Home > मॅक्स ब्लॉग्ज > पत्रकार जेव्हा कन्फ्यूज होतो

पत्रकार जेव्हा कन्फ्यूज होतो

पत्रकार जेव्हा कन्फ्यूज होतो
X

सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत ढासळत असून काही मित्र विचारतात अरे भावा तू पत्रकार आहेस ना तुझं काय मत आहे आताच्या राजकीय घडामोडींवर...यावेळी कन्फ्युज झालेला मी त्यांना काय सांगावं हे सूचेनास होतं.

लहानपणापासून घरातून मिळालेले संस्कार आणि त्यानंतर आपल्याला समजायला लागल्यानंतर समाजात होणारे बदल. कोणी म्हणतो मला हा नेता आवडतो कोणी म्हणतो मला तो नेता आवडतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी या आवडीनिवडी त्यांच्या विचारसरणीला कुठेतरी निगडीत असतात त्यांना वाटत असतं की माझा नेता करतोय ते योग्य असेल परंतु सध्या ती स्थिती पाहिली तर कोणाचाच राजकारणावर विश्वास राहिला नाही.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपच्या पंक्तीत बसले. पुन्हा अजितदादांच्या बंडा मुळे दुचाकी सरकारचं एक चाक पुन्हा पंक्चर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षांपूर्वी भाजपमुळे खिशात राजीनामा घेऊन फिरणारे आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला निधी मिळत नव्हता असे आरोप करणाऱ्या नेत्यांचं काय भवितव्य असेल हे सांगता येणार नाही. महाराष्ट्रात भाजप सेक्यूलर विचारसरणी आणि राष्ट्रवादी rss आणि हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारणार का? हा येणाऱ्या काळातला मोठा प्रश्न आहे.

आपले नेते फक्त आश्वासन देतात tv चॅनेल समोर आले की त्यांची सुरुवात गरीब कुटुंब, सामान्य नागरिक,शेतकरी, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे समोर येतात. मग ते सत्तेत असो किंवा विरोधात स्वतःच्या स्वार्थासाठी कसे राजकारण करायचे त्यांना सांगायला नको. आणि सामान्यांना ते समजायला नको याची काळजी ते घेतातच. कालपर्यंत नावाने विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारे लगेच सत्तेत जाऊन बसतात या कोणत्या विचारधारेच्या गप्पा असतील.. विरोधी पक्ष नेता असावा तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा. विरोधात असताना सत्तेतील सर्वच नेत्यांना घाम फोडणार नेतृत्व होत परंतु ते महाविकास आघाडीती कोणत्याच नेत्याला जमलं नाही. दादांची रोखठोक शैली जरी असली तरी विरोधी पक्ष नेते म्हणून ते सपशेल अपयशी ठरले आहेत असं माझं प्रामाणिक मतं आहे. राज्यात विरोधी पक्षच हे सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देऊ शकता त्यांच्यासाठी भांडू शकता परंतु तोच नेता ज्यावेळी सत्तेत जाईल त्यावेळी ते सर्व प्रश्न विसरून आपल्या सोबत आलेले लवंडे यांच्या पोसण्याचं काम करतो त्यातून त्यांना या उभ्या जनतेकडे लक्ष देण्यासाठी वेळ उरत नाही.

सध्या सोशल मीडियाचं एक खूळ प्रत्येक नेत्याला लागलं आहे. चालतो कसा? बोलतो कसा? फिरतो कसा? आणि त्यातून एखाद्या गरिबाला जवळ करून पब्लिसिटी त्यांचा स्टंट बनत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री ही यातून सुटत नाही हेलिकॉप्टरने बांधावर जातात आणि शेती करत असल्याची व्हिडीओ पोस्ट करतात. आपला ही trp वाढला पाहिजे यात मीडिया वाले रेस मध्ये येतात आणि सर्वात आधी कसा प्रकाशित होईल यावर लक्ष देतात परंतु खरंच एखादा शेतकरी असा राहू शकतो का किंवा जो खरंच शेतीतुन आपलं पोट भरतो त्याचे प्रश्न सद्यातरी कोणी दाखवत नाही. अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, बाजार भाव यावर मोठमोठे चर्चा सत्र भरवतील. परंतु त्या शेतकऱ्याला खरच मदत मिळाली आहे का यावर कोणी चर्चा करताना दिसत नाही आणि विरोधकांचा खिसा भरला की तोही विसरतो की आमच्या विभागात एका शेतकऱ्याने दुष्काळामुळे आत्महत्या केली होती. देशाच्या अमृतमोहत्सवी देखील आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या काय मागण्यात आहेत तर रस्ता, पाणी, वीज, आणि शिक्षण हाच टप्पा पूर्ण करू शकलो नाही. परंतु राजकारणात येऊन हजारो कोटींची मालमत्ता कमावून स्वतःच्या कित्तेक पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलं आहे. त्यांना ed, sbi,इनकम टॅक्स सारख्या एजन्सी सत्तेत येई प्रयत्न निर्मा पावडर घेऊन हात धुवुन मागे लागतात एकदा सत्ते आले की स्वछ होतात. किरीट सोमय्या सारखी लोक नक्की काय काम करतात हे समजायला मार्ग नाही.की पक्षा ed चे हेर म्हणून त्यांची नेमणूक केली आहे हे समजत नाही.

परंतु खरचं कोणी जनसामान्यांची, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील का. मांडत असतील तर त्यावर या 75 वर्षात काहीच का तोडगा निघाला नाही हा प्रश्न उरतोच.. आघाडीत बिघाडी, शिवसेनेत गद्दारी, आणि राष्ट्रवादीत बंड यावर यापुढे काय घडेल यावर सध्या तरी काही सांगता येणार नाही

कृष्णा कोलापटे

Updated : 10 July 2023 3:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top