Home > मॅक्स ब्लॉग्ज > Devvrat Mahesh Rekheच्या मंत्रपठणाचा समाजाला नेमका काय उपयोग होणार ?

Devvrat Mahesh Rekheच्या मंत्रपठणाचा समाजाला नेमका काय उपयोग होणार ?

पूर्वापार ज्ञानाची मक्तेदारी असलेल्या पिढीतील तरुणाने मंत्रपठणाची घोकंपट्टी करण्याला डोक्यावर घेतलं जातंय... घोकंपट्टी पाठांतराला एवढं डोक्यावर घेण्यासारखं काय आहे त्यात? याचा समाजाला नेमका काय उपयोग होणार आहे? वाचा सोमनाथ कन्नर यांचा लेख...

Devvrat Mahesh Rekheच्या मंत्रपठणाचा समाजाला नेमका काय उपयोग होणार ?
X

नगरच्या एका पोराने म्हणे कुठल्यातरी पारायणाचे किती काय ते श्लोक पाठांतर केलेत. त्याला मीडियात प्रचंड प्रसिद्धी दिली जातेय. एवढंच काय प्रत्येक BJP भाजप नेत्याला आपल्या Social Media सोशल मीडिया अकाउंटवर या पोराचं कौतुक करणाऱ्या पोस्ट टाकणं जवळपास बंधनकारक केलेलं दिसतंय. अन्यथा आमच्या रांगड्या दानवे साहेबांना श्लोक वगैरे असल्या भानगडीतलं फारसं कळत असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. पण वरून ऑर्डर आली म्हणजे करावंच लागतं म्हणून त्यांनी कौतुक केलेलं दिसतंय.




तर या घोकंपट्टी पाठांतराला एवढं डोक्यावर घेण्यासारखं काय आहे त्यात? याचा समाजाला नेमका काय उपयोग होणार आहे? एखादं संशोधन, किंवा जनकल्याणासाठीच्या गोष्टीतील यशाबाबत माध्यमं किंवा सरकारकडून एवढी दखल घेतल्याचं कधी जाणवलं नाही. पूर्वीपासून केवळ ब्राह्मणांनाच वेदपठणाचा अधिकार असताना त्याच समूहातील किंवा तत्सम सवर्ण समूहातील एखाद्या पोराने त्यातील काही भाग पाठ करणं ही फार सामान्य बाब आहे. पण त्याचाही सोहळा करून ठेवलाय या मंडळींनी. शासन, प्रशासन आणि माध्यमं या सगळ्या घटकांचं तीव्र ब्राह्मणीकरण झाल्याचं हे लक्षण आहे.

देशात एका मोठ्या समूहाचं कार्यक्षेत्र शेती आहे. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक तरुणांनी उल्लेखनीय अशी कामगिरीसुद्धा केलीय. पण सरकार किंवा माध्यमांकडून त्याची या पाठांतर करणाऱ्या पोराच्या तुलनेत तितकीशी दखल घेतलेली जाणवली नाही.

नगर जिल्ह्यातली एक Shraddha Dhawan नावाची मुलगी आपल्या दिव्यांग वडिलांना दुग्धव्यवसायात मदत करत करत स्वतःच्या हिमतीवर 70 म्हशींचा गोठा उभा करते. हे ऐकायला सोपं वाटतं असेल, पण दररोज दोन वेळ म्हशीच्या दुधाची धार पिळणं खायचं काम नाही. मी रोज दोन म्हशींच्या धारा पिळतो, तेवढ्यानेच मनगटांना प्रचंड कळा लागून जीव रडकुंडीला येतो. मंत्रपठणापेक्षा कैक पट कस आणि संयमाची परीक्षा पाहणारं काम आहे हे. श्रद्धा यांच्यामुळे अनेक तरुण तरुणींना दुगधव्यवसायात उतरण्याची प्रेरणा मिळाली. पण आपल्याकडं शारीरिक श्रमापेक्षा घोकंपट्टीला जास्त महत्व देण्याची पद्धत असल्याने तीच कौतुक होणार नाही.

कोकणातल्या Mithilesh Harishchandra Desai सरांनी फणसाच्या विविध व्हेरायटी विकसित केल्या आहेत. आमच्या मराठवाड्यातल्या लोकांना 'फ फणसाचा फ' फक्त एवढीच फणसाची ओळख होती. त्या मराठवाड्यातही येऊ शकणारी फणसाची जात मिथिलेश सरांनी विकसित केलीय. हे खरं कौतुकाचं काम म्हटलं गेलं पाहिजे.

आमचे फेसबुक मित्र Priyadarshi Sonavane सरांची वयाच्या केवळ विशीत असणारी कन्या संहिता हिची बुद्ध तत्वद्न्यानावर आधारित अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. हजारो वर्षे ज्ञानापासून वंचित ठेवल्या गेलेल्या समूहाला ज्ञानाची दारं खुली होताच त्यांच्या प्रतिभा अशा तर्हेने झळकत आहेत. ही खरी दखल घेण्यासारखी बाब असताना, पूर्वापार ज्ञानाची मक्तेदारी असलेल्या पिढीतील तरुणाने मंत्रपठणाची घोकंपट्टी करण्याला डोक्यावर घेतलं जातंय. हे समाज म्हणून आपण दीन होत चालल्याचं लक्षण आहे.

केवळ लेखनचातुर्याच्या जोरावर या मंडळींनी यांच्या सुमार गोष्टींनाही प्रचंड ग्लोरिफाय करून ठेवलेलं असतं. त्याआधारे सवर्ण मेरीटचं तुणतुणं वाजवत इतरांना हिणवणंही सुरूच असतं. याउलट बहुजन समूह हा त्या बाबतीत तितकासा जागरूक नाही. अर्थात हा तेलमीठ लावून बढाया मारण्याचा जागरुकपणा बहुजनांच्या जीन्समध्येच नसतो.

असो, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. चिनुआ अचेबे म्हणतो, "जोपर्यंत सिंह आपली स्वतःची गोष्ट लिहणार मांडणार नाही, तोपर्यंत शिकारीच्या इतिहासात शिकाऱ्याचंच माहिमामंडन केलं जाईल."

भारतीय इतिहास आणि समाजरचनेबाबत हे वाक्य तंतोतंत लागू होतं.


सोमनाथ कन्नर

लेखक

Updated : 4 Dec 2025 9:05 AM IST
Next Story
Share it
Top