Home > मॅक्स ब्लॉग्ज > मानसिक आरोग्य दिन

मानसिक आरोग्य दिन

मानसिक आरोग्य दिन
X

१० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. या वर्षीचा विषय World Mental Health Day: an opportunity to kick-start a massive scale-up in investment in mental health असा घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण जग हे कोविड १९ महामारीच्या संकटातून जात आहे. लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी लोकांचा रोजगार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब, वंचित मुलांचे शिक्षण, स्त्रियांचा रोजगार, मुलींसाठी शिकण्याची संधी, हक्क आणि कोविडच्या सुरुवातीच्या काळात पसरवलेले गेलेले मिथक हे लॉकडाऊनमध्ये असल्याचे फील्डमध्ये गेल्यावर अनुभवयास येत आहे.

या पॅनडेमिकने लोकांच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम केला आहे. अचानक आलेले संकट यातून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे मनावर दडपण, भीती, चिंता, राग, चिडचिडेपणा सर्व वयोगटातील व्यक्तीवर होत आहे. लॉकडाऊनच्या काळात एलजीबीटीक्यू समुदायाला आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधापासून वंचित राहावे लागले. यात पुन्हा कुटुंबाचा आधार नाही. ह्या सगळ्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झालेला दिसून येतो.

भारतात मानसिक आरोग्य हा विषय कायम दुर्लक्षित राहिलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात एक अब्ज लोक मानसिक आजाराने, वेगवेगळ्या व्याधीनेग्रस्त आहेत. तीन मिलियन लोक दरवर्षी नशेली पदार्थाच्या सेवनामुळे मरण पावतात. तर दर ४० सेकंदाला एक व्यक्ति आत्महत्या करतो. सध्या संपूर्ण जग कोविड १९ पॅनडेमिकने त्रस्त आहेत. याचा परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.

खूप कमी लोकांवर मानसिक आरोग्याच्या सुविधा मिळतात. गरीब आण विकसनशील देशातील ७५% लोकांना मानसिक आरोग्य, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरवर (मज्जा संस्थाशी संबंधित विकार) उपचार मिळू शकत नाही. तसेच मानसिक आजाराबद्दल असलेले गैरसमज, भेदभाव, कलंक मानले असल्यामुळेही मानसिक आजारपण दुर्लक्षित राहते. जगभरातील देश आणि आरोग्या संदर्भातील बजेट म्हणून पाहिले तर संपूर्ण बजेटच्या केवळ दोन टक्के आर्थिक तरतूद ही आरोग्यासाठी केली जाते. यातील एक टक्का खर्चही मानसिक आरोग्यासाठी केला जात नाही.

या वर्षीचा विषय स्केलअप इन इनवेस्टमेंट इन मेंटल हेल्थ असा आहे. सध्या आपण सगळे कोविड पॅनडेमिक मधून जात आहोत. राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली आहे. याचप्रमाणे 'माझे मानसिक आरोग्य माझी जबाबदारी' ही काळाची गरज आहे. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी दोन व्यक्तिमध्ये सुसंवाद असण्याची गरज आहे. तसेच मेंटल हेल्थमध्ये इनवेस्टमेंट करण्यासाठी शासनाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा महाविद्यालय, कार्यालये अशा ठिकाणी Psychiatric Social Worker ची नियुक्ती केल्यास वेळेवर निदान, उपचार आणि मानसिक आरोग्या संदर्भात समाजात जाणीव जागृती चांगल्या प्रकारे होऊ शकते.

रेणुका कड यांच्या फेसबुक भिंतीवरून

Updated : 10 Oct 2020 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top