Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठी साहित्य संमेलन: नव लेखकांना संधी केव्हा मिळणार?: महेश माने

मराठी साहित्य संमेलन: नव लेखकांना संधी केव्हा मिळणार?: महेश माने

मराठी साहित्य संमेलन: नव लेखकांना संधी केव्हा मिळणार?: महेश माने
X

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे २६,२७,२८ मार्चला पार पडणार आहे. मात्र, या साहित्य संमेलनात नवलेखकांना व्यासपीठ मिळतं का? असा सवाल तरुण लेखक महेश माने यांनी केला आहे. महेश माने यांनी निसर्ग आणि स्पंदनीय हृदय नावाची कांदबरी लिहिली आहे.

ते म्हणतात... नम्रपणे सांगायचं झालं तर संमेलनाचे अध्यक्ष डॉ जयंत नारळीकर आहेत. त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे. विज्ञान आणि भाषा साहित्य ह्यांचा ते सुरेख मेळ नक्कीच घालतील ही आशा मनाला लागून आहे.

मात्र, मराठी भाषेतील नवलेखकांना कोण न्याय देणार? भाषा आपल्या मनातील भाव प्रकट करते म्हणून लेखकांना खूप मोठी समाजात प्रतिष्ठा आहे. पण दुर्दैवानं फक्त प्रसिद्ध लेखकांचे मत मांडण्यास व्यासपीठ आहे. नवलेखकांना कोणी विचारत ही नाही. त्यांच्या समस्या कोठेही मांडल्या जात नाहीत. लेखनासाठी जीवन त्यागणाऱ्या व्यक्ती ही आपणास दिसत नाही. कारण त्यांना कोणीही प्रकाशझोतात आणत नाही. त्यांना कोणीही आपलं मत मांडण्याचा अधिकार देत नाही.

फक्त प्रसिध्दी आणि प्रतिष्ठा यांसाठीच वाद होतात. त्यात नवं साहित्याचं नवं रोप होरपळून जळून जाते. कधी असा विचार - विनमय झाला आहे का? नवलेखकांना मुख्य व्यासपीठावर बोलण्याची संधी देऊ. त्यांचं मत ऐकून घेऊ. कारण भाषा साहित्याचा प्रवाह अविरतपणे पुढे नेण्याची जबाबदारी भावी पिढीची आहे. पण असे वाद होताना दिसत नाहीत. ते वाद होतात. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.

मग भाषा साहित्याचा प्रवाह अखंड सुरू राहील का? काही मोजक्या लोकांच्या हाती हा प्रवाह जाईल. अगदी घराणेशाही सारखं! वडील लेखक असतील तर मुलगा वडिलांच्या नावावर प्रसिद्ध होईल. आत्ताचं ज्वलंत उदाहरण घेऊ. माझे काका खूप छान पत्र लिहीत असत. इतकी छान की लोक पत्र जपून ठेवत. असं माझे वडील सांगत. नंतर त्यांनी कादंबरी लिहायला घेतली. पण त्यांच्या लिखाणातून ते लेखक होऊच शकले नाही. कारण प्रकाशक कितीही छान लिहिले तरी घेत नाहीत. कारण नव्या लेखकांचं नाव प्रसिद्ध नसतं. पुस्तकं जो प्रसिद्ध आहे त्याचीच खपतात. त्यांना लिखणाशी इतकं देणं घेणं नसतं. त्यामुळे ते प्रकाशझोतात येत नाहीत.

50 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकार साहित्य संमेलनाला देणार आहे. त्यातील लाखो रुपये समारंभ गुच्छ आणि फुलांनी सुशोभीकरणात जातील. दोन चार दिवसांनी त्याचं रूपांतर कचऱ्यात होईल. मुख्य व्यासपीठावर नवलेखकांना बोलण्याची संधी दिली जात नाही. मराठी भाषेची ग्रंथसंपदा अखंड ठेवण्याची जबाबदारी भावी पिढीची असते.

'निसर्ग आणि स्पंदनिय हृदय 'ह्या संकल्पनेवर तसेच भूतकाळातील साहित्य ठेवा आणि वर्तमानकाळातील साहित्य ठेवा ह्या विषयी नवीन लेखकांचं काय मत असायला हवे आणि भाषा साहित्य कसं समृद्ध करता येईल? याविषयी मला व्यासपिठावर बोलायचे होते पण कोणीही बोलू दिलं नाही जेथे नवलेखकांना आपलं मत मांडण्यासाठी व्यासपीठावर वाव मिळत नाही. असं संमेलन जेथे लाखो रुपये खर्च केले जातात. पण नवलेखक प्रकाशझोतात येत नाही. त्यातून निष्पन्न काय होतं? साहित्य संमेलन हे प्रसिद्ध लेखक - कवी यांनी एकत्र येऊन लोकांचं केलेलं मनोरंजन इतकचं आहे का?

भाषा साहित्याची नवनिर्मिती असं काहीही होताना दिसत नाही .मग ह्या साहित्य संमेलनाचा अर्थ काय? ............ माझ्याकडे तर याच उत्तर ना

Updated : 16 Feb 2021 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top