Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांचा अर्थ काय?

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांचा अर्थ काय?

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांचा अर्थ काय?
X

बिहारच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल. असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्य केंद्राच्या विरोधात भूमिका घेत आहे. कृषी विधेयक, मंदिर उघडणे असे केंद्राचे निर्णय राज्यानं धुडकावले आहेत. घटनेनुसार राज्याला केंद्राविरोधात जाता येत नाही. त्यामुळं बिहार निवडणूकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट अस्तित्वात येईल. असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे.

लोकसभा निवडणुकींपासून प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या भुमिकांची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होते. राज्यातील मंदिर खुली करा. अशी मागणी करत पंढरपूर येथे केलेलं आंदोलन असो किंवा इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या ऐवजी लोकउपयोगी वास्तूची निर्मिती करण्याची मागणी असो, किंवा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा असो... प्रकाश आंबेडकरांच्या भुमिका समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या भुमिकांबाबत आम्ही राज्यातील राजकीय विश्लेषकांशी बातचित केली...



टीव्ही 9 मराठीचे पत्रकार सुधाकर कश्यप यांच्याशी या संदर्भात आम्ही बातचित केली असता, ते म्हणाले...

प्रकाश आंबेडकर हे खासदार होते. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाचे सदस्य होते. त्यांनी अनेक वर्षे दिल्लीतील राजकारण जवळून पाहिलं आहे.त्यामुळे त्यांच्याकडे काही महत्वाच्या इंन्पुट्स असतील त्या आधारावर ते राज्यात डिसेंबर राष्ट्पती राजवट लागू शकते, असं म्हणाले असतील.





साम टीव्हीचे संपादक निलेश खरे प्रकाश आंबेडकरांच्या भुमिकेबाबत बोलताना म्हणतात...

प्रकाश आंबेडकरांबाबत गेली अनेक वर्षे आदरांची भावना राहिली आहे. मात्र, अलिकडच्या काळात त्यांच्या भूमिका वैचारिक अधिष्ठानाला धक्का लावणाऱ्या असल्याचं पाहायला मिळालं आहे. दलित समाजाशी निगडित बहुजन समाजाला बरोबर घेऊन जात असताना विकासाच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांनी जास्त लक्ष केंद्रित केल्यास समाजाच्या विकासास मदत होईल.

असं मत साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केलं आहे.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी आम्ही जेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकांबाबत जेव्हा बातचित केली. तेव्हा त्यांनी...

प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने भाजप आणि संघाच्या जवळची भूमिका घेतली आहे. असं सांगितलं. या संदर्भात त्यांनी काही उदाहरण दिली.

ज्या पद्धतीने आता प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणार आहे. याचं कारण मंदिर असतील, कृषी विधेयकं असतील. अशा कुठल्याही विषयाबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारची लाईन स्विकारलेली नाही. माझ्या मते रामदास आठवले अशा प्रकारे बेच्छुट वक्तव्य करतात. कृषी विधेयक मंजूर केली नाहीत. त्यामुळं घटनेच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र सरकारवर कारवाई होईल किंवा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू येईल. हे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं पाहिजे.

अनेक राज्यांचा कृषी विधेयकांना विरोध आहे. एवढेच नव्हे GST सारख्या विषयांध्ये सुद्धा अनेक राज्यांचा केंद्र सरकारने जो उपाय सुचवला आहे. तो स्विकारण्यास विरोध आहे. म्हणून त्या त्या राज्याची सरकार बरखास्त केली जातील का?



एक भाग आहे. दुसरा म्हणजे मंदिरा सुरू व्हावेत म्हणून प्रकाश आंबेडकरांनी जे आंदोलन केले. त्या नंतर दोनच दिवसांनी त्यांनी सांगितलं की, आता लवकरच या संबंधीचे नोटिफिकेशन निघणार आहे आणि मंदिरे खुली होणार आहेत. तरीसुद्धा मंदिरे खुली झाली नाहीत. म्हणून त्यांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे. मंदिर सुरू केव्हा करायची? कशी करायची? हा डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेवून मुख्यमंत्री यासंबंधी निर्णय घेणार आहेत.

