Home > मॅक्स ब्लॉग्ज > औरंगाबाद धाराशिवच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का ?

औरंगाबाद धाराशिवच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का ?

औरंगाबाद धाराशिवच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का ?
X

शहराच्या नामांतराचा जो ट्रेंड उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh) सारख्या अविकसित राज्यांमध्ये पाहायला मिळाला तोच ट्रेंड तीच परंपरा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि विकसित राज्यामध्ये सुरू होतीये की काय अशी भीती वाटायला लागली आहे. आता हे नामांतर करत असताना किंवा नामांतर होत असताना नेमकी मुस्लिम समाजाची भूमिका काय असावी किंवा मुस्लिम समाजाला काय वाटतं? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. दखनी मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल तर त्यांचा सांस्कृतिक आधार हा जपला पाहिजे. हा देश मुसलमानांना आपला वाटावा. या देशाविषयी मुसलमानांना प्रेम वाटावं. म्हणून मुसलमानांच्या खाणाखुणा, मुसलमानांची संस्कृती जपणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. औरंगाबाद शहराचं नामांतर करण्यासंदर्भात एक प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता पुन्हा अहमदनगर शहराचं नामांतर केलं जावं अशी देखील भूमिका मांडली जातेय.

मी औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला होता. औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत असताना स्पष्टपणे असं म्हटलं होतं की, औरंगाबाद हे मुसलमानांच्या सांस्कृतिक मूल्यांचा महत्वाचा आधार आहे. दक्षिणेतल्या मुसलमानांच्या संस्कृतीचं ते पहिलं आणि प्रमुख असं केंद्र राहिलं आहे. दक्षिण भारतामध्ये मुसलमान संस्कृतीची स्थापना ही औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे. त्यामुळं मुसलमानांना उपरं ठरवायचं नसेल तर त्यांचा सांस्कृतिक आधार हा जपला पाहिजे अशी एक भूमिका मी मांडली होती , आणि त्याच्यानंतर राज्यकर्त्यांना आवाहन करत असताना मी असं म्हटलं होतं की हा देश मुसलमानांना आपला वाटावा या देशाविषयी मुसलमानांना प्रेम वाटावं. म्हणून मुसलमानांच्या खाणा-खुणा मुसलमानांची संस्कृती जपणं ही राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं पण राज्यकर्ते हे कर्तव्य पार पाडताना दिसत नाहीयेत.

मुसलमानांची संस्कृती मुसलमानांच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी ते प्रयत्न करतायेत जेणेकरून मुसलमान उपरे ठरतील आणि मुसलमानांना हा देश आपला वाटणार नाही. अशी परिस्थिती ते निर्माण करून ठेवतायेत. आता औरंगाबाद शहराशी मुसलमानांचा नेमका काय संबंध औरंगाबाद हे नाव औरंगाबादशी निगडित आहे. त्यामुळं औरंगजेब हा काय मराठी मुसलमानांचा सांस्कृतिक प्रतिनिधी होऊ शकत नाही. त्यामुळं औरंगाबादच्या नामांतराला मराठी मुसलमानांनी विरोध करू नये अशी देखील भूमिका मांडली जातीये. ही भूमिका काही अंशी मान्य देखील करता येईल औरंगजेब दक्षिणी मुसलमानांचा, दखनी मुसलमानांचा, सांस्कृतिक प्रतिनिधी अथवा सांस्कृतिक नेता नाही.

दखनी मुसलमान आणि त्यांच्या जगण्यावरती औरंगजेबानं दोन-तीन मोठे आघात केलेले आहेत. दखनेतल्या महत्वाच्या शाळा संपवत असताना त्यानं दखनी मुसलमानांची ज्ञानकेंद्र देखील उध्वस्त केलेली आहेत. विजापूर सारख्या दखनी मुसलमानांच्या संस्कृतीचं केंद्र असणाऱ्या शहरामध्ये जे विद्यापीठ सुरू होतं, दखनी मुसलमानांचं ते विद्यापीठ औरंगजेबाच्या काळामध्ये पाडलं गेलं.

