Home > News Update > भाजपा गोळवळकरांचा निषेध करेल काय?

भाजपा गोळवळकरांचा निषेध करेल काय?

भाजपा गोळवळकरांचा निषेध करेल काय?
X

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाहीत, त्यामुळे औरंगाबादचे नामकरण "संभाजीनगर" झालंच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गोळवळकरांचा निषेध करणार काय? असा सवाल काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.‌

चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान भाजपा महाराष्ट्र ने

ट्वीट करून प्रसारित केलंय.

'भाजप'च्या या ट्वीटला सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

"छत्रपती संभाजी महाराजांना स्त्रियांचा व दारुचा व्यसनी म्हणून त्यांची खंडो बल्लाळाच्या बहिणीवर वाईट नजर होती, अशी त्यांची बदनामी करणाऱ्या गोळवलकरांचा जाहीर निषेध! चंद्रकांत दादा तुम्ही निषेध करणार का? नाही तर संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा 'भाजप'ला अधिकार नाही.

https://twitter.com/sachin_inc/status/1233745772950089729?s=19

ट्वीटसोबत सचिन सावंत यांनी 'बंच ऑफ थाॅटस्' या पुस्तकातील संबंधित मजकुराची पटप्रतही सोबत जोडली आहे.‌

या चर्चेत पत्रकार राजू परूळेकर यांनीही उडी घेतलीय. "गोळवलकर आणि सावरकरही. सावरकरांच्या ‘हिदुंपदपादशाही (१९२८) पुस्तकातलं एक पान. संभाजी महाराजांची अशीच बदनामी करण्यात गेलंय. त्यावरही भाजपची भूमिका काय आहे ते समजंलं तर बरं होईल." असं परूळेकर यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/rajuparulekar/status/1233769246062149634?s=19

काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं सत्तास्थापना केल्यापासून भाजपा शिवसेनेला कधी हिंदुत्व, कधी सावरकर तर कधी छत्रपती शिवाजी-संभाजींच्या मुद्द्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतेय. पण भुमिकांतील विसंगती आणि आक्रस्ताळेपणामुळे उचललेले मुद्दे भाजपाच्याच अंगलट येताना दिसत आहेत. गेली पाच वर्षे महाराष्ट्रात भाजपाचाचं मुख्यमंत्री होता. त्यामुळं विषय कोणताही असो त्यावर सत्ताधारी म्हणातात, तुम्ही पाच वर्ष काय केलंत, हे भाजपाला ऐकावं लागतंय. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मागणीचंही तेच होतंय.

Updated : 1 March 2020 5:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top