Home > Top News > हा खेळ थांबवा...

हा खेळ थांबवा...

हा खेळ थांबवा...
X

Jee, Neet या सारख्या परीक्षा साधारण पणे मार्च ते मे या काळात होत असतात. भारताच्या कानाकोपऱ्यात या काळामध्ये नैसर्गिक आपत्तीचा परिणाम फारसा नसतो. तापमान वाढलेलं असतं परंतु सुसह्य असतं हवामान. निसर्गाशी दोन हात करणं, तसं फारसं अवघड नसतं. मुलांच्या महाविद्यालयात एकूण क्रमिक अभ्यासाशी कुठे ही फारकत झालेली नसते. थोडक्यात परीक्षा देण्याची मानसिकता पूर्णपणे विद्यार्थ्याची असते. नव्हे विद्यार्थी Motivated असतात.

मानसिक दृष्ट्याही तो उत्साहाच्या वातावरणात असतो. ज्याला इंग्रजीत Exam Going म्हणतात. त्या Fighting स्पिरिट मध्ये विद्यार्थी असतो. कोरोना च्या या अभूतपूर्व जैविक हल्ल्यात आणि एकूणच lockdown मुळे घडत असलेल्या अनिश्चित वातावरणात परीक्षा घेण्याचा घाट केंद्र सरकारने का घालावा? हा यक्ष प्रश्न पडतो.

साधारण जून-जुलै ऑगस्ट हे पावसाळ्याचे दिवस असतात. पूर, महापूर, वादळ, दळणवळण ठप्प होणं. या असल्या एक नव्हे अनेक नैसगिर्क आपत्तींना तोंड द्यावं लागतं. वाहतूक यंत्रणा ही ठप्प असते. अनेक ठिकाणी 200 ते 300 किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्र गाठाव लागतं. 8 तासाच्या प्रवासा नंतर अनेक वेळा तिथं राहणं ही गरजेचं होऊन जातं. आज या कोरोनाच्या काळात बाहेर राहण्याची, खाण्यापिण्याची सोय नाही असली तर ते सुरक्षित असेल याची खात्री नाही. या आणि असल्या वातावरणात सरकार परीक्षा का घेऊ इच्छित असेल हे फक्त सरकारलाच माहीत. एकी कडे अभ्यासाचा ताण, पुढच्या करिअर ची अनिश्चितता, अनेकांना परीक्षा फोबिया होण्याची शक्यता त्यात निसर्गाची भयानक अवस्था, कोलमडून पडलेली वाहतूक व्यवस्था हे शत्रू समोर उभे असतांना ही याचं जगात राहणाऱ्या सरकार ला दिसू नये हे अनाकलनीय आहे.

परीक्षा केंद्र भलेही quarantine केलं असेल, physical distancing ही पाळल जात असेल. परंतु घरा पासून परीक्षा केंद्रा पर्यंत चा प्रवास त्यातले अडथळे सरकार कसे दूर करणार आहे ? त्याची हमी देणार आहे का ? मुलांना परीक्षा केंद्रावर सोडायला आई वडील ही येतात किंवा नातेवाईक ही येतात. कारण त्या वेळेला विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था तितकीशी चांगली नसते, सोबत कुणीतरी सोबत असणं गरजेचं असतं, आई वडील जर 55 वय असणारे असतील तर कोरोना ने संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे काही होणार नाही याची सरकार हमी घेणार आहे का ? विद्यार्थी किंवा त्यांचे पालक जर उद्या कोरोना ने संक्रमित झाले तर त्यांच्या औषधांचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च करण्याची हमी देणार आहे का ? असे अनेक प्रश्न आहेत सरकार याचे उत्तर देईल का? यांच्या वर कोण विश्वास ठेवणार !

आताच परीक्षा घेणं गरजेचं आहे का? हा खरंतर मिलियन डॉलर प्रश्न आहे. याला दुसरे पर्याय नाहीत का ? अनेक पर्याय आहेत. शैक्षणिक वर्षच मुळात पुढे ढकलता येऊ शकतं. ते जानेवारीत पासूनही सुरू करता येईल. अनन्य साधारण परिस्थितेचे उपाय ही अनन्य साधारण च असणार. शैक्षणिक वर्षाच्या सगळ्या सणावाराच्या सुट्या रद्द करता येऊ शकतात. उन्हाळ्याच्या सुट्या ही रद्द करता येऊ शकतात. परंतु सरकार हे पर्याय बघण्या पेक्षा परीक्षा घेण्यावर हट्टाला पेटलंय. का ते त्यांनाच माहीत.

समजा सप्टेंबर मध्ये परीक्षा घेतल्याचं तर लगेच वर्ग सुरू करू शकतील का? तर अजून इतर ही वर्ग सुरू नाहीत. मग हेच वर्ग सुरू करण्याची घाई का ? मुळात ते करताच येणार नाहीत. वर्गच सुरू होणार नाहीत तर मग फक्त प्रवेश देऊन पुढे हातावर हात ठेवून बसणार आहे का हे सरकार ?

वास्तविक अनेक ठिकाणी जगात लस शोधण्यात जगातले सगळे शास्त्रज्ञ गुंतलेत, अगदीच लस (vaccine ) नाही पण निदान औषध तरी निश्चितच येईल ही खात्री देता येईल. अगदी शेवटच्या टप्यात आहेत सगळ्यांच्या चाचण्या. तेवढा वेळ नक्कीच आहे आपल्याकडे. आपण मुलांचा जीव धोक्यात न घालता, अनिश्चितता न ठेवता मानसिक आरोग्याला कुठे ही बाधा न आणता सरकार हे सांगू शकत की तूर्तास परीक्षा नाही घेता येणार परंतु मुलांनी अभ्यास सुरू ठेवावा आणि पुढच्या 2 महिन्यात यावर निर्णय घेऊ.

Updated : 30 Aug 2020 12:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top