दलित लिडरशिप समाजाशी गद्दार का आहे?
दलित लिडरशिप समाजाशी गद्दार का आहे? आंबेडकरी चळवळीतील लोक चळवळ सोडून अचानक गायब का होतात? Communist लोक पक्ष का सोडत नाही? वाचा चंदू सिंधू यांचा लेख..
X
शोषकांच्या फिलॉसॉफी ने शोषितांची लढाई लढली जाऊ शकते का? माझे वडील वयाच्या 14 व्या वर्षी गिरणी कामगार म्हणून कामाला लागले. त्याच वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचं काम पण करायला लागले.
त्यांना काही थोडा काळ आंबेडकरांचा सहवास पण मिळाला. त्याचा त्यांना खूप अभिमान होता. घरात आंबेडकरांची पुस्तक. वृत्तपत्रातील कात्रणं याच्या फाइल्स. तीच आमची संपत्ती. संध्याकाळी सगळे भाऊ बहीण जेवल्यानंतर दोन तीन तास वडीलांबरोबर पॉलिटिक्स वर चर्चा हा जवळपास रोजचाच भाग. ते स्वतः बी सी कांबळे यांच्या गटात होते. घरात चळवळीतले कार्यकर्ते आले की 50 यायचे. आणि नेहमी यायचे. कारण स्टेशन जवळ घर. त्याचा आम्हाला आनंद आणि अभिमान दोन्ही असायचा नंतर रेल्वेत नोकरी मिळाल्याने ते CPM च्या युनियन मध्ये पण काम करायला लागले. काही डाव्या विचारांच्या लोकांशी ओळख झाली. पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे वाचले. वडिलांची बांधिलकी मात्र, आंबेडकरी चळवळीशी राहिली मरेपर्यंत...
ते मरायच्या आधी 3-4 वर्ष मी Communism वाचायला लागलो होतो. झुकलो नव्हतो. मरणाच्या आधी वर्षभर मी त्यांना प्रश्न विचारला की, आंबेडकरी चळवळीतले नेते मोठ्या प्रमाणावर काँग्रेस ला विकले गेले. पण communist मात्र, एकही विकला गेला नाही याचं कारण काय असेल? खूप रडले ते उत्तर दिलं नाही...
Communist झाल्यावर बघितलं काय जबरदस्त कंमिटमेंट एकेका नेत्याची आणf कितीही वाईट परिस्थिती असली तरी कुणीही Communist नेता विकला गेला नाही. (अपवाद असेल तर मला माहित नाही.)
माणसाचं विकणं हे त्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसून त्याच्या चंदू सिंधू यांच्या तत्त्वज्ञानाच्या निष्ठेवर आणि लोकांशी जुळलेल्या नाळेवर अवलंबून असतं
हे बरोबर आहे कम्युनिस्ट नेते मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गातून आले होते.. पण हे 100 टक्के सत्य नाही. अगदी गरीब घरातून देखील आले होते. ते ही विकले गेले नाहीत किंवा काँग्रेस ला सामील झाले नाहीत... एक एकटे देखील जसे आंबेडकरी चळवळीत मोठ्या प्रमाणावर झालं...
जे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय होते. तेही सर्व संपत्ती पार्टी ला देऊन किंवा कुळांना वाटून पार्टीत मोठ्या पदावर पोहोचले...
आजही Communist पार्टीत लोक खासदारकीचा सर्व पगार/भत्ते पार्टी फंडात जमा करतात आणी तिथून मिनिमम पगार घेतात...
तत्वज्ञान किती मुरलंय याच्यावर अवलंबून आहे.गरिबी/श्रीमंतीवर नाही.
आज चारदोन रुपड्यांसाठी आणि पदासाठी संघ परिवरालाही स्वतःच्या जात/वर्ग शत्रू ला, स्वतःला विकणाऱ्या आंबेडकरी/दलित चळवळीतील नेत्यांना बघून फारच वाईट वाटतं. मी आज त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. तेव्हा एकच उत्तर मिळतं.
बाबासाहेबांनी शेवटच्या वर्षात केलेला Communism ला विरोध त्यामुळे ते कॅपिटलीसम चं समर्थन आहे. कॅपीटलीसम एकदा स्वीकारला की प्रत्येक गोष्ट कमोडिटी होते. नेते देखील कमोडिटी होतात price टॅग सहित आणि ते स्वतःबरोबर जनतेला पण विकतात.....
एकदा कॅपिटलीसम फिलॉसॉफी म्हणून स्वीकारल्यावर पैशावर माणसाची किंमत ठरते. सगळ्यात गरीब तो कमी महत्वाचा. दलाली करून कार्यकर्ते पोसू शकेल आणि स्वतःची तुंबडी भरू शकेल त्याला मान आणि नेतेगिरी. श्रीमंत झालेल्या बहुसंख्य दलितांनी सगळ्यांशीच संबंध तोडलाय.
कार्यकर्ते ही जो नेता जास्त पैसे देऊ शकेल त्याच्या मागे जातात... कंगना सारखी हजार प्रकरण असून अठवलेंच्या मागे खूप कार्यकर्ते आहेत.शोषकांच्या फिलॉसॉफी ने शोषितांची लढाई नाही लढता येतं.
Communist पोथीवादामुळे stagnant झाले पण विकले गेले नाहीत. आंबेडकरी चळवळीच्या दुर्दर्षेचं हे एक कारण आहे का? कॅपिटलीसम चं समर्थन करून शोषितांची चळवळ कशी चालेल कळत नाही.
-चंदू सिंधू