Home > मॅक्स ब्लॉग्ज > #HDFCBank विलीनीकरणाचा "व्हायगारा"

#HDFCBank विलीनीकरणाचा "व्हायगारा"

HDFC आणि HDFC बँक यांच्या विलिनीकरणानंतर शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये मोठी उसळी निर्माण झाली. पण या व्यवहाराचा अर्थ काय आहे, ते सोप्या शब्दात समजावून सांगितले आहे अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी...

#HDFCBank  विलीनीकरणाचा व्हायगारा
X

HDFC आणि HDFC Bank यांच्या विलीकरणाच्या बातम्यांनी काल बँकिंग आणि वित्त जगत दुमदुमले ; नवीन वित्त वर्षाच्या पहिल्या सोमवारी साऱ्यांनी दिवाळी साजरी केली ; सेन्सेक्स पुन्हा एकदा ६०,००० च्या शिखरावर पोचला. एचडीएफसी एक एनबीएफसी आहे , आरबीआय स्वतः एनबीएफसी ना बँकेत रूपांतर करण्यास प्रोत्साहन देत आहे ; बँक आणि नॉन बँक मधील सीमारेषा धूसर होत आहेत ; एनबीएफसीना स्वतःचे स्वस्त स्रोत उभे करणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. बरीच समर्थक कारणे आहेत, आई आणि मुलीचे विलीनीकरण करण्याची….

ज्यावेळी या दोन वित्तसंस्था एक होतील त्यावेळी देशातीलच नव्हे तर जगातील पहिल्या १०० बँकात बऱ्याच वरच्या क्रमांकावर स्थान पटकावले जाईल. पण हे विलीनीकरण जागतिक मर्जर्स आणि अक्विजिशन्स उद्योगाच्या व्यापक कॅनव्हासवर बघितले आणि अजून थोडे खोलात गेले तर निराळी कारणे देखील दिसतील.

गेल्या १२ महिन्यात सेन्सेक्स जवळपास ३३ % वाढला आहे. त्यामानाने दोन्ही HDFC आणि HDFC बँकेचे शेअर्स वाढू शकलेले नाही. ते वाढण्यासाठी त्याला बाह्य व्हायगाराची गरज आहे. याचे कारण त्यांच्या नफ्याचे दर, रिटर्न व इक्विटी , कोठेतरी स्थिरावले आहेत. बिझिनेस व्हॉल्युम वाढेल पण नफ्याचे दर नाही वाढणार आणि भागभांडवलात गुंतवणूक करणाऱ्यांना, विशेषतः परकीय गुंतवणूकदारांना, नफ्याच्या दरात, दीर्घकालीन दरात, रस असतो. they are always forward looking … HDFC च्या भागभांडवलात परकीय गुंतवणूकदारांचा हिस्सा आहे ७० % आणि HDFC Bank मध्ये ४०% ; त्यावरून कळेल विलीनीकरणामागील ढकलशक्ती कोणती आहे ते

जगातील प्रमुख देशात कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या कंपन्या / बँका अजून मोठ्या होत जाणार आहेत , बँकिंग मध्येच नाही सर्व क्षेत्रात….भारतातील ज्या ज्या उद्योगात परकीय भांडवलाला गुंतवणूक करण्यात रस आहे (ऑनलाईन शिक्षण , इ कॉमर्स , फिनटेक , फार्मा , बँकिंग , ब्रोकिंग इत्यादी ) त्यात मोठ्या प्रमाणावर पुढच्या १० वर्षात विलीनीकरण घडवून आणण्यात येईल.

संजीव चांदोरकर (५ एप्रिल २०२२ )

Updated : 5 April 2022 2:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top