Home > मॅक्स ब्लॉग्ज > व्हॅलेंटाईन स्पेशल - 'हॅव ग्रेट सेक्स'

व्हॅलेंटाईन स्पेशल - 'हॅव ग्रेट सेक्स'

व्हॅलेंटाईन स्पेशल - हॅव ग्रेट सेक्स
X

‘यापेक्षा आणखी काय वाईट असू शकतं वॅलेन्टाइन्स डे ला मी सेक्स करणार नाही, आणि आता तर बघायला जावं अशी छानशी रोमँटिक फिल्म सुद्धा नाहीय’ माझ्या फेसबुक वॉलवर या आठवड्यात सहजच ही पोस्ट टाकली.

This weekend I posted the following on my Facebook page: “It’s bad enough that I’m unlikely to have sex on Valentine’s Day, now I don’t even have a good movie to watch!”

वॅलेन्टाइन्स डेच्या आसपास चांगली रोमँटिक मुव्ही रिलीज होत नसल्याबद्दल ही पोस्ट होती. मात्र पोस्ट पडण्याच्या सात तासाच्या आतच माझ्याशी सेक्स करायला मिळेल या भावनेने माझ्यावर काही’ पुरुष’ मित्र आणि ओळखीच्या पुरुषांकडून मेसेजेसचा माराच झाला. असे मेसेज म्हणजे आपण निस्वार्थीपणे काही चॅरिटीच करतोय असा आव ही काहींनी आणला.

‘ वॅलेन्टाइन्स डे ला एखाद्या मुलीने असं एकटं राहू नये, चल बाहेर जेवायला जाऊ’ पासून माझ्यासारख्या ‘हार्डवर्कींग’ मुलीला ‘हॅप्पीनेस’ आणि ‘सॅटीस्फिकेशन’ ची हमी देण्यापर्यंत ऑफर्स येत राहिल्या.

सेक्सबद्दलच्या अशा गोष्टींचा मी बाऊ सुद्धा करत नाही आणि मला धक्काही बसत नाही. मी एक चांगलं हेल्दी सेक्स लाईफ जगते. मी ‘सिंगल वुमन’ आहे आणि सिरियल मोनोगामिस्ट सुद्धा! दीर्घकाळ चालेल अशा कमिटेट रिलेशनशिप मध्ये मला इंटरेस्ट असतो, पण मला माझ्या सेक्स पार्टनरला लग्नासाठी प्रेशराईज करणं, दबाव टाकणं वगैरे आवडत नाही. गोष्टी कशा हळुवारपणे उलगडत गेल्या पाहिजेत. डेटिंग ही एक प्रोसेस आहे, जाणण्याची- अनुभवण्याची, हळुवारपणे कसोटीवर उतरण्याची. ती एक शोधाची प्रोसेस ही आहे. लग्न काय, जेव्हा व्हायचं तेव्हा होत राहतं! ज्यांचं माझ्याशी लैंगीक, मानसिक, शारीरिक, सामाजिक-सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक...म्हणजेच सर्व बाबतीत जुळेल असा पार्टनर असणं माझ्यासाठी सर्वात महत्वाचं. माझं शरीर आणि माझ्या परिवाराच्या संपत्तीकडे बघून आलेल्या समलैंगिकतेला विरोध असणाऱ्या, जजमेंटल मागास मानसिकता असणाऱ्या अतिउजव्या माणसाबरोबर मी रिलेशनशिप मध्ये राहूच शकत नाही.

या फेसबुक पोस्ट नंतर ज्यांना मी आजपर्यत मॉडर्न, सुशिक्षित आणि समजूतदार समजत होते अशा पुरुषांच्या मानसिकतेत डोकावता आलं. त्यांचा ॲटीट्यूड बघून मलाच काही प्रश्न पडले, भारतीय पुरुष हा नातेसंबंधांना एकाच चष्म्यातून का बघतो? जर खरं प्रेम असेल तर त्याची परिणीती लग्नातच का व्हायला हवी? जर लग्न होणार नसेल तर तो केवळ ‘अर्थहीन सेक्स’ का मानला जातो? मला तर प्रश्नच पडतो, एखादा आपल्या गर्लफ्रेंडला रिस्पेक्ट देऊ शकत नसेल तर तो बायकोला काय सन्मान देणार? सेक्श्युअली लिबरल असण्याला विद्रोह का मानण्यात येतं, आणि महत्वाचं म्हणजे कुणाला सन्मान देणं हे परंपरा आणि कायद्याशी का बांधलेलं असते.

