Home > मॅक्स ब्लॉग्ज > पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची वारंवार जात का काढली जाते?

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची वारंवार जात का काढली जाते?

मुख्यमंत्री पदाला जात असते का? का केला जातोय पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दलित म्हणून उल्लेख ? लोकशाही असलेल्या समाजात जातीचा इतका गवगवा कशासाठी? निवडणूका आल्यावर राजकीय पक्षांना जात का आठवते? वाचा माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांचे विचार करायला लावणारे विश्लेषण

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची वारंवार जात का काढली जाते?
X

पंजाब चे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी झालेत. त्यांचे हार्दीक अभिनंदन. परंतु, ते अनु जातीचे आहेत म्हणून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. चर्चा होत असली पाहिजे. आम्ही स्पिती valley चा टूर करून दि 22 सप्टेंबर ला मनाली वरून चंदीगड ला रात्री 12 वाजता income टॅक्स dept च्या गेस्ट house ला पोहचलो.

दि23 सप्टेंबर2021 ला मोहाली इंटरनॅशनल एअरपोर्ट ला टॅक्सी ने जाताना ड्रायव्हर शी वार्तालाप सुरू केला. ड्रायव्हर पंजाबी होता. नवीन मुख्यमंत्री यांच्याबाबतसहज विचारले. तेव्हा म्हणाला,कॅप्टन ने काहीच केले नाही. नवीन मुख्यमंत्री खालच्या जातीचे आहेत .परंतु चांगला माणूस आहे. यापूर्वीच यांना मुख्यमंत्री केले पाहिजे होते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक बदल होत असतात.

चांगल्या माणसाच्या हातात सत्ता दिली पाहिजे. हरियाणा चे मुख्यमंत्री काही करीत नाही. प्रधानमंत्री सुद्धा लोकांसाठी काही करत नाही. मी म्हटले, मग काय करतात? म्हणाले मोजक्या लोकांचे हितसंबंधासाठी काम करतात. किसान आंदोलन सुरूच राहील, प्रधानमंत्री मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत. किंवा प्रधानमंत्री यांची खुर्ची खाली होईपर्यंत. एका ड्रायव्हर चे हे मत.

देशात, राज्यात सामान्य लोकांसाठी फार काही होत नाही. मोठ्या लोकांसाठी सगळं काही होते. पुढे म्हणाला, राजकीय पक्ष व नेते लोकांना खोटी स्वप्न दाखवून, लोकांची दिशाभूल करूनसत्तेत येतात आणि दिलेली आश्वासने विसरतात. निवडणूका आल्या की आपण जिंकलो पाहिजे यासाठी मुख्यमंत्री बदलतात, जात पाहून नवीन नेमतात.

आता चांगला नेता नवीन मुख्यमंत्री म्हणून पंजाब ला काँग्रेस ने दिला तर त्यांना काम करू द्यावे. मी ऐकत होतो, एका ड्रायव्हर चे मत. मुख्यमंत्री खालच्या जातीचा आहे हे ड्रायव्हरला माहीत आहे. ड्रायव्हर मात्र खालच्या जातीचा नव्हता हे ही जाणवले.

मुख्यमंत्री यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. संविधान व कायदा लागू करावे. चांगले होईल. पंजाब संविधानमय करण्याची संधी आहे. एवढं तर नक्कीच करता येते. कारण यासाठी बजेट लागत नाही, निष्ठा, निर्धार ,हिम्मत, राजकीय इच्छाशक्ती लागते. महाराष्ट्रात अनुचुचित जाती, जमाती, भटके विमुक्त, विमाप्र,ओबीसी या आरक्षित प्रवर्गातील आमदार खासदार आहेत. काही मंत्री आहेत. तरी पदोनत्ती मधील आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही. बॅकलॉग भरला जात नाही.

बजेट, विकास योजना नीट राबविल्या जात नाहीत. तेव्हा,हे नेते, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा जयघोष करणारे, संविधानाची शपथ घेणेपूर्वी ,आपल्या पक्षाच्या नेत्यांचे नाव घेणारे, संविधानाची शपथ घेतल्यानंतर, संविधानाने दिलेल्या position व power चा उपयोग संविधानाचे हक्क मिळवून देणेसाठी का करीत नाही.? काय उपयोग सत्तेत असून? ज्या प्रवर्गाचे प्रतिनिधित्व करतात त्यांचे न्याय प्रश्न तरी सुटले पाहिजे.

जातीच्या नावाने हुरळून जाणे धोक्याचे आहे. सत्ता कोणाच्याही कडे असो, जात - धर्म न पाहता, सत्तेला प्रश्न विचारण्याची हिंमत निर्माण केली पाहीजे. संविधानाचा योग्य प्रकारे, कोणाही बद्दल आकस किंवा ममत्व न ठेवता,अंमल हाच अजेंडा असला पाहिजे. सामान्य लोकांना प्रगतीकडे घेऊन जाणारा हाच मार्ग आहे. त्यासाठीच संविधान व कायदा आहे.ज्यांना वाटते अन्याय होतो आहे, त्यांनी, शासन प्रशासनातील लोकांची जात धर्म न पाहता, लिहावे, बोलावे, मोठ्या आवाजात, लोकशाही पद्धतीने हादरा देणारा आवाज करीत प्रश्न मांडावे, समाधान होईपावेतो.वेळ लागेल पण शासन प्रशासन ठिकाणावर येईल.

इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि

संविधान फौंडेशन, नागपूर

M-9923757900

दि 23.9.2021.

Updated : 24 Sep 2021 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top