Home > मॅक्स ब्लॉग्ज > RSS ला राहुल गांधी का खटकतात?

RSS ला राहुल गांधी का खटकतात?

RSS ला राहुल गांधी का खटकतात?
X

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोधाभासी राजकारण करायला खूप आवडते. म्हणजे ते एखाद्या मुद्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहतात. पण कोणत्याही एका बाजूवर ठामपणे राहत नाहीत. यामुळे संघाचे टीकाकार आणि त्यांचे स्वयंसेवक कायम गोंधळलेले असतात. स्वयंसेवकांना तर त्यांचे नेतृत्व काय विचार करते आहे हेच कळत नाही. ते केवळ संघाचे सैनिक आणि चाकातील आऱ्यांसारखे काम करत राहतात.

पण आता राहुल गांधी हे ५०व्या वर्षात पदार्पण करत असताना काँग्रेस नेतृत्वाचा गोंधळ आणि अपघाती राजकारण यातील विरोधाभासामुळे संभ्रम संपताना दिसत नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष नसले तरी सध्या तेच पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पक्षाची बाजू मांडताना दिसत आहेत. एक राजकारणी म्हणून राहुल गांधी यांना स्वीकारले गेले नसले तरी सध्या सरकारविरोधात फक्त तेच बोलत आहेत.

राहुल गांधी यांना भाजपने महत्त्व द्यायचे नाही असे ठरवले असले तरी सध्या ते एकमेव असे नेते आहेत. ज्यांनी कोरोनाशी लढण्याचे उपाय सांगितले होते. एवढेच नाही तर किमान उत्पन्न योजना म्हणजेच न्याय योजनेबद्दल राहुल गांधी वारंवार बोलत आहेत. स्थलांतरित मजुरांसाठी या योजनेचा वापर झाला असता तर मोदी सरकारची प्रतिष्ठा राखली गेली असती आणि हे सरकार सक्षम आहे असेही सिद्ध झाले असते.

ते सुसंस्कृत आहेत, त्यांची वर्तणूक चांगली आहे. पण त्याचबरोबर ते 'सूट-बूट की सरकार' किंवा 'चौकीदार चोर है' यासारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या घोषणा देतात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह देशातील इतर बडे नेतेही या घोषणा स्वीकारतात.

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसमुक्त भारतचा नारा देत राहुल गांधी या़ंचे महत्त्व संपवून टाकण्याची घोषणा केली. पण याच मुद्यावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या काँग्रेसमुक्त भारतच्या घोषणेपासून लांब राहून पुन्हा एकदा विरोधाभासी राजकारण करताना दिसत आहे. एवढेच नाहीतर राहुल गांधी हेच भारत काँग्रेसमुक्त करतील. अशी आशा वजा विनंती करताना दिसत आहेत. यावरुन भाजपमधील एकाही नेत्याला भारत काँग्रेसमुक्त करता आलेला नाही आणि त्यासाठी राहुल गांधी यांच्या मदतीची गरज असल्याची अप्रत्यक्ष कबुली संघ देत आहे.

"राहुलजी हे एक अब्जाधीश उद्योगपती होऊ शकतात," असे संघ विचारसरणीचे दिलीप देवधर म्हणतात. नागपूरचे असलेले देवधर यांना संघाची विचारसरणी आणि धोरणांची सखोल माहिती तर आहेच पण त्याचबरोबर काँग्रेस आणि संघाच्या एकमेकांशी संबंधित इतिहासाची माहिती देखील आहे.

कारण संघाचे संस्थापक केडी हेडगेवार हे काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील टिळक गटाचे समर्थक होते. पण १९२० मध्ये काँग्रेसमध्ये गांधी पर्व सुरू झाले आणि लोकमान्य टिळकांच्या ब्राह्मणवादी गटाचे वर्चस्व संपवून धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर चालण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यामुळे हेडगेवार यांनी काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

मुस्लिम आणि इतर जातींच्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसमधील बहुतांश उच्च जातीच्या लोकांना गांधींजींच्या आगमनानंतर धक्का बसला आणि हाच महत्त्वाचा टप्पा ठरला. याच काळात लोकमान्य टिळकांच्या निधनाने काँग्रेसमधील या उच्चवर्गीयांचा आधार गेल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. (यातील स्वयंसेवक संकल्पना काँग्रेस सेवा दलासारखीच आहे). त्यांची विचारसरणी एका वस्तुस्थितीशी संबंधित होती आणि ती म्हणजे पंडित मोतीलाल नेहरू आणि लोकमान्य टिळक यांची मैत्री एवढी घट्ट होती की ते एकमेकांच्या नावाने प्रसिद्धी पत्रक काढायचे. त्यांच्यात कोणतेही मतभेद नव्हते. अशाप्रकारे त्यांनी नेहरुंच्या वंशजांसोबत एक रेखांकित रेषा ओढून घेतली.

पण गांधींचे आगमन आणि त्यांनी मोतीलाल नेहरू यांचे पुत्र जवाहरलाल नेहरू यांना आपले राजकीय वारसदार म्हणून घोषित केल्यानंतर भारत आणि संघ दोघांचे मार्ग बदलले. नेहरुंच्या नावातील पंडित या पदवीमुळे कुठेही भेदभाव दिसत नव्हता. या काळात नेहरुंचे आपल्या वडिलांसोबत विविध मुद्द्यांवर वादविवाद व्हायचे आणि बहुतेक सर्व विषयांवर त्यांचा विजयदेखील व्हायचा.

देवधर वारंवार हेच सांगतात की, "लक्षात ठेवा (जवाहरलाल) नेहरू हे पंडित होते आणि अखेरपर्यंत ते पंडितच राहिले. " पण काश्मिरी पंडित या ओळखी पलिकडे नेहरुंबाबत संघाकडे दुसरा मुद्दा नाही. याउलट नेहरु हे कायम फॅसिस्ट विरोधी राहिले आणि त्यांनी मुसोलिनी सारख्या मोठ्या नेत्याचे भारताला त्यांच्या गटात समाविष्ट करुन घेण्याचे प्रयत्नही हाणून पाडले. पण नेहरुंचा हा फॅसिस्ट विरोध आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना सोबत न घेण्याचे धोरण राहुल गांधींच्या आधीच्या दोन पिढ्यांनी पाळले नाही.

राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी संघाला अस्पृश्यतेची वागणूक दिली नसेल . पण राहुल गांधी यांना तसा मोह नाही. भाजपने त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध कितीही खटले दाखल केले आणि धमक्या दिल्या तरी त्यांना संघ आणि भाजपशी काही देणे घेणे नाही.

"ते नीडर आहेत आणि त्यांना सत्तेची कोणतीही हाव नाही", असे AICCचे सरचिटणीस अविनाश पांडे सांगतात, ते राजस्थानचे प्रभारी आहेत आणि राहुल गांधी यांचे सहकारी आहेत. पांडे हे मुळचे नागपूरचे आहेत आणि संघाला पूर्ण जाणून आहेत." आणि त्यामुळेच राहुल गांधी यांच्याविरोधात संघाचे डाव यशस्वी होऊ शकत नाही", असेही पांडे म्हणतात.

आता त्यांच्या राजकारणातील आणखी एक विरोधाभास पाहा, देवधर एकीकडे कबूल करतात की, भाजपच्या आयटी सेलने राहुल गांधींची प्रतिमा खराब करण्याची योजना आखली आणि काही प्रमाणात ती यशस्वी देखील झाली. पण राहुल गांधी़ना पूर्णपणे संपवता आले नाही. तर ते दुसरीकडे असेही म्हणतात की, "राहुल गांधी यांनी जर इतिहासाचा विचार केला तर गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेसची उपयुक्तता संपल्याने त्यांनी काँग्रेसचे विसर्जन केले पाहिजे. "

पण यामध्ये त्यांची कबुलीदेखील दिसते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना काँग्रेसचे अस्तित्व मिटवता आलेले नाही. संपूर्ण भारतात भाजपचे वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी राहुल गांधींनी त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करावे अशीही त्यांची अपेक्षा दिसते. खरे पाहिले तर खूप कमी राजकीय पक्षांकडे सरकारला आव्हान देण्याची क्षमता आहे.

राहुल गांधींबद्दल काहीही तक्रार नाही असं वक्तव्य करून पुन्हा एकदा ते विरोधाभास दाखवतात. काँग्रेसमधील काही प्रादेशिक आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधींचे नेतृत्व बहरु देणार नाहीत आणि दुसरे म्हणजे हे नेते त्यांची संस्थाने खालसा होऊ देणार नाहीत.

राहुल गांधी यांच्याबद्दल देवधर यांच्या शब्दांमध्ये कुठेतरी सहानुभूती आणि थोडा कडवटपणाही जाणवतो. आम्ही घराणेशाहीच्या विरोधात नाही. त्यांची आजी आणि त्याच्या वडिलांसोबत आमच्या नेत्यांचा अधूनमधून संवाददेखील होत असायचा. पण जेव्हापासून सोनिया गांधी पुढे आल्या तेव्हापासून संघ आणि काँग्रेसचे संबंध पूर्णपणे तुटले आहेत.

