Home > Top News > भारतीय अर्थव्यवस्थेच्या घरात तीन भाऊ राहतात...

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घरात तीन भाऊ राहतात...

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घरात तीन भाऊ राहतात...
X

वयाने सर्वात मोठे: सार्वजनिक मालकीचे उपक्रम; वयाने मधले: खाजगी कॉर्पोरेट आणि वयाने धाकटे: खाजगी नॉन कॉर्पोरे , एमएसएमई क्षेत्र वडील भाऊ आतापर्यंत कुटुंबातील कर्त्याप्रमाणे त्याने घराची बारीक जबाबदारी उचलली. मधला भाऊ पहिल्यापासून वेगळाच, वेळ असेल त्याप्रमाणे कुटुंबाचा फायदा घेणारा नाहीतर स्वतःचे बघणारा, लहान भाऊ तब्येतीने किरकोळ, पण घरभर पसारा मांडून ठेवणारा...

मधल्या भावाच्या आकांक्षा नव्वदी पासून वाढतच आहेत; त्याला घरात जास्तीत जास्त अवकाश हवा आहे; सारे घर ताब्यात घ्यावे असे वाटते आहे. त्याला आंतरराष्ट्रीय बुलींची साथ आहे; तुला सर्व प्रकारची मदत आम्ही देतो, आम्हाला पण तुझ्या घरात जागा दिली पाहिजे असे करार त्यांच्यात आहेत.

घराचा आकार सतत वाढता असता तर तिन्ही भाऊ राहू शकले असते कदाचित... पण आपण घराचा आकार वाढवावा अशी मधल्या भावाची नियत नाही. मग राहता राहिला मार्ग वडील भावाला व्हरांड्यात ढकलत नेणे आणि धाकट्या भावाला आपल्यासाठी राबायला भाग पाडणे. मोठ्या भावाने / शासनाने सार्वजनिक उपक्रम विकायला काढले आहेत.

मोठे कॉर्पोरेट भांडवल किरकोळ, छोट्या, मध्यम आकाराच्या उद्योगधंद्याचे, शेतकऱ्यांचे धंदे खाऊ लागले आहेत. याचे अर्थ आहेत. मोठ्या कॉर्पोरेट भांडवलाला भांडवल रिचवण्यासाठी, धंदा करण्यासाठी, नफा कमावण्यासाठी अधिकाधिक जागा, आहेत. त्या घरातच मिळेल घराचा आकार वाढला नाही तरी चालेल.

Updated : 24 Sep 2020 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top