Home > मॅक्स ब्लॉग्ज > "जय भीम" शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती : अनिल वैद्य

"जय भीम" शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती : अनिल वैद्य

जयभीम (Jaibhim) हा तर बुलंद आवाज आहे. कितीही अवरोध निर्माण करू द्या.लक्षात ठेवा शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती आहे! नवनिर्मिती फक्त जागृत समाजच करू शकतो.ती निर्मिती क्षमता आत्मसन्मान चळवळीत आहे, सांगताहेत निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य...

जय भीम शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती : अनिल वैद्य
X

जयभीम(Jaibhim) हा तर बुलंद आवाज आहे. कितीही अवरोध निर्माण करू द्या.लक्षात ठेवा शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती आहे! नवनिर्मिती फक्त जागृत समाजच करू शकतो.ती निर्मिती क्षमता आत्मसन्मान चळवळीत आहे, सांगताहेत निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य... तथागत बुद्ध म्हणाले,आनंद!माझ्या पच्छात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ* अथवा गौण बदल करावेत

(संदर्भ भ बुद्ध आणि त्यांचा धम ,प्रकरण *अंतिम शब्द .पृष्ठ ४१५)

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण दिन म्हणण्यास व जयभीम शब्दास विरोध करणे सुरू आहे म्हणून दोन शब्द लिहत आहे.हे माझे वयक्तिक मत आहे.ते असे.महापरिनिर्वाण फक्त बुद्धाचे होते हे मला माहिती आहे हे आधीच घोषित करतो.परंतु विरोध करणाऱ्यांनी परिभाषा ,बोली भाषा एखाद्या शब्दाची अनुकूलता आणि अनिवार्यता , समाजाणे स्वीकारलेला भावार्थ, या सर्व बाजूंचा विचार केला पाहिजे. केवळ महापरिनिर्वाण पाली शब्द आहे. म्हणून तो फक्त बुद्धा शिवाय दुसऱ्यासाठी वापरू नका ही संकुचित वृत्ती आहे.जयभीम बौध्द धम्म सांगत नाही म्हणून नमो बुद्धाय म्हणा ही बाब म्हणजे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मान चळवळीचे भान नसल्याचे द्योतक आहे .हे लोक महानिर्वाण शब्दाचे केवळ भाषांतर घेवून बसले आहेत.

बाकी भाषा व शब्द हे सामाजिक , सांस्कृतिक बदलातून निर्माण होत असते.एका शब्दाचे अनेक अर्थ निर्माण होतात ही बाब ही मंडळी लक्षात घेत नाही.

एखादा मुद्दा अनेक अंगाने विचारात घेतला पाहिज हा प्रगल्भ दृष्टीकोन असावा . खुद्द बुद्धाने आनंदास सांगितले की,संघाला वाटले तर किरकोळ बदल करू शकता.काळाच्या ओघात किती तरी बदल झालेत.

बुद्ध भिक्कुंना म्हणाले,जर विहार नसेल तर भिक्कूनी झाडाखाली रहावे.तेव्हा तर घनदाट जंगल व जंगली प्राणी स्वापद असायचे.आज तसे भयानक जंगल किंवा झाडे नाही पण कोण भिक्कू झाडाखाली राहतात? कुठे गेला बुद्धाचा उपदेश?काळाच्या ओघात बदल झाला.तो उपासक व भुक्कुंनी स्वीकारला आहे.जेथे विहार नाही त्या गावात भिक्कुला कुणी विहारात जावून रहा म्हणत नाही.

डॉ बाबााहेब आंबेडकर महापरिनिर्वाण विशेषांक प्रबुद्ध भारत ने जानेवारी 1957 ला प्रकाशित केला होता .प्रबुद्ध भारताची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. महापरिनिर्वाण विशेषांक चे वेळी संपादक मंडळात कर्मवीर भाऊराव गायकवाड,ऑर डी भंडारे,अँड बी सी कांबळे हे होते. अंत्य यात्रेला डॉ भदंत आनंद कौष्यल्ययन व इतर भंते होते .डॉ भदंत आनंद कौष्यल्यायन या विद्वान भंतेंचे निधन 1989 ला झाले .त्यांनी कधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण शब्दास विरोध केला नाही मराठी हिंदी भाषेतील एकच शब्द दोन अर्थाने

