Home > मॅक्स ब्लॉग्ज > ब्राम्हो कॅपिटॅलिझम म्हणजे काय?

ब्राम्हो कॅपिटॅलिझम म्हणजे काय?

ब्राह्मणशाही- भांडवलशाही किंवा ब्राम्हो कॅपिटॅलिझम ही संज्ञा भारतात सातत्याने वापरली जाते. मात्र, याचा अर्थ काय? जाणून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर

ब्राम्हो कॅपिटॅलिझम म्हणजे काय?
X

या मांडणीच्या मर्यादा

(अ) भांडवलशाहीऐवजी "कॉर्पोरेट वित्त भांडवलशाही" असा शब्दप्रयोग रुजवण्याची गरज आहे. भांडवलशाही एकजिनसी नाही, याची दखल घेण्याची नितांत गरज आहे; भांडवलशाही असा मोघम शब्दाने कोट्यावधी छोटे खाजगी भांडवल असणारे मालक दूर गेले आहेत.

(ब) ब्राह्मणशाही भारतापुरती मर्यादित असली तरी कॉर्पोरेट वित्त भांडवलशाही ही सर्वार्थाने जागतिक शक्ती आहे; त्यामुळे त्याचे विश्लेषण जगाच्या कॅनव्हासवरच होऊ शकते.

दोन्ही प्रणालीतील साधर्म्य:

या दोन्ही प्रणाली, कोट्यावधी शोषकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर निर्णायक प्रभाव टाकतात.

त्यांच्या फायद्याच्या अनेक संकल्पना, प्रमेये जणूकाही भौतिक किंवा रसायनशास्त्रासारखी स्वयंभू आहेत. हे जनमानसावर रुजवतात; स्वयंभू म्हणजे त्याला वेगळे सिद्ध करायची गरजच नाही.

उदा. ब्राह्मण जन्माने श्रेष्ठ असतात असे वाक्य किंवा खाजगी भांडवल सार्वजनिक भांडवलापेक्षा अधिक कार्यक्षम आणि भ्रष्टाचार विरहित कारभार देते.

कॉर्पोरेट वित्त भांडवलशाहीने, विशेषतः गेल्या ४० वर्षाच्या नवउदारमतवादात अशी अनेक प्रमेये सामान्य लोकांमध्ये रुजवली.

काही उदाहरणे पाहू

१. श्रीमंत व्यक्ती श्रीमंत होतात. कारण त्यांच्यात नेतृत्वगुण असतात, ते जोखीम घेतात, ते प्रचंड कष्ट घेतात म्हणून...

२. सरकारवर अवलंबून राहणे ही बाडांगुळी मानसिकता आहे; नागरिकांनी स्वतःच्या भौतिक प्रश्नांची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे.

३. सार्वजनिक उपक्रमांना वित्तीय तोटा येणे म्हणजे महापाप; वित्तीय तोटा येणारे उपक्रम लवकरात लवकर बंद किंवा खाजगी क्षेत्राकडे सोपवले पाहिजेत.

४. माणसे स्वार्थी झाल्यामुळे मूल्यऱ्हास झाला आहे. भ्रष्टाचार वाढला आहे; म्हणून अर्थव्यवस्थेत बजबजपुरी माजली आहे, म्हणून संस्कार महत्वाचे

५. मानवी इतिहासात प्रत्येकजण दुसऱ्याचे शोषण करतच आला आहे; शोषण कोठे नाही?

६. सगळ्या आर्थिक प्रश्नांची मुळे लोकसंख्येत आहेत

७. देशातील स्टॉक मार्केट, सेन्सेक्स वाढता, परकीय गुंतवणूक वाढली म्हणजे अर्थव्यवस्था नीट सुरु आहे.

८. काहीही झाले तरी देशाची जीडीपी सतत वाढती राहिली पाहिजे; बाकीचे आपोआप होतंय.

संजीव चांदोरकर (१९ सप्टेंबर २०२१)

Updated : 20 Sep 2021 12:51 PM GMT
Next Story
Share it
Top