उत्पन्नाच्या दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
Max Maharashtra | 7 Nov 2017 10:46 AM GMT
X
X
आज विद्यार्थी दिवस असून धुळ्यातील साक्री शहरातले विद्यार्थी चांगलेच संकंटात सापडले आहे. विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मिळत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून उत्पन्न दाखले बंद झाल्याने स्थानिक तहसीलदार आणि तलाठी आणि महाऑनलाईन सेवा या तीन ठिकाणी फेऱ्या मारून मारून विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होताना दिसून येत असल्याचे चित्र मॅक्स महाराष्ट्राने समोर आणले आहे.
साक्री तालुका हा राज्यात सर्वात मोठा तालुका मानला जातो, मात्र सुविधांच्या नावाने नेहमी बोंबाबोंम आहे. शाळेत शिषवृत्तीसाठी उत्पन्न दाखला गरजेचा असतो मात्र गेल्या 15 दिवसांपासून विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि तलाठी यांनी विद्यार्थ्यांची समस्या तात्काळ सोडवावी. विदयार्थ्यांना उत्पन्न दाखले त्वरीत देण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे.
Updated : 7 Nov 2017 10:46 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire