Home > मॅक्स ब्लॉग्ज > विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये म्हणणारे नक्की कोण असतात?

विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये म्हणणारे नक्की कोण असतात?

विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये म्हणणारे नक्की कोण असतात?
X

आपल्या स्वतःच्या मुलांना पाचवी पासून आयआयटीची तयारी करून घेणारे असतात. त्यांना सामाजिक विज्ञान / सोशल सायन्सेस मुलांना शिकायला लावणे म्हणजे “वेस्ट ऑफ टाइम” वाटतो. जगातील कोणताही प्रश्न तंत्रज्ञान, फायनान्स आणि मॅनजेमेंट द्वारे सोडवला जाऊ शकतो असं ते मानतात.

हीच लोक आपल्या बचती परदेशात नेऊन तिकडे गुंतवणारे असतात. परदेशात एखादे घर घेऊन, तिथलं नागरिकत्व, ग्रीन कार्ड खिशात ठेवणारे असतात. ह्यांच्यातलेच चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉर्पोरट लॉयर असतात. जे भ्रष्टाचाराच्या वाटा, पळवाटा भ्रष्टाचार करणाऱ्यांना भरमसाट फी घेऊन दाखवतात.

हे ही वाचा...

त्या रात्री जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं?

जेएनयू अपडेट – गेटवे इथून आंदोलक विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलवलं

आपल्याच जमिनीवर आदिवासी बांधव ठरले उपरे

देश एक महाकाय कंपनी आहे. करसंकलन त्या कंपनीची वार्षिक “विक्री” आहे. अर्थसंकल्प म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो. आणि दरवर्षी कंपनीने सरप्लस दाखवला पाहिजे म्हणतात.

देशात हुकूमशाही असावी हे लोक मानतात. ही लोक त्याच पूर्वजांचे वैचारिक वंशज आहेत. ज्यांनी बहुसंख्यांकाना, स्त्रियांना साध्या अक्षर ओळखीपासून दूर ठेवले होते.

दुर्दैव हे आहे की, जगात लोकसंख्येत १ टक्का देखील नसणाऱ्या या लोकांचा हा ‘वर्ल्ड व्ह्यू’ जगावर राज्य करतो आहे.

एका अर्थाने या १ टक्के लोकांना दोष देणे सोपं आहे; सुरुवात आपण कमी पडत आहोत. हे मान्य करण्यापासून झाली पाहिजे.

Updated : 7 Jan 2020 8:15 AM GMT
Next Story
Share it
Top