Home > मॅक्स कल्चर > विश्वव्यापी नंगारा महोत्सव पोहरादेवीत होणार - संजय राठोड

विश्वव्यापी नंगारा महोत्सव पोहरादेवीत होणार - संजय राठोड

विश्वव्यापी नंगारा महोत्सव पोहरादेवीत होणार - संजय राठोड
X

मुंबई : पोहरादेवी तीर्थक्षेत्राला बंजारा समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवी सर्वतोपरी ज्ञात आहे. येत्या २१ नोव्हेंबरला विश्वव्यापी नंगारा यात्रा महोत्सव काढण्यासंदर्भात २४ आक्टोबर ला मुबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या महत्वाच्या बैठकीस समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय राठोड यांनी केले आहे. बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ख्यात श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज आई जगदंबामाता व राष्ट्रीय संत डॉ रामराव महाराज यांचे दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येतात येथे आवश्यक सोयीचा अभाव होता. पालकमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकल्पाला समर्थ साथ मिळाल्यामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास होण्यासाठी मोठा वाव आहे.

लवकरच २४ कोटी रुपयांचा सेवासागर व बंजारा वस्तुसंग्रहालय व नंगारा प्रतिकृती वास्तूचे भूमिपूजन करिता देश पातळीवरून विश्वव्यापी नंगारा यात्रा महोत्सव करण्या संदर्भात महत्वाची बैठक ना संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या २४ आक्टोंबरच्या बैठकीस समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Updated : 23 Oct 2018 10:40 AM GMT
Next Story
Share it
Top