Home > मॅक्स ब्लॉग्ज > "बॅड" बँकेच्या निमित्ताने: जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीचे "भंगार" विक्री केंद्र

"बॅड" बँकेच्या निमित्ताने: जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीचे "भंगार" विक्री केंद्र

भारताला बॅड बॅंकेची गरज का पडली? वाचा बॅड बॅंकेचं अर्थकारण अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून

बॅड बँकेच्या निमित्ताने: जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीचे भंगार विक्री केंद्र
X

भारतातील थकीत कर्जाचा (एनपीए) नवीन नाही; गेली काही वर्षे गाजतो आहे; त्याचा आकडा दरवर्षी फुगत चालला आहे. त्याला मार्गी लावण्यासाठी बॅड बँक कार्यरत झाली आहे. त्यात भांडवली गुंतवणुकीसाठी जागतिक वित्तसंस्थांनी रंग लागत आहे.

थकीत कर्जे म्हटले की खोके, पेट्या, क्रोनी कॅपिटॅलिझम, भ्रष्टाचार याच्यापलीकडे न जाणारे बरेच जण आहेत. मग यात खोके, पेट्या, क्रोनिझ्म, भ्रष्टाचार नाही आहे का? तर आहे, पण तेव्हढेच नाहीये. जागतिक कॉर्पोरट भांडवलशाही एक प्रणाली म्हणून समजून घेतली पाहिजे.

यामागे जागतिक कोर्पोरेट भांडवलशाहीची दोन आर्थिक तत्वे ठळकपणे पुढे येतात.

(१) कॉर्पोरेट भांडवलशाही टिकण्यासाठी भांडवलालाच अधूनमधून नष्ट करण्याची या प्रणालीची आत्यंतिक गरज असते. यासाठी भारतीय नाही समग्र जागतिक भांडवलशाही एक एकांक / युनिट म्हणून पहावा लागेल.

त्यात असे दिसेल की एकाबाजूला दरवर्षी भांडवलाची प्रचंड निर्मिती होत असते. पण त्यामानाने ते भांडवल उत्पादक मत्ता तयार करण्यात रिचवले जाऊ शकत नाही. कारण थिजलेल्या अर्थव्यवस्था. हे अतिरिक्त भांडवल भांडवलशाहीलाच अस्थिर करत असते. म्हणून भांडवलशाही नर्व्हस होते.

त्यावर एक मार्ग म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या उत्पादक मत्तांची हत्या करायची म्हणजे मग नवीन उत्पादक मत्ता करतांना भांडवलाला मागणी तयार होईल / ते रिचवले जाईल.

(२) कोणतीही उत्पादक मत्ता तांत्रिक दृष्ट्या खाजगी क्षेत्रात असली तरी त्यात अनेकानेक स्टेकहोल्डर्सचे स्टेक लागलेले असतात.

उदा . जमिनी पुरवणारे (प्रायः शेतकरी), कच्चा माल पुरवणारे, श्रम पुरवणारे कामगार / कर्मचारी, बँका, म्युच्युअल फंड, आयपीओ मधून आपल्या बचती पुरवणारे नागरिक, करसंकलन करणारे शासन, हवापाणी दूषित करून घेणारे पर्यावरण, आणि एकूणच समाज !

जगाच्या पाठीवर नेहमीच हा मल्टी-स्टेकहोल्डर्स फिनॉमिनॉन असतो, नेहमीच, मालकी दुय्यम असते.

कॉर्पोरेट भांडवल त्याच्या राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याने हे सांगू इच्छिते की ही कंपनी फक्त आणि फक्त माझी आहे; ती कधी स्थापन करायची, कधी बंद करायची, कधी भंगारात काढायची हा निर्णय फक्त माझा असणार आहे.

थकीत कर्जाच्या इश्युकडे अशा बऱ्याच इतर कोनातून बघण्याची देखील गरज आहे.

फक्त क्रोनिझ्म, भ्रष्टाचार, खोके, पेट्या अशा शब्दातून जागतिक, ज्याचा भारतीय कॉर्पोरेट एक अविभाज्य भाग आहेत, भांडवलशाहीत काय चालले आहे ते आकळणार नाही; आपण आपल्या नैतिक गंडात चूर राहू शकतो एवढेच.

संजीव चांदोरकर

Updated : 19 Sep 2021 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top