Home > मॅक्स ब्लॉग्ज > पर्यावरणशास्रात खरंच नोकऱ्या आहेत का?

पर्यावरणशास्रात खरंच नोकऱ्या आहेत का?

भविष्यकाळासाठी पर्यावरण शिक्षण किती महत्वाचे आहे आणि त्यात नोकऱ्या आहेत का? याबाबत डॉ. विश्वंभर चौधरी यांचे विश्लेषण...

पर्यावरणशास्रात खरंच नोकऱ्या आहेत का?
X

चेन्नईत एका विद्यापीठातले प्रोफेसर भेटले. त्यांना विचारलं तुमच्या पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासक्रमात Environmental Impact Assessment किती मार्कांसाठी आहे? ते म्हणाले २५ मार्कांसाठी! म्हणजे घरोघरी मातीच्या चुली आहेत. आपल्याकडच्या बहुतेक विद्यापीठांमध्ये हा विषय २० मार्कांच्या वर नाही. माझ्यावेळी (१९९३) एम.एस्सी.ला एकूण १००० मार्कांमध्ये हा विषय २० मार्कांचा होता, म्हणजे २ टक्केवाला जो बहुतेक विद्यार्धी 'ऑप्शनल'ला टाकत असत!

देशभरात EIA करणाऱ्या मान्यताप्राप्त अशा साधारण ४५० आस्थापना आहेत ज्यात या विषयावरच काम चालतं. शिवाय हा अभ्यास multi disciplinary असतो. पर्यावरणशास्त्रासह Air Quality, Air Pollution, Water Pollution, Noise and Vibrations, Ecology & Biodiversity, Solid waste management, Hydro-geology, Land use, Risk & Hazards, Socio-economy या क्षेत्रातही रोजगार निर्माण होतो.

इतर विषय ज्यात काहीच रोजगार तयार होत नाहीत तो आपली विद्यापीठं ८० मार्कांसाठी शिकवतात! रोजगार आणि शिक्षण याचाच संबंध न ठेवल्यानं बेकारी वाढते. कारण ज्यात रोजगार आहे त्यात शिक्षित मनुष्यबळ नाही आणि ज्यात शिक्षित मनुष्यबळ आहे ते विषय रोजगार तयार होण्याच्या लायकीचे नाहीत.

हे असंच इतर विद्याशाखांमध्ये असणार. राज्यकर्ते शिक्षणाबाबत गंभीर नव्हते, नाहीत, असणार नाहीत आणि विद्यापीठातल्या तज्ञांचा पगार अडत नाही. आहेत त्या संसाधनांचं नीट नियोजन झालं तरी बेकारी कमी होईल. शिक्षणाचा आणि ज्ञानाचा संबंध आपण कधीच संपवला, निदान शिक्षणाचा आणि रोजगाराचा संबंध कायम ठेवायला पाहिजे होता.

... पण लक्षात कोण घेतो?

Updated : 9 March 2022 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top