नेहरू आणि गांधी यांच्याशी संघाचा कोणताही संबंध उरलेला नाही. देवधर पुढे असेही म्हणतात की, काँग्रेसमधील असा एकही नेता नाही की ज्याने भाजप किंवा संघाशी तडजोड केली नाही." आता आसामच्या भाजपा युनिटचं उदाहरण घ्या. आसाममध्ये काँग्रेसचे सरकार होते पण मोदी आणि शहा यांच्या रणनीतीनुसार काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी त्यांनी तिथे भाजपची सत्ता स्थापन केली. एवढेच काय आम्ही प्रणव मुखर्जींना देखील वळवलं. एके दिवशी तर आम्ही सीपीएमच्या सीताराम येचुरी यांनादेखील वळवू". पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी मात्र संघाचे डाव यशस्वी होऊ देणार नाहीत हे मात्र नक्की.

पण एक सल्ला आहे, " राहुल गांधींनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवात 1985 साली त्यांचे वडील राजीव गांधी यांनी असं म्हटलं होतं की, काँग्रेस पक्षातील काही नेते कार्यकर्त्यांचे जीवावर सत्ता गाजवत आहेत. आजही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा नेता हा त्याच्या परिसरातील सत्ताकेंद्र झालेला आहे आणि राहुल गांधींनी जर पक्षाचे विसर्जन केले नाही तर त्यांच्या पुढे हेच सगळ्यात मोठे आव्हान असेल. राहुल गांधींना योग्य राजकीय सल्ला देईल. असा तळागाळातील माहिती असणारा एखादा राजकीय सल्लागार त्यांनी दाखवावा. कर्तबगार लोक किंवा तंत्रज्ञांशी चर्चा चांगली आहे. पण ती तळागाळापर्यंत पोहोचत नाही आणि हाच खरा दोष आहे."

एक गोष्ट सत्य आहे की 50 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या राहुल गांधींसमोर अनेक मोठ्या समस्या आहेत. पक्षाला पुन्हा उभा करण्याचे त्यांचे स्वप्न सत्तेचा लोभ असलेल्या त्यांच्याच नेत्यांनी धुळीला मिळवले आणि 2014 मध्ये पक्षाला खूपच कमी जागा मिळाल्या. त्यानंतरही या नेत्यांनी राहुल गांधींना एकटं सोडून दिले. “ त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला प्रतिवाद होऊ शकतो. ते लोकशाही बद्दल बोलले तर त्यांना आणीबाणी बद्दल उत्तर द्यावे लागेल. त्यांनी राफेलचा मुद्दा काढला तर त्यांना बोफोर्सबद्दल बोलायला लागेल''.

त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला तर कोणीतरी 2G घोटाळ्याचा विषय काढेल. एवढेच नाही तर केरळमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे पीक वाचविण्यासाठी हत्तीला मारलं तर त्यावर मनेका गांधी ह्या राहुल गांधी तिथले खासदार असल्याने त्यांना जाब विचारू शकतात. इतरांचे हे सर्व ओझे घेऊन त्यांना चालावे लागते आहे. पण तुमचा लेख लिहिताना तुम्ही आवर्जून याचा उल्लेख करा की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राहुल गांधी यांच्याबद्दल मनात कुठलीही अढी नाही आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.

तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आता विचार करण्याची गरज आहे. 2014 मध्ये देखील राहुल गांधींना पक्षातील जुन्या नेत्यांनी एकटं पाडलं, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणतात. "लोक काँग्रेसला वैतागलेले होते आणि त्यांना समोर दुसरा पर्याय दिसत होता, त्याच्यामुळे जो निकाल आला तो अपरिहार्य होता. पण तरीही ते मोठ्या धैर्याने लढा लढले. पण आता पक्षांतर्गत रचनेमध्ये आणि धोरणांमध्ये पूर्णपणे बदल करण्याची वेळ आलेली आहे. "

काँग्रेसचे अनेक नेते खाजगीमध्ये असं मत व्यक्त करतात की, राहुल गांधींनी 2019 मध्ये पक्षाध्यक्ष पद सोडायला नको होतं, कारण शेवटच्या महिन्यांमध्ये राहुल गांधी हे केवळ काँग्रेसचे नेतृत्व करत नव्हते तर ते एकमेव असे नेते होते जे सरकारवर थेट हल्ला करत होत. आणि त्यांच्या आरोपांचा परिणाम देखील होत होता. त्यामुळे भाजपला राहुल गांधींची भीती वाटते आणि संघ देखील राहुल गांधीं बाबत सौम्य भाषा वापरताना दिसतोय. हाच विरोधाभास राहुल गांधींच्या पन्नासाव्या वाढदिवसाला दिसतोय.

Updated : 19 Jun 2020 8:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top