. पण, त्या आधी तुमचा तेवढा ठरवलेला अभ्यास पूर्ण झाल्याची खात्री करा आण नंतर रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही ब्रेक घ्या. अर्थात हा ब्रेक किती तासांचा होतोय हे पण तपासत राहा

तुम्ही सातत्याने बनवलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थित अभ्यास केल्यास "मिशन एमपीएससी" नक्कीच पास करू शकता.

Updated : 18 Feb 2017 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top