Home > मॅक्स कल्चर > थोर पंजाबी शिवचरित्रकार : डॉ. बाळकृष्ण

थोर पंजाबी शिवचरित्रकार : डॉ. बाळकृष्ण

थोर पंजाबी शिवचरित्रकार : डॉ. बाळकृष्ण
X

छत्रपती शाहू आणि राजाराम महाराज या दोघांनी १८८२ साली पंजाबमध्ये जन्मलेल्या एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तरुणाला आपल्या संस्थानात सन्मानाने निमंत्रित केले. लाल मुन्शीराम उर्फ स्वामी श्रध्दानंद यांच्या गुरुकुल कांगडी विद्यापीठाचे कुलपती म्हणून कार्यरत असणाऱ्या थोर विद्वानाला आपल्या संस्थानामध्ये आणणे ही दुरदृष्टीची बाब म्हणावी लागेल.त्यापूर्वी डॉ.बाळकृष्ण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत होते. लालालचपत राय, सरदार अजित सिंग, गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबरोबर १९०८-०९ सालात ़डॉ. बाळकृष्ण अग्रेसर होते. अचानक ते स्वामी दयानंद यांच्या आर्यसमाजात ओढले गेले.

मुलतान, पंजाबमधल्या एका क्षत्रिय कुटूंबात जन्मलेला हा मुलगा गरीब घरातला होता. तो शिलाईची कामे करुन कुटूंबाला हातभार लावीत होता. त्याच्या आयुष्याला अचानक वळण लाभले. त्याच्या प्रखर बुद्धिमत्तेचा प्रत्येय आला तो प्रथम वर्गात प्रथम क्रंमाकाने उत्तीर्ण झाला तेव्हा. ते लाहोरला बी.ए झाले. शासकीय कॉलेजमधून एम.ए उत्तीर्ण झाले. मध्यंतरी स्वातंत्र्य संग्रामात ओढले गेले. मात्र १९१९मध्ये इंग्लडला गेले.१९२२ मध्ये लंडन विद्यापीठात त्यांनी पीएचडीचा अभ्यास सुरु ठेवला त्याच काळात ऑक्सफड, मॅंचेस्टर, वेल्स, स्कॉटलंड आणि अनेक ठिकाणी वैदिक धर्म आणि लंडनमधली अर्थव्यवस्था अशा विषयांवर त्यांनी व्याख्याने दिली. छत्रपती शाहू महाराजांच्या विनंती नुसार त्यांनी राजाराम कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा शेवटच्या श्वासापर्यंत ( २१ ऑक्टोबर १९४०) सांभाळली.

१९३३-३४ च्या काळात आर्य समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यंानी शिकागो च्या जागतिक परिषदेत भाग घेतला हिंदू धर्म- संस्कृती या विषयावर अमेरिकेत न्यूयॉर्क, हार्वर्ड, कोलंबिया विद्यापीठ, डेट्राॅईट अशा अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. त्या सर्व ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. भारतात परतल्यावर युरोपमधल्या राजकीय परिस्थितीवर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. भारताच्या अनेक शहरात ते नामवंत व्याख्याते म्हणून प्रसिद्ध पावले. १९२२ साली राजाराम कॉलेजच्या आर्टस शाखेत २९३ विद्यार्थी होते. डॉ. बाळकृष्ण यांच्यामुळे लवकरच विज्ञान शाखा सुरु झाली व तिथे ९२० विद्यार्थी दाखल झाले. कोल्हापूरला शैक्षणिक शहराचा दर्जा त्यांच्यामुळेच लाभला. लॉ कॉलेज, बी.एड कॉलेज त्यांनी सुरू केली. सेकंडरी एज्युकेशन संचालक म्हणून १९२६ ते१९३६ त्यांनी काम पाहिले. किंबहुना त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्वप्न पाहिले.

डॉ. बाळकृष्ण अनेक जागतिक संस्थांशी जोडलेले होते. फेलो ऑफ इकॉनोमिक सोसायट, रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी लंडन. मेंबर ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई, मेंबर ऑफ दि इकॉनोमिक असोशिएशन अमेरिका, फेलो ऑफ दी युनिवर्सिटी, ते हिस्टॉरिकल रेकॉर्डस् कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बॉंम्बे प्रेसिडेन्सी टीचर्स कॉनफरन्स पुणे १९३५ आणि मॉडर्न हिस्टरी सेक्शन ऑफ हिस्टरी कॉँग्रेस अलाहाबाद १९३८ चे अध्यक्ष राहिले.

ही थोर व्यक्ती कोल्हापूरच्या जनतेशी, इतिहासाशी समरस झाली होती. कोल्हापूर नगरपालिका, इलाखा पंचायत याचे ते सदस्य बनले. कोल्हापूर आर्यसमाज व शैक्षणिक बोर्डचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. कोल्हापूर शिक्षक संघटनेचेही ते अनेक वर्ष अध्यक्ष होते.