कुठल्याही प्रकारची बंधने वापरू नका, मास्क वापरू नका, सोशल डिस्टंसिंग ची गरज नाही अशाप्रकारचा बेजबाबदारपणा करण्याचे स्वातंत्र्य विरोधी पक्षांना असलं किंवा एखाद्या स्वतंत्र पक्षाला असलं तरी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्याला असं करून चालणार नाही.

दुसरी गोष्ट अशी की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे पन्नास जागा अशा निघाल्या की, ज्या मध्ये वंचित बहुजन आघाडी ला खूप चांगली मते घेतली होती. किमान बारा-पंधरा जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आल्या नाहीत. जिथे त्यांचा पराभव झाला तिथं वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराने जी मत घेतली. जी मतविभागणी त्यांनी घडवून आणली ते जबाबदार होती. असे मानावे लागेल.



लक्ष्मण माने यांनी सुद्धा असा आरोप केला की, मी पक्ष सोडण्याचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचे कारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी प्रकाश आंबेडकरांना घेरलेलं आहे. ते त्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. ते त्यांच्या बरोबर आहे. अशा प्रकारची त्यांनी टीका केली होती.

एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागच्या वर्षी असं म्हटलं होतं, विधानसभा निवडणुका होण्यापुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते पद वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा असेल. असे स्पष्टपणे सांगितलं होतं. याचा अर्थ काय होता काय होता? काँग्रेस-राष्ट्रवादीला काहीही जागा मिळणार नाही वंचित बहुजन आघाडी ला मिळतील. असे त्यांनी सांगितले होते.

गेल्यावेळी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात नंतर मतभेद झाले आणि दोघांची आघाडी किंवा दोघांचा जो समझोता होता तो फसला आणि एम आय एम ने टाटा बाय-बाय केला. याचं कारण लोकांना माहित आहे. थोडक्यात प्रकाश आंबेडकर यांच्या आजू बाजूला वंचित बहुजन आघाडी स्थापन होण्याच्या आधीपासून अनेक वर्ष अशी टीका होत आली आहे की, त्यांना सातत्याने भाजपचं पाठबळ मिळत आलेलं आहे.

भाजपची वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे अशी टीका करण्यात आली होती. मी सरसकटपणे असे विधान करणार नाही. परंतू प्रकाश आंबेडकर यांचे निर्णय जे लवचिक असतात. ते त्या त्या निवडणुकीप्रमाणे बदलत असतात त्यामागे कोणते हेतू असतात हे माहीत नाही. पण काँग्रेसचा सातत्याने विरोध करायचा किंवा गेल्या वेळी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही 144 जागा काँग्रेस देत आहोत. असे वंचित बहुजन आघाडी सारख्या छोट्या किंवा नव्या पक्षाने म्हणणं हे हास्यास्पद होते. कॉंग्रेससारख्या पक्षाला अशाप्रकारचे तुच्छता पूर्ण वक्तव्य करणं. हे चुकीचं होतं. काँग्रेस पक्षाची असणारे मतभेद त्यांनी जरूर जाहीर करावे. पण अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची गरज नव्हती.



राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या बद्दल सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची एक प्रकारचे त्यांचे पूर्वग्रह आहेत त्यांचे मतभेद आहेत आणि शरद पवार यांच्याशी त्यांना कुठल्याही प्रकारे वाटाघाटी करायच्या नसतात. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बाजूला ठेवून महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला वंचित बहुजन आघाडी पक्ष विरोधी पक्ष होऊ शकत नाही. असे असे भाजप त्यांना वाटत असेल देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल. परंतु आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विपरीत भूमिका घ्यायची आणि त्यामुळे त्यांच्या या हालचाली मागे त्यांच्या विचारांना घेते त्यांच्या धोरणामागे काय विचार नेमका आहे? त्यासंबंधी आपण फक्त अंदाज बांधू शकतो. परंतु महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट डिसेंबरच्या च्या अगोदर येईल असे भविष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे.