प्रचलित असतो.उदाहरणार्थ

तृतीय पंथीय लोक जेव्हा , त्यांचे लिंग छाटतात त्यास निर्वाण म्हणतात. अशा लोकांना त्यांच्या भाषेत निर्वाण म्हणतात. बोली भाषेचे दुसरे उदाहरण जेल मधे दोन प्रकारचे आरोपी असतात एक विचाराधीन व दुसरा शिक्षा झालेला पण लोक बोली भाषेत दोघानाही आरोपी म्हणतात. जाती हा पाली शब्द आहे जाती म्हणजे जन्म मराठीत जाती म्हंनजे जात .दुसऱ्या भाषेचे शब्द एखाद्या भाषेत इतके रूढ झाले असतात की ते त्या भाषेचे वाटतात .इंग्रजी टेबल ,पेन, टी वी हे मराठीत इतके रूढ झाले की ते इंग्रजी वाटत नाहीत.कुणी टेबल साठी मेज शब्द वापरत नाही .पेन साठी लेखणी शब्द वापरीत नाही.त्याच प्रमाणे गेल्या 66 वर्षात

महापरिनिर्वाण शब्द इतका रूढ झाला की तो मराठी हिंदीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हणण्याची रूढी निर्माण झाली.या शब्दाचा पाली अर्थ कुणी घेत नाही .तो पेन ,टेबल हे जसे इंगर्जितून मराठीतआले तसेच महापरिनिर्वाण हा

पाली भाषेतून मराठीत हिंदीत आला .यात काही नुकसान नाही.हा शब्द म्हणजे बुद्ध उपदेश नव्हे.हा एक शब्द आहे ज्याचे मराठी किंवा हिंदी बोलणाऱ्या आंबेडकरी समूहाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हणून संबोधले आहे. जर बुद्ध उपदेश बदलत असेल तर तो जरूर थांबविला असता.पण हा शब्द म्हणजे उपदेश नव्हे.

एक शब्द अनेक अर्थाने वापरण्याची पद्धत आहे. यात काही शंकाच नाही. भाषांतरवादी पोपटपंची लोक ही परंपरा समजू शकत नाहीत.व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हणणें बंद होणार नाही. महापरिनिर्वाण व जयभीम भाषा उत्पत्ती शास्त्रानुसार बोलीभाषा म्हणून प्रचलित झालेला शब्द आपण स्विकारला तर कुणाचे नुकसान होईल? बौध्द धम्म म्हणजे पोथी पुराण व कुराण नव्हे की जे शात्या शिवाय सुधारणा करू शकत नाही.

एक हटवादी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण दिन म्हणण्यास विरोध करणारा म्हणाला. "ज्यांनी महापरिनिर्वाण सुत्त अभ्यासले नाही. ज्यांच्याकडे महापरिनिर्वाण सुत्त च उपलब्ध नाही ते महापरिनिर्वाण सुत्ताविषयी चर्चा करीत आहेत " हे सुत्त आम्ही चांगलेच वाचले आहे. या महानिर्वाण सुतात भ बुद्ध केव्हा व कुणाचे महानिर्वाण म्हणायचे किंवा त्यांनाच महानिर्वाण म्हणायचे असे काहीच सांगत नाहीत.पण नाहक महापरिनिर्वाण सूत्त पुढे करतात.

आम्ही जे म्हणतो ते भाषांतर करून म्हणत नाही .खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महापरीनिब्बान* सूत्ता बाबत तीव्र आक्षेप नोंदविले पहा Vol17(2)page 109ला आहे.पण आम्हाला त्यावर वाद करायचा नाही. ने

भाषांतर वाद्यांनी समजून घ्यावे आपल्या समाजातील सोयीनुसार एकमेकांना बोलण्यास आणि संवाद साधण्यास एकदम सोयीस्कर पडेल अशी भाषा म्हणजे बोली भाषा!" बोली भाषा ही कशीही बोलली जाते.हिला व्याकरण लागू पडत नाही.6 डिसेंबर हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे

येथे महापरिनिर्वाण हा शब्द बोली भाषेत बोलल्या जातो शब्द कसे रूढ होतात ते बघू. साहित्य मीमांसकांनी शब्दांच्या तीन शक्ती मानल्या आहेत. त्या म्हणजे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या होत. शब्द एकच असतो, त्याचा मूळ अर्थ एकच असतो, पण भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये त्याला भिन्न भिन्न अर्थ प्राप्त होतो. जशी एकच व्यक्ती, पण ती घरामध्ये वेगळी वागते, नोकरीच्या ठिकाणी वेगळी वागते, सार्वजनिक सभासंमेलनात वेगळी वागते आणि मित्र मैत्रीणीच्या संगतीत वेगळी वागते आणि असा वेगळेपणा असूनही ती व्यक्ती वेगवेगळी नसते तर एकच असते. तसा शब्द एकच असतो पण त्याचा परिसर, सभोवतालचा संदर्भ बदलला की तो वेगळा अर्थ सांगू लागतो. जर एखाद्या गाढवाला उद्देशून आपण 'तो गाढव आहे' असे म्हटले तर तो वाच्यार्थ झाला पण जर एखाद्या माणसाला उद्देशून आपण हेच वाक्य म्हटले तर याचा अर्थ बदलला. लगेच 'गाढव' या शब्दाचा अर्थ 'मूर्ख मनुष्य' असा होतो. हा दुसरा अर्थ म्हणजे लक्ष्यार्थ होय. हा एकच शब्द आणखीही अर्थ व्यक्त करू शकतो. जर एखाद्या आईने हवेत हातपाय उडवीत खेळणाऱ्या आपल्या लहानग्याला उद्देशून गाढव कुठला असे वाक्य म्हटले तर त्याचा आणखी एक वेगळाच भावार्थ आपल्या लक्षात येतो. तिच्या मनातील वात्सल्यभाव त्या शब्दामधून व्यक्त होतो. या उदाहरणात 'गाढव' या शब्दाला वाच्यार्थ अपेक्षित नाही, 'मूर्ख मनुष्य' यासारखा लक्ष्यार्थही अपेक्षित नाही. मुलाबद्दलची कौतुकाची भावना प्रकट करणे एवढाच त्याचा अर्थ घ्यावा लागतो. हा तिसरा अर्थ म्हणजे व्यंग्यार्थ होय.

अभिधा म्हणजे एखादा शब्द उच्चारला की विशिष्ट अर्थ कळतो.

येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण दिन म्हंटले की,तो महाकठीण ,वेदनादायी दिवस आठवतो ज्या दिवशी तमाम आंबेडकरी समाजाच्या घरात चुली पेटल्या नव्हत्या.घरा घरात बाबा गेले बाबा गेले असा आक्रोश होता.म्हणून महापरिनिर्वाण शब्दाची

एक शक्ती रूढी परंपरेने

प्रस्थापित झाली आहे.येथे पाली भाषेचे व्याकरण लागू करण्यात अर्थ नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यू दिवसाला महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा करणे ही संस्कृती झाली आहे.

एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरण्याची भाषा पद्धती लागू आहे.

महापरिनिर्वाण दिनाचेही तसेच आहे.बुद्धाचा मृत्यू महापरिनिर्वाण हा अंतिम मृत्यू पुन्हा जन्म नाही असा असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यू दिनाला महापरिनिर्वाण दिन म्हणतात कारण महान व्यक्ती उपकार कर्त्या महामानवाच्या मृत्यूला त्यांचे अनुयायी‌ महापरिनिर्वाण म्हणतात.एकच शब्द दोन अर्थाने वापरण्याची परवानगी भाषा शास्त्रात आहे .त्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण दिन म्हणणे मला चूक वाटत नाही.तो शब्द ती बोली भाषाबोलणाऱ्या समाजाने सहज रित्या उद्गगारला आहे.त्याला व्याकरणाशी काही घेणे देणे नाही.हे भाषेच्या बाबतीत जगात सर्वच भाषेत स्वीकारल्या जाते. बाकी ज्याचे त्याने

ठरवावे.हे माझे व्यक्तिगत मत आहे कुणाला पसंद नसेल तर तो स्वतंत्र आहे. हे मी अनेकदा व्यक्त केले.अंबेडकरी समाज मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हटल्या शिवाय राहणार नाही व जयभीम हा तर बुलंद आवाज आहे. कितीही अवरोध निर्माण करू द्या!लक्षात ठेवा शब्दांच्या पलीकडे सामाजिक लोक संस्कृती आहे! नवनिर्मिती फक्त जागृत समाजच करू शकतो.ती निर्मिती क्षमता आत्मसन्मान चळवळीत आहे.

Updated : 8 Jan 2023 7:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top