भारतीय संस्कृतीची आणखी एक गंमत म्हणजे आपले पालक प्रेम, प्रणय या गोष्टी अतिशय खाजगी असल्याचं मानतात किंवा बिंबवतात तर त्याचवेळी बॉबी, रफू चक्कर आणि गोलमाल सारख्या चित्रपटांचा ही मनमुराद आनंद लुटतात. लग्न होणारच असेल तर डेटिंग करायला हरकत नाही, असं थोडेसे लिबरलही होतात. याच गोष्टीमुळे काळानुरूप प्रेम विवाह, आंतरजातीय विवाह आणि थोड्या फार प्रमाणात लिव्ह इन रिलेशनशिपला थोडी थोडी मान्यता मिळू लागलीय. .

पण आता हे सगळं एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचताना दिसतंय, “hanging out and having fun”असा एक बॅगेज फ्री दृष्टीकोन रूजायला सुरूवात झालीय. यामुळे खरं तर वेळ आणि स्पेस मिळते, आपल्या रिलेशनशिपचं मुल्यांकन करायला, आढावा घ्यायला. मात्र साधारणत: अशी दृष्टीकोनाला फायद्यासाठीची मैत्री, ओपन रिलेशनशिप किंवा बहुगामी असं टॅर्गेट केलं जातं. या तसंच कमिटमेंटग्रस्त भारतीय पुरुषांमध्ये आणखी एक मानसिकता बघायला मिळते, ती म्हणजे जी स्त्री लग्नासाठी हट्ट किवा दबाव टाकत नाही तीला फक्त सेक्ससाठी वापरायचं. यामुळे स्त्रीचं अतिलैंगिकीकरण आणि ऑब्जेक्टीफिकेशन होतं, आणि इथे तुमच्या भाव-भावनांना काही जागा शिल्लक राहत नाही.

मला वाटतं याचं मूळ कारण हे आहे की आपण लैंगिक आनंदाला लाज आणि अपराधिक भावनेशी जास्त जोडून बघतो. यामुळेच व्हॅलेन्टाइन डे म्हणजे भारतीय संस्कृतीतल्या उजव्या लोकांना संस्कृतीरक्षणासाठी विरोध करण्याचा दिवस वाटतो. ज्या दिवशी आपण सेक्सला अपराधिक भावना आणि लाजेच्या चौकटीतून मुक्त करू त्या दिवसांपासून आपल्याला सेक्स हे आपल्या अस्तित्वाचं सेलिब्रेशन आणि रोमँटिक प्रेमभावनेचं अविभाज्य अंग आहे हे समजायला सुरूवात होईल.

सेक्स म्हणजे दोन सज्ञान व्यक्तीनी एकमेकांच्या संमतीने एकत्र येऊन साजरा केलेला आनंदोत्सव आहे. हा आनंदोत्सव वाईट किवा अर्थहीन कसा काय असू शकेल?

त्यामुळे या व्हॅलेन्टाइऩ डे ला तुमच्यातील रोमान्स जिवंत ठेवा. तुम्ही जर तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला महागडे गिफ्ट्स देऊ शकत नसाल तरी तुमच्या पार्टनरला प्रेम आणि रिस्पेक्ट तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि शेवटी थांबतांना “ हॅव अ ग्रेट सेक्स ” असं म्हणून शुभेच्छा दिल्या वाचून राहवत नाही.

Happy Valentine’s day

अनुवाद - जयश्री इंगळे

Updated : 13 Feb 2017 6:28 AM GMT
Next Story
Share it
Top