Home > मॅक्स ब्लॉग्ज > हेरगिरी म्हणजे काय ?

हेरगिरी म्हणजे काय ?

हेरगिरीची चर्चा अनेकदा होत असते. त्यातच डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक केल्याने या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. पण खरंच हेरगिरी (spy) कसे असतात? ते हेरगिरी कसे करतात? या हेरगिरीचा इतिहास काय आहे? यावर प्रकाश टाकणारा मॅक्स महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट...

हेरगिरी म्हणजे काय ?
X

बहिर्जी नाईक. शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख. शत्रूच्या गोटात घुसून त्याच्या व्युहरचनेची अचूक माहिती काढण्यात माहीर होते. ते कधी गोंधळी होत, वासुदेव होत, तर कधी वेगळ्याच वेशात शत्रुजवळ पोहचत. शत्रूची इत्यंभूत माहिती संकलित करून पुन्हा सुरक्षित परत येत. त्यांच्या याच माहितीवर शिवरायांच्या मोहिमा ठरत होत्या. त्या केवळ ठरत नव्हत्या तर या माहितीच्या आधारे आणि गनिमी काव्याच्या युद्धनीतीच्या जोरावर यशस्वी देखील होत होत्या. याच बहिर्जींच्या कामगिरीचा प्रभाव इस्राईलच्या गुप्तचर संघटना मोसाद वर आहे.

आजच्या काळात प्रत्येक देशाची अत्याधुनिक गुप्तचर संघटना आहेत. वेगवेगळी कौशल्ये वापरून शत्रूराष्ट्रातील लष्कराच्या डावपेचाची माहिती संकलित करायची. त्यांचा शस्त्रसाठा, सैन्याची संख्या, त्यांच्या पुढील मोहिमांची माहिती अगोदरच मिळवायची. आणि त्याद्वारे नियोजन करून आपल्या देशाला सुरक्षित ठेवायचं. दुसऱ्या देशात जाऊन ही कामगिरी करणे हे महा जोखीमच. अनेकदा परतण्याची आशा देखील नसते पण जगातील अनेक संघटनांनी अशा अवघड धोकादायक मोहिमा फत्ते केल्या आहेत. इस्राईलच्या मोसाद या संघटनेचा यात वरचा क्रमांक आहे. मोसाद ने दुसऱ्या देशात घुसून शत्रूला ठार केलेले आहे. अशाच काही गुप्तचर संघटनांची माहिती या व्हिडीओतून आपण घेणार आहोत.

हेरगिरीच्या आरोपात बहुदा जन्मठेप ,मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते. पाकिस्तानी कैदेत असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावरची पुनर्विचार याचिका देखील फेटाळण्यात आली आहे. या अगोदर ८ नौदलातील सैनिकांना इस्राईल साठी हेरगिरी केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

नुकतेच भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्या प्रकरणी प्रदीप कुरुलकर या D R D O च्या देशद्रोही अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. देशभक्तीचे पाईक असल्याचा गवगवा करणाऱ्या संघटनेशी संबंधित असलेली व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या ट्रॅप मध्ये अडकली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांच्या गुप्तचर संघटना असे वेगवेगळे टूल्स वापरुन अशी गोपनीय माहिती संकलित करत असतात.

काही प्रमुख देशातील गुप्तचर संघटना पाहूयात

जगभरातील आंतकवादी संघटनांचा एका नावाने थरकाप उडतो ती गुप्तचर संघटना म्हणजे मोसाद. इस्राईल या छोट्या राष्ट्रातील या संघटनेचा जगभरात मोठा दबदबा आहे. धोकादायक असलेली गोपनीय मिशन पूर्ण करणाऱ्या संघटनांच्या यादीत मोसाद या संघटनेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

RAW ही भारताची आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना आहे. देशाविरुद्ध कारवाया करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांची माहिती मिळवणे, आतंकवादाला पायबंद घालणे, विदेशांतील माहिती संकलित करून त्याद्वारे लष्करी व्यूहरचना करणे हे प्रमुख काम ही संघटना करते. RAW या भारतीय गुप्तचर संघटनेचा जगभरात दबदबा आहे.

जगातील काही देशांच्या गुप्तचर संघटना कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात.

अमेरिका Central investigation agency (CIA)

पाकिस्तान Inter Service Inteligance (ISI)

ऑस्ट्रेलिया Austrilian intelagance organisation

इराक- अल मुखबरात

सौदी अरेबिया - genral inteligance precidency (GIP)

इराण - सावाक

दक्षिण आफ्रिका Beauro of state security (BOSS)

दुसऱ्या देशात जाऊन तेथील गोपनीय माहिती काढणे हे जोखमीचे काम या संघटना पार पडतात. हे काम जोखमीचे असते. अडकल्यानंतर बऱ्याचदा स्वतःच्या देशाची देखील मदत मिळत नाही. देशासोबत असलेली ओळख लपवली जाते. बऱ्याचदा यामध्ये काम करणाऱ्या सैनिकांना प्रोटोकॉल तोडून मोहीम फत्ते करावी लागते. दुसऱ्या देशात जाऊन अनेक धोकादायक अशक्य मोहिमा या संघटनांनी पुर्ण केल्या आहेत.हनी ट्रॅप हे यातील कॉमन टूल आहे. अशा संघटनांतील महत्वपूर्ण पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात फसविण्यासाठी सुंदर स्त्रियांचा वापर केला जातो. विविध प्रकारे या स्त्रिया या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात फसउन त्यांच्याकडे असलेली गोपनीय माहिती काढून घेत असतात. प्रदीप कुरुलकर हा अधिकारी अशाच प्रकारच्या हनी ट्रॅप मध्ये अडकला आहे.

Updated : 14 May 2023 2:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top