Home > मॅक्स ब्लॉग्ज > फडणवीस... उत्तर द्या...

फडणवीस... उत्तर द्या...

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या मुंबईतील कबरीवरील रोषणाईचा वाद पेटला असताना पत्रकार दत्ता जोशी आणि अभ्यासक डॉ. विनय काटे यानी काही मुलभुत प्रश्न उपस्थित केले आहेत...

फडणवीस... उत्तर द्या...
X

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याच्या मुंबईतील कबरीवरील रोषणाईचा वाद पेटला असताना पत्रकार दत्ता जोशी आणि अभ्यासक डॉ. विनय काटे यानी काही मुलभुत प्रश्न उपस्थित केले आहेत...

2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले. त्यातील गुन्हेगार अजमल कसाब याला २१ नाेव्हेंबर २०१२ राेजी काॅंग्रेस कार्यकाळात फासावर चढविण्यात आले. त्याचे प्रेत तुरुंगातच कुठेतरी पुरून टाकले. कुणाला काही फरक पडला नाही. रीतीरिवाजानुसार दफनासाठी ते एखाद्या इस्लामी संघटनेला ते प्रेत साेपवू शकले असते. त्यांनी ते केले नाही.

१९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फाेट प्रकरणातील गुन्हेगार याकूब मेमन याला ३० जुलै २०१५ राेजी नागपूर सेंट्रल जेलमध्ये भाजपाच्या कार्यकाळात फासावर चढविण्यात आले. पण त्याचे प्रेत दफन करण्यासाठी त्याच्या परिवाराच्या ताब्यात दिले गेले. त्या वेळी लाखाे भाऊबंदांची गर्दी जमली आणि एका दहशतवाद्याला त्याच्या समाजात किती मान मिळताे हे पाहायला मिळाले.

हे सरकारही मेमनचे प्रेत परस्पर तुरुंगात पुरू शकले असते. ते क्षम्य ठरले असते. दहशतवादावर भाजपा तडजाेड करत नाही, हा स्पष्ट संदेश जगात गेला असता. ते घडले नाही.

आता मेमनच्या थडग्याचे सुशाेभीकरण केल्याची बातमी आली आहे. त्याला पुरले तेव्हाही फडणवीस मुख्यमंत्री व गृहमंत्री हाेते. आजही तेच गृहमंत्री व प्रति- मुख्यमंत्री आहेत. दहशतवादाचे हे उदात्तीकरण ते माेडून काढणार का? ओसामाचे प्रेत कुठे गेले हे जगाला कधीही कळले नाही. ही इच्छाशक्ती फडणवीस कधी दाखवणार?

हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या नावावर समाजाला नुसतेच वापरून घेणार असाल, मतांचे राजकारण करणार असाल, तर... या `तर` चे उत्तर समाज चाेखपणे देऊ शकताे, असं दत्ता जोशी यांनी म्हटलं ओआहे.

अतिरेकी याकूब मेमनच्या कबरीचे त्याच्या कुटुंबीयांनी सुशोभीकरण करणे वाईटच आहे!

पण, स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी नथुराम गोडसे याच्या अस्थी चांदीच्या कलशात ठेवून, त्याचसोबत गांधींच्या हत्येदिवशी त्याने घातलेले रक्तरंजित कपडे (ज्यात कदाचित गांधीचेच रक्त असेल) हे पुण्यात गेली 73 वर्षे अगदी भक्तिभावाने जपून ठेवण्यात आलेले आहेत. लोक तिथे गोडसेकडून प्रेरणा घ्यायला जातात, नाटके लिहितात आणि गांधीचे पुतळे बनवून आजही त्या पुतळ्याला गोळ्या घालतात.मेमनच्या कबरीवरील लाईट, फुले, बांधकाम काढून टाकूयाच... पण गोडसेचे काय करायचे?

- डॉ. विनय काटे

Updated : 8 Sep 2022 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top