Home > मॅक्स ब्लॉग्ज > उदारमतवाद्यांना मतभिन्नता का मान्य नाही?

उदारमतवाद्यांना मतभिन्नता का मान्य नाही?

उदारमतवाद्यांना मतभिन्नता का मान्य नाही?
X

मतभिन्नता हा लोकशाहीचा गुण असतो, दोष नाही. मोदी शहांनामतभिन्नता हा लोकशाहीचा गुण असतो, दोष नाही. मोदी शहांना मतभिन्नता चालत नाही. हा त्यांचा फार मोठा दोष आहे. जो जो मोदींच्या मताचा नाही तो तो पाकिस्तानात जाण्याच्या योग्यतेचा आहे असं मोदी समर्थकांना वाटतं. पण खेदानं असं म्हणावं लागतंय की मतभिन्नता तर आता मोदी विरोधकांना म्हणजे तथाकथित उदारमतवाद्यांना पण मान्य नाही! मग यांना उदारमतवादी म्हणायचं का आणि कसं?

गेले तीन चार दिवस पहातोय की मूळ शेतकरी संघटनेचे मकरंद डोईजड असोत, शेतकरी नेते रघुनाथदादा असोत की किसानपुत्र संघटनेचे अमर हबीब, तथाकथित उदारमतवादी त्यांचं मोठंच ट्रोलींग करत आहेत. हे खेदजनक असून मोदी शहांवर टीका करता करता त्यांचे विरोधकही संकुचित झाल्याचं लक्षण आहे. ही माणसं वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत आलेली आहेत, तुम्ही माऊसच्या एका क्लीकवर त्यांना मोदी समर्थक ठरवणार? केवढी ही वैचारिक असहिष्णुता!

अमर हबीब यांना म्हणे विधान परिषद मिळणार आहे! शरद जोशींची शेतकरी संघटना काय तर म्हणे पहिल्यापासून संघीच आहे! कुठून येतं हे बुद्धीदारिद्र्य? का कार्यकर्त्यांचा अपमानच करायचा हे ठरवलेल्या टोळीचे आपणही सदस्य झालो? तिन्ही कायदे रद्द करा म्हणणारांचे आणि या लोकांचे मतभेद असू शकतात, माझेही मतभेद आहेत; पण म्हणून तुम्हीही मोदीभक्तांसारखेच कट्टर होणार आणि यांना भाजपाई ठरवणार? तुमच्या उदारमतवादाला मोदींचं ग्रहण लागलं की काय?

विचारात विरोध कितीही असू शकतो पण म्हणून आजपर्यंतच्या कामाला लाथाडणं आणि हेत्वारोप करत बसणं ट्रोलांचं काम आहे. आपण ट्रोल आहोत की उदारमतवादी हा विचार प्रत्येकानं करावा. काही तरी काम नावावर असलेल्या पण कोणत्यातरी पक्षचाटू ट्रोलांचे शिकार होणार्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी एकटा राहिलो तरी हरकत नाही, उभा राहणार आहे.

तुमची मतं मांडा, मांडत रहा. आरोप करणारे कोणाचे तरी गुलाम आहेत. स्वतंत्र विचार करणारांनी गुलामांना महत्व देऊ नये. मतभिन्नता चालत नाही. हा त्यांचा फार मोठा दोष आहे. जो जो मोदींच्या मताचा नाही तो तो पाकिस्तानात जाण्याच्या योग्यतेचा आहे असं मोदी समर्थकांना वाटतं. पण खेदानं असं म्हणावं लागतंय की मतभिन्नता तर आता मोदी विरोधकांना म्हणजे तथाकथित उदारमतवाद्यांना पण मान्य नाही! मग यांना उदारमतवादी म्हणायचं का आणि कसं?

गेले तीन चार दिवस पहातोय की मूळ शेतकरी संघटनेचे मकरंद डोईजड असोत, शेतकरी नेते रघुनाथदादा असोत की किसानपुत्र संघटनेचे अमर हबीब, तथाकथित उदारमतवादी त्यांचं मोठंच ट्रोलींग करत आहेत. हे खेदजनक असून मोदी शहांवर टीका करता करता त्यांचे विरोधकही संकुचित झाल्याचं लक्षण आहे. ही माणसं वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत आलेली आहेत, तुम्ही माऊसच्या एका क्लीकवर त्यांना मोदी समर्थक ठरवणार? केवढी ही वैचारिक असहिष्णुता!

अमर हबीब यांना म्हणे विधान परिषद मिळणार आहे! शरद जोशींची शेतकरी संघटना काय तर म्हणे पहिल्यापासून संघीच आहे! कुठून येतं हे बुद्धीदारिद्र्य? का कार्यकर्त्यांचा अपमानच करायचा हे ठरवलेल्या टोळीचे आपणही सदस्य झालो? तिन्ही कायदे रद्द करा म्हणणारांचे आणि या लोकांचे मतभेद असू शकतात, माझेही मतभेद आहेत; पण म्हणून तुम्हीही मोदीभक्तांसारखेच कट्टर होणार आणि यांना भाजपाई ठरवणार? तुमच्या उदारमतवादाला मोदींचं ग्रहण लागलं की काय?

विचारात विरोध कितीही असू शकतो पण म्हणून आजपर्यंतच्या कामाला लाथाडणं आणि हेत्वारोप करत बसणं ट्रोलांचं काम आहे. आपण ट्रोल आहोत की उदारमतवादी हा विचार प्रत्येकानं करावा. काही तरी काम नावावर असलेल्या पण कोणत्यातरी पक्षचाटू ट्रोलांचे शिकार होणार्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी एकटा राहिलो तरी हरकत नाही, उभा राहणार आहे. तुमची मतं मांडा, मांडत रहा. आरोप करणारे कोणाचे तरी गुलाम आहेत. स्वतंत्र विचार करणारांनी गुलामांना महत्व देऊ नये.

Updated : 11 Dec 2020 3:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top