अशा प्रकारचे भविष्य थेट भारतीय जनता पक्षाने देखील केलेले नाही. भाजपच्या एक पाऊल पुढे टाकत सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं या पुढचे राजकारण कसे असेल याबद्दल आपण अंदाज बांधू शकतो. पण आजपर्यंत ते जसे वागत आले तसेच त्या पुढे बघतील असेच यावरून वाटत आहे.


ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याशी बातचित केल्यानंतर आम्ही राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांच्याशी बातचित केली, ते म्हणतात...

प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर आणि प्रार्थनास्थळ उघडावी. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केलं होतं. आणि ते नेमकं त्याच वेळी केलं होतं. ज्यावेळी भापजने ही त्याचवेळी आंदोलन केले होतं. आणि आता प्रकाश आंबेडकरांनी एक ताजं विधान केलं आहे की, ते म्हणजे बिहारमधील निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. असं काहीसं विधान मध्यंतरी चद्रकांत पाटील यांनीही केलं होतं. त्यामुळं त्यांच्या या विधानाकडे आणि कृतीकडे पाहिलं तर काही वेळा निश्चित असं वाटू शकतं की, प्रकाश आंबेडकर हे भाजप नेते आहेत का? किंवा भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागतात की काय? आशा पध्दतीचं ते वर्तन आहे.

मुळात वंचित आघाडी ने हा प्रयोग जेव्हा पासून त्यांनी सुरू केला. लोकसभा इलेक्शन त्यानंतर आणि विधानसभा इलेक्शन झाले. त्या काळात ते भापजची बी टीम म्हणून काम करतात अशा पध्दतीचा आरोप त्यांच्यावर होतं होता. त्याला काहीसं साजेसं म्हणावं असं वर्तन आहे. हे एकिकडे काही मंडळी म्हणतात किंवा तसं दिसतं आहे.


दुसरीकडे ही देखील गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर हे सरकारचा भाग नाही आहेत. आणि त्याच्यामुळे सरकार विरोधी भुमिका घेणं किंवा त्या संदर्भामध्ये आपल्या ज्या गोष्टी आहेत. मत आहेत ते मांडणं हे त्यांचं काम आहे. आणि ते तसं काम करत आहेत असं म्हणता येऊ शकतं. किंवा त्यांनी ही भविष्यावाणी केलेली आहे. तर एकूण भाजपच केंद्र शासनाचं ज्या काही गेल्या काळामध्ये वर्तन राहिलं आहे. कदाचित् त्या वर्तनाला अनुसरून अशा पध्दतीचा निर्णय होईल अशी ती भविष्यावाणी करत आहेत. असं ही त्याकडे पाहात येऊ शकेल. परंतू राज्यापालाच्या संदर्भामध्ये म्हणजे राज्यापाल हे घटनात्मक असं पद आहे ते मुख्यमंत्री आणि कॅबिनेट यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी वर्तन करणं अपेक्षित असतं. त्यांनी मुख्यमंत्री किंवा कॅबिनेटला सल्ला देणं हे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. घटनात्मक ज्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य दिल्या आहेत. त्याचा तो भागही नाही. राज्यपाल यांनी उद्धव ठाकरे यांना ज्याप्रकारे पत्र पाठवले आहे. त्यासंदर्भातं कुठेतरी राज्यपाल हे योग्यच आहेत. आणि राज्यपाल असा सल्ला देऊच शकतात. अशा पद्धतीचं विधान करतात. त्याच्यामुळेच त्यांच्या या ज्या भुमिका आहेत. त्याच्याशिवाय लोकांना याकडे स्वच्छपणे पाहता येत नाही. याच्या मागे त्यांचा काही अंतस्थ हेतू आहे का? अशी एक शंका त्याबतीत उपस्थित केली जात आहे.

असं मत आजबे यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरिंत तज्ञांची मत पाहता प्रकाश आंबेडकरांच्या भुमिकेमध्ये सातत्यानं बदल झाल्याचं दिसून येत आहे.

Updated : 3 Dec 2020 5:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top