Home > मॅक्स ब्लॉग्ज > #Sensex : xxx दम असेल, खोल खिसा असेल तरच....

#Sensex : xxx दम असेल, खोल खिसा असेल तरच....

शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी मोठ्या प्रमाणात कोसळला आणि अनेकांचे लाखो कोटींचे नुकसान झाले. पण शेअर बाजाराचे गणित काय आहे, निर्देशांक खाली वर नेण्याचा खेळ कोण खेळतंय, शेअर बाजाराच्या बेभरवशाच्या या खेळात कुणी उतरावे, याचे विश्लेषण केले आहे संजीव चांदोरकर यांनी....

#Sensex  :  xxx दम असेल, खोल खिसा असेल तरच....
X

काल सेन्सेक्स १४५० अंकांनी कोसळून ५२,८५० वर बंद झाला आहे ; सात लाख कोटींचे बाजारमूल्य हवेत उडून गेले ; पोस्ट वाचाल तोपर्यंत ही बातमी शिळी झाली असेल. परकीय संस्थाच नाही तर अनेक गुंतवणूकदार इक्विटीमधील आपल्या गुंतवणुकी काढून घेत आहेत ; त्यामुळे शेअर निर्देशांक कोसळत आहेतस अजून कोसळतील. हे एवढ्यात थांबणारे नाही

खाली दिलेल्या ग्राफमध्ये गेल्या वर्षभरातील सेन्सेक्स कसा चढला, कोसळला याचे चित्र आहे

ऑगस्ट २०२१ : ५२,००० पासून चढत

ऑक्टोबर २०२१ : ६२००० खाली येत

परत डिसेम्बर २०२१ : ५६,००० पासून चढत

जानेवारी २०२२ : ६१,००० खाली येत

मार्च २०२२ : ५३,००० पासून चढत

एप्रिल २०२२ : ६०,००० प्लस

जून २०२२ : ५३,०००

हा काय लहान मुलांच्या अम्युजमेंट पार्कमधील रोलर कोस्टर खेळ नाही मित्रांनो

लाखो कोटी रुपयांचा खेळ आहे हा ; काही गोष्टी लक्षात घ्या

१. सेन्सेक्स ज्यावेळी वर जातो आणि खाली येतो नंतर पुन्हा वर जातो हे काही गुरुत्वाकर्षणासारख्या नैसर्गिक शक्तीने नाही ; ते मानवी एजन्सीज अतिशय सजगपणे करतात ; म्हणजे शेअर्सची खरेदी-विक्री कोणत्या शेअर्सची, किती शेअर्सची, केव्हा हे कोणीतरी ठरवते

२. सेन्सेक्स वर गेल्यावर सर्व शेयर्स वर जातात, सर्वांचा नफा होतो ; सेन्सेक्स खाली आल्यावर सर्व शेअर्स खाली येतात आणि सर्वांचे नुकसान होते असे कधीच नसते.

३. शंभर टक्के रिटेल गुंतवणूकदार फक्त कॅश सेगमेंटमध्ये व्यवहार करतात ; तर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि हाय नेटवर्थ व्यक्ती एकाचवेळी कॅश आणि डेरिव्हेटीव्हमध्ये खेळतात; त्यामुळे त्यांचा नफा / तोटा एकत्रित पणे बघतात ; आणि तीच शास्त्रीय पद्धत आहे

६२,००० सेन्सेक्स असतांना तुम्हाला जी लोक सल्ला देत होती की शेअर्स अजून वर जातील घ्या ; ती त्यावेळी स्वतःचे शेअर्स विकत असतील ; सेन्सेक्स ५६,००० आला ,मग तुम्हाला भीती वाटली की अजून खाली जाईल , म्हणून तुम्ही आहेत ते शेअर्स तोटा पत्करून विकले असतील तर याच लोकांनी याच लोकांनी तुमचे शेअर्स विकत घेत सेन्सेक्स ६१,००० वर नेला , मग परत विकले , मग परत खरेदी केले

प्रत्येक चांगली बातमी पेरली जाते , बातमीला साखर लावली जाते ; प्रत्येक वाईट बातमीला तिखट , कडू लावले जाते ; घबराट पसरवली जाते रक्तरंजित खेळ आहे हा ; xxx दम असेल , खोल खिसा असेल, जोखीम घेण्याची पैशाची ऐपत असेल तरच उतरा ; नेहमीचे नैतिक जजमेंट पास करू नका


Updated : 14 Jun 2022 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top