Home > Top News > भारतात कोव्हिड नॉन कोव्हिड आहे का?

भारतात कोव्हिड नॉन कोव्हिड आहे का?

भारतात कोव्हिड नॉन कोव्हिड आहे का?
X

आयसीएमआरच्या गाईडलाईन्स-डब्ल्यूएचओचे प्रोटोकॉल्स-आयएमएची नियमावली या पलिकडं ‘कोविड’ या संक्रमणाच्या ग्राऊंड रिॲलिटीबद्दल स्पष्टपणे बोलायचं तर भारतात आजघडीला ‘कोविड-नॉन कोविड’ असं काही उरलेलं नाही...

अत्यंत सुरक्षित-निरोगी जीवनशैली असलेले बच्चन्स असोत वा थेट देशाचे गृहमंत्री ही लोकंही जेव्हा बाधित होतात. तेव्हा आपण हे लक्ष्यात घेतलं पाहिजे की, आपल्या इथं माणसं एक तर कोविड संक्रमित आहेत किंवा कोविड संक्रमित व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेली म्हणजे ‘सस्पेक्टेड कोविड’ आहेत.

आता या सस्पेक्टेड कोविड लोकांनी म्हणजेच सगळयांनी काही एक त्रास नसेल तरीही ‘लक्षणं’ सुरू व्हायची वाट बघणं, थर्मामीटर/पल्सऑक्सिमिटर यांच्या भानगडीत पडणं, टेस्ट करावी की नको? ही द्विधा मनोवस्था करून घेणं यापेक्षा पहिली पायरी म्हणून केवळ मास्क आणि सॅनिटायजर वापरणं या पलिकडं जाऊन:

-शक्य तितकं आयसोलेट होणं.

-रोज दोन वेळा मेडिकेटेड वाफ घेणं.

-संतुलित आहार घेणं.

-श्वासाचे व्यायाम करणं.

हे अधिक सोपं आणि जास्त फायद्याचं नाही का? यातले जे टेस्टला सामोरे गेले-जाणार आहेत. त्यांनी रिपोर्ट्स काहीही असोत पहिली पायरी पाळणं आणि लक्षणं असल्यास ते:

-सौम्य (घसादुखी-चव/वास जाणे-ताप),

-मध्यम (ताप-अंगदुखी-कोरडा खोकला),

-तीव्र (प्रचंड दम-प्रचंड अंगदुखी-प्रचंड अशक्तपणा)

यापैकी आपण कुठल्या कॅटेगरीचे आहोत याचा अभ्यास करून आपण

-होम क्वारंटिन (घरात व्यवस्था होत फोनवरून फिजिशियनचा बॅकअप असल्यास)

-इन्स्टीट्यूशनल क्वारंटीन (नजिक तशी चांगली व्यवस्था असल्यास)

-हॉस्पिटलाईज्ड (लक्षणं तीव्र स्वरुपाची असल्यास)

यापैकी कुठल्या स्तरावर लवकर बरे होण्याची शक्यता आहे? याचं आकलन केलं पाहिजे..

लक्षणं सौम्य स्वरुपाची असली तरी होम क्वारंटिन मध्ये प्रिस्क्रिप्शनसोबतच तुमचा डाएट प्लॅन-एक्सरसाईजेस शेड्यूल या गोष्टींचीही अंमलबजावणी केली पाहिजे.. घरी आयसोलेशन नेहमीच आणि प्रत्येकालाच शक्य होतं असं नाही..

लक्षणं मध्यम स्वरुपाची असल्यास नजिकचं कोविड सेंटर-क्वारंटिन सेटअप कोणतं आहे?कुठं आहे? याबद्दल माहिती ठेवणं महत्त्वाचं आहे.

ऐनवेळी ‘माहितच नसणं’ हे गहाळपणाचं लक्षण भयंकर अंगाशी येऊ शकतं.. तीव्र स्वरुपाची लक्षणं ओळखता येणं. ही या आजाराबद्दलची सर्वाधिक सोपी बाब यात ‘अशक्तपणा-दम-दुखणं’ या तिन्ही गोष्टी असह्य या पातळीवरची असतात.. अश्यावेळी आहे विमा म्हणून कुठंही भरती होणं किंवा ऐनवेळी बेडची उपलब्धता बघत बसणं यापेक्षा पहिल्या टप्प्यात

-विम्याचे कागदपत्र

-आधारकार्डच्या झेरॉक्स

-फॅमिली फिजिशियनच्या सल्ल्याने एचआरसीटी चेस्ट, सिबिसी, ईएसआर, सिआरपी, एलडीएच, सिरम फेरिटिन-इंटरल्यूकिन सिक्स, डी-डायमर यांसारख्या तपासण्या.

-तुमच्या ब्लड गृपच्या प्लाझ्मा डोनर्सची नावं व पत्ते.

ही सगळी यादी तयार असेल तर या आजाराचं हॅंडलिंग सुलभ तर होईलच पण अचानक तयार होणारा भयंकर ब्लंडर ही टळेल.. विषाणुच्या स्ट्रक्चरपेक्षाही ‘कोरोना’ हा आजार त्याच्या सामुदायिक-वैयक्तिक ‘सदोष’ हाताळणीमुळं जास्त क्लिष्ट अन् तापदायक झालाय म्हणून हा प्रपंच !

#ByPradnyawant

Updated : 23 Sep 2020 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top