Home > मॅक्स ब्लॉग्ज > Gig Economy म्हणजे काय?

Gig Economy म्हणजे काय?

:अलीकडे वेगळ्याच धाटणीचे बिजनेस models येत आहेत. गेल्या काही वर्षात पगार द्यायचा नाही, पण कामगार जीव तोडून काम करतील अशा प्रकारचे बिजनेस models आले आहेत अन ते जोरदार यशस्वी झाल्याचे दिसते. Ola, uber, zomato, Swiggy, food panda, frazo, Oyo rooms. etc. etc. ही सारी Gig business ची models विषयी विश्लेषण केलं आहे निलेश अभंग यांनी...

Gig Economy म्हणजे काय?
X

बहुतांशी businesses Doorstep delivery businesses आहेत.'Gig' हा शब्द अमेरिकेत Jazz musicians कडून 1920 मध्ये live musical performance साठी वापरला गेला. विशिष्ट वेळेपुरते विशिष्ट जागी (Hotel, Auditorium) performance करून त्या दिलेल्या वेळेचा मोबदला घेणे म्हणजे Gig. म्हणजे freelance work. मासिक पगार, भत्ते, वगैरे भानगड नाही.

काम करा, पैसे घ्या, असे.

हेच model अलीकडे बरेचसे startups वापरताना दिसतात.

Zomato, Swiggyची मुले पगारावर नसतात, deliveries नुसार त्यांना पैसे मिळतात, Ola-Uber चे drivers पगारावर नसतात, ट्रिपनुसार त्यांना पैसे मिळतात. म्हणजे ते कंपनीचे gig म्हणून काम करतात.

ह्या Model मुळे Employer चा खूप जास्त फायदा होताना दिसतो आहे. जागा, जमीन, Product, कामगारांचे पगार वगैरेमध्ये त्यांना आधीच्या तुलनेत जास्त पैसे गुंतवावे लागत नाहीत. त्यांना त्यांच्या System मध्ये, Softwares मध्ये, Advertisement मध्ये, Gigs च्या Recruitments आणि Trainings मध्ये श्रम आणि पैसा ओतावा लागतो.

GIG Business मध्ये कंपनी एक प्रकारचे ठोक्याने-गुत्त्याने-ठेकेदारीने-कंत्राटाने GIG ला काम देते. मोठ्या कंपन्या खूप सारे GIGs जमवून त्यांच्यातच स्पर्धा लावून त्यांच्याकडून त्यांच्या ग्राहकांसाठी उत्तमोत्तम सेवा करवून घेतात.

कामगारांच्या मासिक पगाराची जबाबदारी न घेता उभारलेली ही साखळी आहे, हे वेगळेच बिजनेस model आहे.यात काम मिळवण्यासाठी कामगारांना कामाप्रती अतिशय craft (Work profile नुसार) असावे लागते, तरच काम मिळते, अन्यथा नाही.

Lockdown च्या काळात बऱ्याच छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना कामगारांना कमी करावे लागले, मात्र कंपनी पुन्हा सुरू झाल्यावर त्यांना कामगारांच्या श्रमाची-कौशल्याची गरज भासू लागली, तेव्हा त्यांनी कामगारांना थेट Payroll वर न घेता Gig म्हणून घेतले.

उदाहरण देतो.

माझ्या Leave and License च्या रजिस्ट्रेशनच्या कामासाठी आम्हाला Client च्या घरी किंवा ऑफीसमध्ये जाऊन Registration करावे लागते, त्या कामाला साधारण अर्धा तास लागतो. काम झाल्यावर ऑफिसमध्ये येऊन ते document संबंधित दुय्यम निबंधकाकडे approval साठी process करावे लागते. Document approve होऊन आल्यावर त्यांच्या प्रिंट काढून ग्राहकांना Hard Copy पोहोच कराव्या लागतात. म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी अन एक कागदपत्रे Deliver करण्यासाठी असे दोनदा ग्राहकाकडे जावे लागते. त्यासाठी वेळ जाई, पेट्रोल वापरले जाई, मोटरसायकलच्या maintainance चा खर्च, शिवाय त्या दोन ते तीन तासात इतर Revenue Generate करणारी कामे करता आली असती, ती होत नसत.

त्यासाठी एक तर स्वतः कागदपत्रे Deliever करा (हा पर्याय शक्य नव्हता, म्हणून तो टाळला) अथवा एखादा Delivery Boy किंवा ऑफिसबॉय Hire करणे गरजेचे होते. त्याला पेट्रोल खर्च, मोटरसायकल, पगारपाणी द्यावे लागणार. त्याच्या सुट्ट्या, दुखणीभानी, त्याच्या घरात येणारे लग्न, समारंभ adjust करावे लागणार. त्याच्या कलाने जावे लागणार.

पेक्षा मी एका स्थानिक कुरिअर कंपनीला संपर्क केला, त्यांना दिवसाला दहा कुरियर करण्यासाठी envelopes देऊ, same day deliver कराल का, असे विचारले. ते हो म्हणाले.

ते गेली दोन वर्षे रोज माझ्या कामाच्या जागी येऊन documents घेऊन जातात अन माझ्या ग्राहकांना same day deliver करतात. हे एक freelance work- Gig च आहे, ज्याने माझे काम सोपे झाले अन माझा माणसांना हाताळून काम करवून घेण्याचा ताण वाचला.

प्रत्येक Business Models चे फायदे-तोटे असतात, तसे याचेही आहेत.

मात्र Freelance work करू इच्छिणाऱ्या, वेळेच्या flexibilityची आवश्यकता असलेल्या लोकांसाठी ही कल्पना खूप helpful आहे. मात्र यासाठी सतत स्वतःला updated ठेवणे, Networking करणे, कामे मिळवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. Gigsसाठी Online Platforms उपलब्ध आहेत. तिथे आपल्या work profileची माहिती upload करून कामे मिळवली जाऊ शकतात. शिवाय ह्या डिजिटल युगात जगभरातून कामे मिळवता येऊ शकतात.

येणाऱ्या काळात GIG Economy बराच धुमाकूळ घालणार आहे, असे दिसते. शिवाय प्रत्येकाला skilled, competent राहणे नितांत गरजेचे असणार आहे. रोजगार वा जॉब मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला business skills विकसित करण्याशिवाय पर्याय नसणार आहे.भारतात सध्या हे Self Employed पध्दतीचे Business Model भ्रूणावस्थेत आहे, जे वेगाने अंग धरत आहे.

तळटीप : मोठ्या कंपन्या सुरुवातीला Gigs ना उत्तम परतावा देत असल्या तरी कंपनीने मार्केटमध्ये उत्तम penetration केल्यानंतर त्या Gigsना पिळून काढणार हे जवळजवळ नक्कीच आहे. कारण कंपन्या तळाला असलेल्या साऱ्या Gigs मध्ये प्रचंड स्पर्धा घडवून आणून नफ्याचा मोठा वाटा स्वतःकडे वळता करून घेतात.

- निलेश अभंग, कल्याण.

#gigeconomy

#BusinessPost

Updated : 27 Dec 2021 5:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top