Home > मॅक्स ब्लॉग्ज > मग दंगली करायला नेमकं येतंय तरी कोण?

मग दंगली करायला नेमकं येतंय तरी कोण?

मग दंगली करायला नेमकं येतंय तरी कोण?
X

CAA, NRC आंदोलन दोन्ही प्रमुख शहरांत अनुभवलं. दिल्ली आणि मुंबई. कोलकाता मधलं आंदोलन लांबून पाहीलं. भाषेची मर्यादा आड आली. पण, ममता बॅनर्जी स्वतः रस्त्यावर उतरून लीड करत होत्या. महाराष्ट्रातही ठाकरेंनी त्या बिलास स्पष्ट नकार दर्शवला. तो नकारच आणि ते ही ठाकरेंच्या तोंडून खुप शॉकिंग होतं. पण वातावरण बदलत होतं.

या आंदोलनावेळी जागोजागी शाहीन बाग उभे राहीले. लोक घर दार सोडून रस्त्यांवर बसले. अशा स्थितीत पंजाब हरयाणा सीमेवरून, देशभरातल्या गुरूद्वारा कमीट्यांकडून रोजचं जेवणं, पाणी, फळं, सेवा आणि औषधं पुरवली जात होती. सेवा पुरवताना काही ठिकाणी चक्क कपडेही धूवून दिले जात होते.

नंतर कोरोना आला. थूक जिहाद कूप्रसिद्ध झाला. तेव्हाही याच कमिट्या मोहल्ल्यांसाठी धावून आल्या. तबलिघींना आणि त्याआडून मुसलमानांना शक्य तितकं बदनाम करून झाल्यावर सर्वात आधी अँटीबॉडी देऊन रस्तोरस्ती जेवण पोहोचवायला याच मुसलमानांनी कोणतीची कसर सोडली नाही. असो..

आज पंजाब हरयाणाचे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर धडकलेत. तेव्हा गुरूद्वारा कमीट्यांसोबत मोहल्ला कमीट्याही धान्य, रेशन पाणी घेऊन पोहोचल्यात. अधून मधून पीठ मळतानाचा, जेवण बनवतानाचा एखादा फोटो येतोच आहे.

पण या आंदोलनापासून मुसलमानांनी स्वतःस पूर्णतः बाजूला ठेवलंय ते ही हेतूपुरस्सर. एक मित्र कुटूंबासोबत आंदोलनात आहे. सांगत होता. पंजाबातल्या प्रत्येक घरातून एक जवान एक किसान आहे. तरी खलिस्तानी म्हणून ठपका लावलाच ना. मुस्लिम या आंदोलनात दिसावे आणि वेगळं वळण लागावं याची तर सरकार केव्हापासून वाट पाहतायेत.

त्याचे आजोबा म्हणाले.. बेटा सरकारी नोकरी हो या तुम्हारी प्रायवेट वाली. इन नौकरीयो की तनख्वाह ने भांड बना दिया है सब को। अब किसान ही इस खरपतवार को जड से उखाडेगा।

आजोबा ८८ चे आहेत. कर्नल म्हणून निवृत्त आहेत. पायावर लाठी बसली. फ्रॅक्चर आहे. पण जिद्द कायम आहे. महाराष्ट्र आता हळहळू पेटतोय असं सांगितलं.. अजून एका आंदोलक मित्राच्या वडिलांना... आग दिल में जलकर सिर्फ सनिमा के गाने लिखें जाते है, क्रांती चाहीये तो मशाले जलाकर मदमस्त हुक्मरानो को राख करना होगा। राजू शेट्टी से कहीए, हिम्मत जुटाएँ और आएँ मैदान में।

मुंबईत आलो की एकदा सोबो च्या लोकांना विचारणार आहे त्यांचं मत. तूर्तास मलाच एक प्रश्न सतावतोय. लोक जर इतके संयमाने वागून आंदोलन उभं करतायेत, चालवताहेत तर.. मग दंगली करायला नेमकं येतंय तरी कोण?

Updated : 5 Dec 2020 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top