Home > मॅक्स ब्लॉग्ज > बंगालमध्ये दुर्गामूर्तीसाठी वेश्यावस्तीची माती का आणली जाते?

बंगालमध्ये दुर्गामूर्तीसाठी वेश्यावस्तीची माती का आणली जाते?

बंगालमध्ये दुर्गामूर्तीसाठी वेश्यावस्तीची माती का आणली जाते? वाचा समीर गायकवाड यांचं विश्लेषण

बंगालमध्ये दुर्गामूर्तीसाठी वेश्यावस्तीची माती का आणली जाते?
X

बंगालमध्ये दुर्गामूर्ती बनवण्यास सुरुवात करण्यासाठी जी माती आणली जाते. ती विविध ठिकाणांहून आणली जाते, पैकी एक हिस्सा वेश्यांच्या अंगणातील मातीचा देखील असतो. त्याची ही पार्श्वभूमी.

दुर्गेची मोठी मूर्ती बनवून आपल्या आश्रमाबाहेर ठेवणाऱ्या एका ऋषींचा दाखला यासाठी दिला जातो. आपण मूर्ती बनवल्यानंतर अनेक ठिकाणचे लोक येऊन तिचे दर्शन घेतील आणि आपली सर्वत्र वाहवा होईल असं त्या ऋषींना वाटलं. त्यांचा अहंकार दुर्गेच्या लक्षात आला.

त्याच रात्री दुर्गामाता त्या ऋषीच्या स्वप्नात आली. तिने ऋषीला सांगितलं की, "जिथे घमेंड आहे तिथे मी वास करत नाही, माझा चैतन्य अधिवास हवा असेल तर तुला माणुसकी दाखवावी लागेल, बलिदान द्यावे लागेल."

ऋषी काय समजायचे ते समजले तरीही त्यांनी सवाल केला की, "म्हणजे मी नेमके काय केले तर तुम्ही इथे वास्तव्य कराल ?" त्यावर दुर्गा वदली की समाजाने ज्यांना हीन समजून बहिष्कृत केलंय, शोषण केलंय अशा ठिकाणचा चिखल / माती आणावी लागेल. भले मग ते घर वेश्येचे असले तरी हरकत नाही. वेश्येच्या अंगणातली माती तुला स्वतःला जाऊन आणावी लागेल !"

ऋषींना स्वतःची लाज वाटली आणि त्याच क्षणी त्यांनी नगराबाहेर वास्तव्यास असणाऱ्या वेश्येच्या अंगणातली माती आणली.

अशी दंतकथा कुम्हारटोलीमध्ये (कुंभार वाडा / वस्ती) प्रचलित आहे.

या खेरीज शन्नोबाई नावाच्या वेश्येची एक अत्यंत आर्त कथाही सांगितली जाते जी गत शतकातील आहे.

विविध जाती वर्गातले भिन्न वय विचारांचे पुरुष या बायकांकडे जातात तेव्हा त्यांच्या मनात देहलालसेचा आणि वासनेचा कल्लोळ असतो,

समागम झाल्यानंतर त्यांचे सत्व अस्तित्व तिथे गळून पडते. ते त्या मातीशी एकरूप होते.

ही माती दुर्गेच्या निर्मितीसाठी वापरायची म्हणजे या सर्व पुरुषांच्या लालसेचे नि त्या बायकांच्या पावित्र्याचे प्रतीक होय,

जेणे करून त्यांच्यावर कुणी लांच्छन लावू नये !

ही दंतकथा खरी असो वा खोटी, देव देवतांचे अस्तित्व आहे किंवा नाही, ऋषी मुनी होते किंवा नाही याचे नेमके उत्तर ठाऊक नाही. मात्र या माती आणण्याच्या परंपरेमागचा हेतू अत्यंत उदात्त आहे हे नक्की !

- समीर गायकवाड

Updated : 17 Oct 2021 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top