विद्वान लेखक म्हणूनही त्यंाची कारकीर्द फार थोर होती. विविध विषयांवर त्यांनी अधिकार स्पष्ट केला. धर्ण, संस्कृती, अर्थशास्त्र, राजकारण आणि इतिहास यावर त्यांनी चौफेर लिखाण केले. त्याच प्रतिभेने आपल्या आयुष्याची १८ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य यावर ४ खंडात १६५० पानी ग्रंथ लिहिला.त्याचे नाव’’ Shivaji the Great’’. छत्रपती शाहूच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी डॉ. बाळकृष्णांना अत्यंत आदराने वागवले व त्यांनी लिहिलेले ग्रंथ प्रकाशित केले. दुर्देवाने छ. राजाराम महाराज आणि त्यापाठोपाठ डॉ. बाळकृष्ण यांचेही निधन झाले.

डॉ. बाळकृष्णाची पहिली पत्नी वारली आणि त्यांनी महाराष्ट्रीयन महिलेशी विवाह केला (१९२५). त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा व तीन मुली तर दुसऱ्या पत्नीपासून ४ मुली व एक मुलगा झाला. दुसऱ्या पत्नीचे नाव राधाबाई बाळकृष्ण असे होते. डॉ. बाळकृष्ण यांनी आपले मराठीतील आत्मचरित्र किर्लोस्कर मासिकात १९३५ साली क्रमश: प्रसिद्ध केले.

डॉ. बाळकृष्ण आणि श्री. सदाशिव राव बेनाडीकर ( क्षात्रजगद्गुरू) या चर्चा, गाठीभेटी होतं.

अलीकडे ''शिवाजी दी ग्रेट’’ या ग्रंथाच्या खंडांचे पुर्नमुद्रन झाले आहे. ते शिवाजी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेमार्फत प्रसिद्ध होणे गरजेचे होते. असो. वास्तविक डॉ. बाळकृष्ण या हिमालयाच्या उंचीच्या संशोधकाचे ज्ञान पुन्हा प्रकाशात आणयचे तर तशाच उंचीची, प्रतिभाशाली संस्था त्यासाठी योग्य ठरेल. अन्यथा जगभर ज्या ज्या विद्यापीठाकडे हा संदर्भ ग्रंथ जाईल तेथे चुकीचा संदेश जाईल. पुनर्मुद्रित खंडात (पान ६८). संपादकीय म्हटले आहे, ‘’डॉ. बाळकृष्ण यांच्या चुका दाखवण्याचा उद्देश वाचकांना नव्या संदर्भाची ओळख करुन द्यावी’’. पान ६९ वर म्हटले आहे, ‘’We as editors, don’t concur with many things in this biography running into 1630 pages which are proved incorrect due to sourced that became available recently.’'

''याशिवाय पंजाबीक्षत्रिय व्यक्ती इतक्या दूरवरुन महाराष्ट्रात येते, त्यांना कधीही मराठी भाषा, मराठा भूमी त्यांची पीएचडी लंडन विद्यापीठातली. १० ते १८ वर्षे अभ्यास केला म्हणून छ. शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिण्याइतपत कळले असे म्हणता येणार नाही.''

डॉ. बाळकृष्णांच्या ज्ञानवृक्षावर पोसले जाणारे वरील भाष्य कोणाचे हे ठरवत बसण्यापेक्षा ते पोरकटपणाचे अपरिपक्व इतिहास संशोधनाचे निदर्शक आहे. छ. शाहू, छ. राजाराम महाराज ज्यांनी त्यांना निवडले. ज्या आंतरराष्ट्रीय इतिहास, अर्थशास्त्र, पुरातत्व संघटनाचे ते अध्यक्ष होते ते सारे डॉ. बाळाकृष्णांना डोक्यावर घेऊन नाचले, ते सारे चुकले असा ऐतिहासिक निष्कर्ष काढायचा का ?

'' डॉ. बाळकृष्ण मुस्लीमविरोधात सक्रीय होते आणि त्यांचे हिंदुत्व दिखावू होते''असे भाष्य संपादकांने कोणत्या पुराव्यावर आधारुन केले समजत नाही पण निश्चितच ते अन्यायकारक आहे. शिवाय त्यांनी लिहिले शिवचरित्र सदोष आहे असे म्हणणाऱ्याने ते पुनर्मुद्रित करुन अनेक विद्यापीठांना पोस्टाने पाठवण्याचे कष्ट अनाठायी घेतले, त्याचे परिश्रम वाया गेले… किंबहुना इतिहास जमा झाले असे म्हणावे लागेल.

डॉ. सुभाष के. देसाई

Updated : 8 Sep 2017 1:30 PM GMT
Next Story
Share it
Top