Home > मॅक्स ब्लॉग्ज > बिरसा मुंढा जयंती आणि संघाचं षडयंत्र: संजय दाभाडे

बिरसा मुंढा जयंती आणि संघाचं षडयंत्र: संजय दाभाडे

बिरसा मुंढा जयंती आणि संघाचं षडयंत्र: संजय दाभाडे
X

९ ऑगस्ट हा जागतिक इंडिजिनसी डे Indigenous Day ( जागतिक मूळनिवासी डे) जगभरातील इंडिजिनस लोक साजरे करत असतांना व भारतातील आदिवासी त्यात सहभागी होऊ लागले आहेत. मात्र, संघाच्या कारस्थानामुळे आमदार अशोक उईके यांनी थोर क्रांतिकारक शहिद बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजे १५ नोव्हेंबर हा दिन 'राष्ट्रीय आदिवासी दिन' घोषित करावा असा मुद्दा पुढे रेटला आहे.

मुळात बिरसा मुंडा हे आदिवासी क्रांतिकारकांच्या महान परंपरेतील थोर क्रांतिकारक आहेत व त्यांच्या जयंतीला, त्यांचे स्मरण व त्यांना विनम्र अभिवादन करतातच. देशभरातील आदिवासी त्यांच्या जयंतीला 'उलगुलान दिन' म्हणून साजरी करणं देखील उचित ठरेल. पण आरएसएस ( संघाला ) ते नको असून त्यांना बिरसा मुंडांचा उपयोग ' ब्राम्हणी अजेंडा' पुढे नेण्यासाठी करावयाचा आहे व त्याच बरोबर आदिवासींचं इंडिजिनसत्व देखील नाकारायचं आहे.

जगभरातील इंडिजिनसी जनतेशी असलेली नाळ नष्ट व्हावी व जागतिक इंडिजिनसी संकल्पनेशी भारतीय आदिवासींचा संबंध नाही. भारतातील सगळेच लोक मूळनिवासी आहेत. अशी खास आरएसएस प्रणित भूमिका पुढे नेण्यासाठी अशोक उइके यांनी हा खडा टाकलाय. हे व्यापक षडयंत्र असून दुर्दैवाने उईकेजी हे आरएसएस प्रणित षडयंत्रातील एक प्यादे ठरत आहेत.

त्यांनी स्वतः सावध व्हावे हे त्यांच्या आदिवासीत्वला आमचे नम्र आवाहन आहे. जगभरातील इंडिजिनसी लोक "जागतिक इंडिजिनसी ( मूळनिवासी ) दिन" साजरा करतात . अलीकडील काही काळापासून भारतातील आदिवासी जनतेत जागरूकता आल्याने भारतातील आदिवासी देखील मोठ्या प्रमाणात देशभर ९ ऑगस्ट हा दिवस साजरा करतात व आपल्या ह्या भूमीवरील हक्काचा व संविधानिक हक्कांचा नारा देतात.

जगातील इंडिजिनसी लोकांचे प्रश्न साधरणतः सारखे आहेत. त्यांच्या जल, जंगल, जमिनी वरील व संस्कृतीवरील आक्रमण हे प्रश्न आहेत. कार्पोरेट कंपन्या व खुद्द सरकारे आदिवासींच्या जमीनी हिसकावून घेत असिवासींना उध्वस्त करू पाहत आहेत.

त्याविरुद्ध जगातील सगळे इंडिजिन्स जनता ९ ऑगस्टला एका आवाजात एकी घोषित करतात व भारतीय आदिवासी जागतिक इंडिजिनस प्रवाहातील एक महत्वाचा घटक म्हणून जोडले जातात. राष्ट्रीय सेवक संघाला ( RSS ) हे खुपते आहे, त्यांना आदिवासी हे येथील इंडिजिनसी लोक आहेत हेच मान्य नाही.संघाचं फक्त एकच म्हणणं आहे की भारतातील सगळे लोक ( मुसलमान , ख्रिश्चन सोडून ) मूळचे भारतीय आहेत.

जागतिक इंडिजिनस दिवसाला भारतीय आदिवासी जेव्हा जोडले जाऊ लागले आहेत. तेव्हा संघाच्या ह्या भूमिकेवर पाणी फिरते व तेच संघाला नको आहे. त्यामुळे संघाने खास स्वतःच्या स्टाइलनुसार पद्धतशीर पणे षड्यंत्र सुरु केलंय आणि जागतिक इंडिजिनस दिवसापासून भारतीय आदिवासींनी दूर जावे, अलग पडावे यासाठी 'पर्यायी आदिवासी दिवस' समोर आणण्याचे पद्धतशीर षडयंत्र सुरु केले.