भाषा जी इथल्या दखनी लोकांनी विकसित केली होती. ती भाषा औरंगजेबाच्या दखनेवरच्या आक्रमणानंतर जवळपास संपली आणि त्यातला साहित्य व्यवहार हा पूर्णतः थांबला. कारण औरंगजेबानं इथले जे साहित्यिक आणि विचारवंत होते. जे दखनी संस्कृती संस्कृतीचं राजकारण करत होते. त्या सर्व साहित्यिकांना, विचारवंतांना दखनेतून पिटाळून लावलं. हे साहित्यिक दखणेवरती औरंगजेबाची धाड पडल्यानंतर (Iran )इराणला आणि उत्तर भारतामध्ये निघून गेले. तेव्हापासून दखनी भाषा ही साहित्याची साहित्य व्यवहाराची भाषा म्हणून वापरात आलेली नाहीये. तर हा सगळा आघात झालेला असताना औरंगजेबाकडून दखणी मुसलमानांवरती अन्याय झालेला असताना मुसलमान औरंगजेबाच्या नावानं असणाऱ्या शहराच्या नामांतराला विरोध का करतायेत? आमचा विरोध औरंगजेबाशी निगडित असलेल्या औरंगाबादच्या नामांतराला नाही आहे.

औरंगाबादचं नामांतर हे दखनी मुसलमानांच्या संस्कृतीवर आघात करणारं आहे. कारण दखनी मुसलमानांची संस्कृती आणि त्याची ही औरंगाबाद शहरामध्ये झालेली आहे. औरंगाबाद शहरामध्ये दखनी भाषेचा पहिला ग्रंथ लिहिला गेला. दखनी भाषेची सुरूवात ही औरंगाबाद शहरापासून आहे. मोहम्मद तुघलकाची स्वारी आल्यानंतर दौलताबादमध्ये राजधानी बनवल्यानंतर त्यांना अनेक विद्वानांना आपल्या सोबत आणलं. त्याच्यामध्ये हजरत राजू खत्ताल हे बंदाराबाद जे गुलबर्ग्याला खूप मोठे आहेत. त्यांचे वडील हे मोहम्मद तुर्लगाच्या सोबत आले. ते खुलताबाद दौलताबादला राहिले आणि त्यांनी इथल्या मुसलमानांशी किंवा इथल्या स्थानिक लोकांशी संवादाची भाषा म्हणून दखनी भाषेचा वापर केला.

आणि त्या दखनी भाषेच्या माध्यमातून आपली पहिली साहित्यकृती लिहिली. आणि त्या साहित्यकृती च्या माध्यमातून त्यांनी कुराणाच्या आयाती या ओव्यांच्या स्वरूपात, काव्याच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं दखनी भाषेची सुरवात कुराण प्रणित, सांस्कृतिक राजकारणाची सुरूवात ही खुलताबाद या दोन महत्वाच्या शहरांपासून जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतात तिथून झालेली आहेत त्याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खुलताबाद या शहरात जवळपास सातशे स्मारकं आहेत त्या सातशे सुफींनी औरंगाबादमध्ये खुलताबाद शहरात मोठं सुखी सांस्कृतिक केंद्र बनवलं होतं. सुफी ज्ञानकेंद्र बनवलं होतं आणि त्या सुफी ज्ञानकेंद्राच्या माध्यमातून दखनेमध्ये त्यांनी सुफी चळवळ पसरवण्याचा सुफी चळ प्रचार करण्याचा इस्लामचा प्रचार करण्याचा, वारकरी संप्रदायाशी संवाद साधण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता.

