Home > मॅक्स ब्लॉग्ज > "झरोखा" दोन मराठी मित्रांची उद्योजक होण्याची भन्नाट कहाणी

"झरोखा" दोन मराठी मित्रांची उद्योजक होण्याची भन्नाट कहाणी

धैर्यशील गोरे आणि कपिल भागवत साताऱ्या जिल्ह्यातील दोन मित्र. दोघांनी मिळून जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतले आहे. शिक्षण घेत असताना दोघांनींही इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं . पण त्याचवेळी स्वप्न पाहिलं ते उद्योगपती होण्याचं आणि ते पूर्णही केलं.

झरोखा दोन मराठी मित्रांची उद्योजक होण्याची भन्नाट कहाणी
X

प्रत्येकाच्या आयुष्यात काहींना काही स्वप्न असतं. अगदी तसंच स्वप्न साताऱ्यातील या दोन मित्रांनी पाहिलं. पुण्यात त्यांनी झरोखा नावाचं रेस्टारंट सुरू केलं. इंजिनिअरिंगला असताना वेगवेगळ्या हॉटेल्स किंवा कॅफेत मित्रांसोबत गेल्यानंतर त्या दोघांना नेहमीच वाटायचं कि आपलंही हॉटेल असावं. याच जाणिवेतून त्यांचा उद्योजक बनण्याचा प्रवास सुरु झाला.

झरोखा नाव ठेवण्याचं काय होतं कारण ?

झरोखा हा उर्दू शब्द आहे. याचा अर्थ झरोखा म्हणजे खिडकी. ज्यामधून तुम्ही तुमच्या स्वप्नाची दुनिया पाहू शकता. म्हणून त्यांनी झरोखा असं या हॉटेलला नाव दिले आहे. दोघांना सुरुवातीला अडचणी आल्या होत्या. पण दोघांनीही यावर मात करत आपलं स्वप्न पूर्ण केले आहे.

धैर्यशील आणि कपिल दोघंही एमबीए पदवीधर

दोघांनीही जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेतले आहे. दोघांच्याही परिवारातून कोणीच व्यवसायात उतरलेले नाही. व्यवसायाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना धैर्यशील आणि कपिल भागवत यांनी एक प्लॅन तयार केला आणि तो यशस्वी केला आहे.धैर्यशील हे "आय आय एम ,इंदोर" मधून एमबीए पदवीधर झाले आहेत .

मराठी माणूस व्यवसायात पडत नाही, पण या दोघांनी केले धाडस

कपिल भागवत यांच्या परिवारातील सदस्य हे सरकारी नोकरी करतात. त्यामुळे साहजिकच घरच्यांचाही विचार होता कि त्याने सुद्धा नोकरीच करावी. मात्र, कपिल भागवत यांनी सरकारी नोकरी नाही पण स्वतःचा जॉब करत या व्यवसायाची सुरुवात केली आहे. मराठी माणूस आहे तर माझ्याही घरात काही वेगळी परिस्थिती नव्हती. पण काहीतरी वेगळं करत आहे म्हटल्यावर घरातूनही यावर एकमत झालं. त्यामुळे दोघांनी मिळून या व्यवसायात उतरण्याचे धाडस केल्याचे कपिल भागवत यांनी सांगितले.

लोकांचा प्रतिसादही चांगला

झरोखा मधलं प्रसन्न वातावरण पाहून इथं पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं असल्याचं ग्राहक सांगतात. रेस्टारंटच्या इंटेरिअर मध्ये जादू असल्याचंही लोक बोलतात. अनेक लोक इथे येऊन समाधानाने वेळ घालवतात. ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधानच आम्हाला काम करण्याची ऊर्जा देत असल्याचं धैर्यशील आणि कपिल यांनी सांगितलं.

काही कमवण्यासाठी काही गमवावं लागतं

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे इथपर्यंत पोहोचण्यासाठी दोघांनीही खूप वेळ दिल्याचे धैर्यशील गोरे यांनी सांगितले. दोघेही जॉब करतात पण हे करत असताना शनिवार आणि रविवार सुट्ट्टीचे दिवस असतात पण या दिवसात व्यवसायात पुन्हा लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामुळे या धावपळीत कित्येकदा स्वतःचा वेळ गमावतो. पण तो गमावतो म्हणण्यापेक्षा ती एक गुंतवणूक करत असल्याचे मला वाटतं, असे सांगत या दोन मित्रांनी आपली यशोगाथा मांडली आहे.

Updated : 7 July 2023 10:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top