Home > मॅक्स ब्लॉग्ज > छत्रपती संभाजी महाराज कोणाला टोचतात?

छत्रपती संभाजी महाराज कोणाला टोचतात?

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनेक वावड्या उडवल्या जात आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना ठरवून बदनाम केले जाते. पण खरंच छत्रपती संभाजी महाराज कुणाला टोचतात? याविषयी इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी परखड भाष्य केले आहे. नक्की वाचा....

छत्रपती संभाजी महाराज कोणाला टोचतात?
X

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावर झाला. शंभूराजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सई बाई यांचे निधन झाले. कमी वयातचं संभाजी राजेंनी पराक्रमी, कणखर, निर्भीड वृत्ती प्राप्त केली. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी वयाच्या 8 व्या वर्षी संभाजी राजांना मुघलांच्या गोट्यात जावं लागलं. स्वराज्य रक्षणासाठी शत्रूच्या गोट्यात जाणारे जगातील एकमेव बालवीर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज... ज्या पद्धतीने संभाजी राजे आदिलाशाही, मुघलशाहीविरोधात लढत होते त्याचप्रमाणे ते ब्राह्मणशाही विरोधातही लढत होते. एकंदरित संभाजी महाराजांचा संघर्ष आणि त्यांच्या हत्येचं ब्राह्मणीमंत्र्यांनी रचलेलं कटकारस्थान याविषयी डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त मांडलेले मत आज पुण्यतिथीनिमीत्त पुन्हा प्रसिध्द करीत आहोत.

Updated : 21 March 2023 3:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top