हे सगळे प्रयत्न खुलताबाद आणि औरंगाबाद शहराशी जोडले गेलेले आहेत. त्याचा इतिहास हा औरंगाबाद शहरामध्ये आपल्याला सापडतो. त्यामुळं औरंगाबाद हे मुसलमानांचं सांस्कृतिक केंद्र आहे. अशी माझी भूमिका होती. त्याशिवाय औरंगाबाद शहरामध्ये मुसलमानांच्या पाच महत्वाच्या राज्यकर्त्यांच्या कबरी आहेत औरंगाबाद शहराच्या नजीक असणाऱ्या खुलताबादमध्ये ज्या कबरी आहेत ती जी मुसलमान राज्यकर्ते मंडळी आहेत. त्या राज्यकर्त्यांमध्ये आपल्याला फक्त औरंगजेबाचं नाव सांगितलं जातं पण औरंगजेबाशिवाय एक प्रमुख राज्यकर्ता अब्दुला बहमणी खुलताबादमध्ये त्याची कबर आहे. त्याच्याशिवाय कुतुबशाहीचा शेवटचा राज्यकर्ता आबूल हसन तान्हाशा ज्याला पदच्चुत केल्यानंतर औरंगजेबानं खुलताबादमध्ये बंद केलं होतं त्याची कबर देखील आहे. निजामशाहीचा संस्थापक असणाऱ्या निजाम अली खानची कबर देखील तिथंच आहे. मलिक अंबर ज्याला भालचंद्र नेमाडे यांनी मराठी राष्ट्रीयत्वाचा नायक म्हटलं त्याची देखील खबर तिथेच आहे. त्याशिवाय अनेक सोफी विचारवंतांची अनेक विद्वानांची कवींच्या कबरी देखील या औरंगाबाद शहरामध्ये आहेत त्यामुळं औरंगाबाद शहराशी दकनेतल्या मुसलमानांचं मराठी मुसलमानांचं एक महत्वाचं नातं आहे ते नातं या नामांतराच्या माध्यमातून संपवलं जाऊ नये.

या नामांतराच्या माध्यमातून त्या सांस्कृतिक नात्यावरती आघात केला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. आता नामांतर जर करायचंच झालं औरंगजेबाचं नाव नको असेल किंवा मराठी स्वाभिमानाला औरंगाबाद या नावामुळे तडा जातोय. अशी भूमिका ग्राह्य जरी मानली तर या शहराचं नामकरण काय करावं? तर आम्ही त्यांना पर्याय दिले होते या लोकांना की या शहराचं नामकरण ज्यानं या शहराची स्थापना केली ज्याला भालचंद्र नेमाडेंनी मागं म्हटल्याप्रमाणे मराठी राष्ट्रीयत्वाचा नायक म्हटलं त्या मलिक अंबरच्या नावावरून अंबराबाद असं नाव करा जर तुम्हाला मध्ययुगीन प्रेरणा मुसलमानांसमोर ठेवायच्याच नसतील तर ठीक आहे मौलाना आझाद यांच्या नावावरून आझाद नगर असं नाव करू शकता मौलाना आझादांचंच नाव आजादांच्या नावालाही जर का भाजप वगैरे या मंडळींचा विरोध असेल तर अब्दुल कलाम यांच्या नावावरून कलामाबाद हे नाव देखील देता येऊ शक पण ही सगळी नावं न देता मुसलमानांना राष्ट्रीय संस्कृतीमध्ये कुठेही प्रतिनिधित्व न देता मुसलमानांवर सूड उगवण्यासाठी औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव देणं हे अतिशय चुकीचं आहे.

अशी आमची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळं आम्ही औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला होता. आणि त्याच पद्धतीनं आता अहमदनगर शहराच्या नामांतराला देखील आम्ही विरोध करतोय. कारण अहमदनगर शहर देखील दखनी मुसलमानांच्या संस्कृतीचं केंद्र राहिला शहा शरीफ सारखे महत्वाचे सुफी ज्यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याला खूप मोठी मदत केली आहे. शिवाजी महाराजांच्या घराण्याचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात. त्या दर्गात तिथे आहे. त्या शिवाय अनेक महत्वाचे योद्धे हे अहमदनगर शहरामध्ये विसावलेले आहेत.

अहमदनगर शहर दक्षिणी मुसलमानांच्या राजवटीचं केंद्र राहिलेलं आहे. दखनी मुसलमानांची राजवट तिथेच स्थापन झालेली आहे. मलिक तिथे राजकारण केलेलं आहे. त्यामुळं अहमदनगरचं देखील नामकरण करू नये अशीच आमची भूमिका आहे. त्याशिवाय एक महत्वाची जी भूमिका आम्ही घेतोय ती अशी आहे की हा देश आम्हाला आमचा वाटावा म्हणून तुम्ही या देशात आमच्या खाणाखुणा जपाव्यात एवढीच आमची विनंती आहे. त्यासाठीच आम्ही याला विरोध करतोय.

Updated : 25 Feb 2023 7:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top