Home > Top News > हाथरस: ‘त्यांना’ वाटतं लोक विसरतील!

हाथरस: ‘त्यांना’ वाटतं लोक विसरतील!

भारताचा Female Labour Force Participation दर का घसरतोय. १९९० मध्ये ३० % असणारा हा दर २० टक्यांवर का आला आहे? हाथरस सारख्या शेकडो छोट्या मोठ्या घटनांचा त्याच्याशी काही संबंध आहे का? वाचा संजीव चांदोरकर यांचा लेख...

हाथरस: ‘त्यांना’ वाटतं लोक विसरतील!
X

“हाथरस”: अमानवी, घृणास्पद कृत्याचा आणि त्यानंतर शासनाच्या आशीर्वादाने पोलिसांनी केलेल्या सर्व कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच. “त्यांना” वाटतंय या घटना प्रचंड वेग घेतलेल्या काळनदीच्या प्रवाहात वाहून जातील; लोक विसरतील, परत आपले गुंडाराज राबवायला आपले मोकळे रान असेलच.

लोक विसरतील, मीडिया विसरेल, राजकारणी विसरतील कदाचित… पण स्त्रिया? आया?, आज्या? मावश्या? आत्या? बहिणी? अर्थातच त्या जातवर्गातील जे हजारो वर्षे या हिंस्त्र श्वापदीं संस्कृतीच्या बळी आहेत? त्या विसरतील का?

विसरणार तर नाहीच, पण आपल्या मदतीला कोणी येणार नाही. हे सरकार, पोलिस सर्व मिली भगत आहे. हा त्यांचा समज पक्का होत जात आहे. असहाय्य अवस्थेतील कोणताही माणूस करेल ते त्याही करतील: स्वतःचा जीव व अब्रू वाचवणे. आपल्या मुलींना कॉलेजमध्ये सोडाच, शाळेत पाठवणार नाहीत, घरात ठेवतील, कोणतेही कौशल्य शिकण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी बाहेर जाऊ देणार नाहीत. चार पैसे कमवण्यासाठी त्यांनी नोकरी, धंदा करावा यासाठी प्रोत्साहन नाहीच, त्यांना मागे खेचतील.

हे काल्पनिक नाहीय; हे होतंय...

आपण वर्क फोर्स ऐकले असते; वर्क फोर्स म्हणजे कामावर असणाऱ्यांची संख्या, अजून एक टर्म महत्त्वाची असते: लेबर फोर्स पार्टीसिपेशन... म्हणजे कामावर असणारे आणि काम करू इच्छिणाऱ्यांची एकत्रित संख्या; या दोघांतील फरक बेरोजगारी / अनएम्प्लॉयमेंट भारताचा Female Labour Force Participation दर सातत्याने खाली येत आहे. १९९० मध्ये तो ३० % होता. आता तो २० टक्यांवर आला आहे. का येत आहे? का येत असेल? तुम्हीच विचार करा? हाथरस सारख्या शेकडो छोट्या मोठ्या घटनांचा त्याच्याशी काही संबंध आहे का?

जगातील स्त्रियांचा लेबर फोर्स पार्टीसिपेशन रेट : ४८ टक्के आहे.

नेपाळ : ८२ %, बांगलादेश : ३६%, श्रीलंका : ३५ %

आपल्या खाली फक्त इराण, इराक वगैरे देश आहेत. आपल्याला करायची होती ना बरोबरी त्यांच्याशी

संजीव चांदोरकर (२ ऑक्टोबर २०२०)

Updated : 3 Oct 2020 5:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top