आरएसएस चे मुखपत्र असलेले इंग्रजी नियतकालिक 'ऑर्गनायझर' ( The Organiser ) मध्ये १५ नोव्हेंबर २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख त्या षडयंत्राचा स्पष्ट पुरावा आहे. आमदार अशोक उईके ह्यांची भूमिका दुसरं तिसरं काही नसून ऑर्गनायझर मधील वरील लेखाच्या भूमिकेच्या अंमलबजावणीसाठी टाकलेले पाऊल आहे.

उद्या कधीतरी संघसेवक नरेंद्र मोदी देखील १५ नोव्हेंबर हा राष्ट्रीय आदिवासी दिन घोषित करतील तर कुणास फार आश्चर्य वाटू नये. कारण ते संघाचे व्यापक षडयंत्र आहे.भारतीय आदिवासी हे ह्या भूमीतील मूळरहिवासी वगैरे काहीही नसून ह्या येथील सगळ्या हिंदूंसारखेच आदिवासी सुद्धा आहेत. असे संघाला दाखवून द्यायचे आहे व त्यातून भारतातील आदिवासींना मिळालेले विशेष संविधानिक अधिकार जसे की जंगल, जल जमीनी वरील अधिकार हळू हळू संपून टाकायचे आहेत.

दुसरीकडे, बिरसा मुंडा ह्यांना आदिवासी क्रांतिकारक न मानता त्यांना ख्रिश्चन विरोधी व 'हिंदू' बिरसा मुंडा म्हणून प्रस्थापित करणं हा देखील आरएसएसचा अजेंडा आहे. तश्या प्रकारचं लिखाण व साहित्य जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. 'बिरसा मुंडा जानवं घालत होते' इथपर्यंत मिथक (myth) तयार करून ते प्रसारित करण्याचे उद्योग संघ करू लागलेला आहे.

आदिवासींसाठी ही धोक्याची घंटा आहे.....

आदिवासींना एकीकडे आदिवासी न म्हणता "वनवासी" म्हणायचे तर दुसरीकडे जागतिक इंडीजनस दिना पासून भारतीय आदिवासींना दूर ढकलायचे. तिसरे म्हणजे बिरसा मुंडा ह्यांचे क्रांतिकारकत्व म्हणजे हिंदू धर्म संरक्षणासाठीचे व ख्रिश्चन विरोधातील बलिदान ठरवायचे. बिरसा ह्यांचे शहिदत्व ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधातील नव्हे तर ख्रिश्चन ब्रिटिशांच्या विरुद्धचे व एकूण ख्रिश्चन मिशनरी विरुद्धचे उलगुलान ठरवायचे व त्यातून भारतीय आदिवासींना हिंदू ठरवायचे. आदिवासी तरुणांना भडकावून त्यांना ख्रिश्चन विरुद्ध दंगलींत ‘फूट सोल्जर' म्हणून वेळ पडल्यास वापरायचे. हे आरएसएस चे मूळ षडयंत्र आहे.

उईके त्या षडयंत्रातील प्यादे ठरत आहेत. असे दुर्दुवाने म्हणणे भाग पडत आहे.

" ऊईकेजी, आरएसएस च्या षडयंत्र सहभागी होऊ नका’’

आदिवासींना वनवासी ठरवून आदिवासींचा अवमान करू नका......

आणि आदिवासी जमातींना ब्राम्हणी व वैदिक हिंदूंच्या जाती व्यवस्थेत ओढण्याचा प्रयत्न करू नका.....

हे नम्र आवाहन असून तुम्ही तुमचा तो प्रस्ताव त्वरित मागे घ्या... व नवीन प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला सादर करा की -

‘जागतिक इंडिजिनसी दिवस' ९ ऑगस्टला महाराष्ट्राने सार्वजनिक सुट्टी घोषित करावी व केंद्र सरकारने देखील ती सुट्टी घोषित करावी असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवा.

महाराष्ट्तातील सर्वं आदिवासी २५ आमदार व ४ खासदारांनी देखील असा प्रस्ताव एकमुखानें दाखल करून मंजुर करुन घ्यावा.

प्रिय आदिवासी बंधू भगिनींनो, आरएसएस आपल्यात विविध मार्गाने घुसू बघत असून आपल्याच काही नेते मंडळींना हाताशी धरून, आपल्यासाठी खूप छान काम आरएसएस करत असल्याचे दाखवून, आपल्यात त्यांचे स्वयंसेवक पद्धतशीरपणे पेरून आपले आदिवासीत्व नाकारून आपणाला वनवासी ठरवू बघत आहे. आपल्याला ब्राम्हणी जाती व्यवस्थेत खेचू बघत आहे. हे फार भयानक पाताळयंत्री षड्यंत्र आहे. व आपलीच काही मंडळी त्यास बळी पडत आहेत.

ह्यास वेळीच प्रतिबंध केला पाहिजे व आपणाला वनवासी म्हणवून हिणविणाऱ्यांना जराही थारा देऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे.

डॉ संजय दाभाडे आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच ,

पुणें ,

[email protected]

Updated : 9 Aug 2020 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top